Chrome सेटिंग्ज डीफॉल्ट वर रीसेट करणे

तुम्ही Chrome मध्ये कधीही तुमची ब्राउझर सेटिंग्ज रिस्टोअर करू शकता. तुम्ही इंस्टॉल केलेल्या अ‍ॅप्स आणि एक्स्टेंशननी तुमच्या नकळत तुमची सेटिंग्ज बदलल्यास, तुम्हाला हे करण्याची आवश्यकता असू शकते. तुमचे सेव्ह केलेले बुकमार्क आणि पासवर्ड साफ केले किंवा बदलले जाणार नाहीत.

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वर उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर सेटिंग्ज निवडा.
  3. सेटिंग्ज रीसेट करा आणि त्यानंतर सेटिंग्जना त्यांच्या मूळ डीफॉल्टवर रिस्टोअर करा आणि त्यानंतर सेटिंग्ज रीसेट करा निवडा.

या पायऱ्या पूर्ण रीसेट करण्याची सुविधा पुरवणार नाहीत. उदाहरणार्थ, फॉंट किंवा अ‍ॅक्सेसिबिलिटीसारखी काही सेटिंग्ज हटवली जाणार नाहीत. नवीन वापरकर्ता प्रोफाइल तयार करण्यासाठी, Chrome वर नवीन वापरकर्ता जोडा.

तुम्ही तुमची सेटिंग्ज रिस्टोअर करता तेव्हा, काय बदलते 

तुमच्या Chrome प्रोफाइलवर, तुम्ही जेथे साइन इन केलेले आहे अशा सर्व डिव्हाइसवर पुढील सेटिंग्ज डीफॉल्टवर बदलली जातील: 

रीसेटसंबंधित समस्या ट्रबलशूट करणे

सेटिंग्ज मेनू उपलब्ध नाही किंवा उघडणार नाही

सेटिंग्ज मेनू उघडत नसल्यास किंवा तो तेथे नसल्यास, Chrome मध्ये समस्या असू शकते. निराकरण करण्यासाठी, Chrome अनइंस्टॉल करा त्यानंतर google.com/chrome वरून Chrome परत डाउनलोड करा आणि पुन्हा इंस्टॉल करा.

तुम्हाला तरीही समस्या येत असल्यास, तुमच्याकडे एखादा असा प्रोग्राम इंस्टॉल केलेला असू शकतो जो तुमची Google Chrome सेटिंग्ज बदलत आहे. सेटिंग्जमध्ये नको असलेले बदल करणाऱ्या प्रोग्रामबद्दल अधिक जाणून घ्या.

Chrome माझी ब्राउझर सेटिंग्ज रीसेट करा

काहीवेळा, तुम्ही इंस्टॉल केलेले प्रोग्राम तुमच्या नकळत Chrome ची सेटिंग्ज बदलू शकतात. तुमच्या सुरक्षिततेसाठी, तुम्ही प्रत्येकवेळी Chrome लाँच करता तेव्हा, ब्राउझर तुमची सेटिंग्ज बदलली आहेत का ते तपासतो. Chrome ला तुमच्या सेटिंग्जमध्ये काही चुकीचे आढळल्यास, ते आपोआप मूळ सेटिंग्जवर परत जाईल.

आपोआप रीसेट होऊ शकणारी सेटिंग्ज:

  • डीफॉल्ट शोध इंजीन
  • होम पेज
  • स्टार्टअप पेज
  • पिन केलेले टॅब
  • एक्स्टेंशन

तुम्ही Chrome वर साइन इन केले नसले तरीही Chrome तुमची सेटिंग्ज रीसेट करेल. तुम्ही Chrome मध्ये साइन केले असल्यास, तुम्हाला तरीही तुमची नेहमीची सेटिंग्ज दिसतील.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
4457752463734741512
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false