Use notifications to get alerts

तुम्ही वेबसाइट, अ‍ॅप्स आणि एक्स्टेंशनकडून मीटिंग रिमाइंडरसारख्या सूचना मिळवण्यासाठी Chrome सेट अप करू शकता.

तुम्हाला पॉप-अप किंवा जाहिराती दिसल्यास, पॉप-अप कसे ब्लॉक करायचे किंवा त्यांना अनुमती कशी द्यायची, ते जाणून घ्या.

सूचना कशा काम करतात

बाय डीफॉल्ट, वेबसाइट, अ‍ॅप किंवा एक्स्टेंशनला तुम्हाला सूचना पाठवायच्या असल्यास, Chrome तुम्हाला सूचित करते. तुम्ही हे सेटिंग कधीही बदलू शकता.

तुम्ही नको असलेल्या किंवा दिशाभूल करणाऱ्या सूचना असलेल्या साइट ब्राउझ करता, तेव्हा Chrome आपोआप सूचना ब्लॉक करते आणि तुम्हाला या सूचना ब्लॉक करणे पुढे सुरू ठेवण्याची शिफारस करते.

तुम्ही खाजगीरीत्या ब्राउझ करणे हे करत असल्यास, तुम्हाला सूचना मिळणार नाहीत.

तुमची डीफॉल्ट सूचना सेटिंग्ज बदलणे

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणि त्यानंतर सेटिंग्ज वर क्लिक करा.
  3. गोपनीयता आणि सुरक्षा आणि त्यानंतर साइट सेटिंग्ज आणि त्यानंतर सूचना वर क्लिक करा.
  4. तुम्हाला तुमचे डीफॉल्ट सेटिंग म्हणून हवा असलेला पर्याय निवडा.
    • साइट ब्लॉक करा:
      1. "सूचना पाठवण्यास अनुमती नाही" च्या बाजूला, जोडा वर क्लिक करा.
      2. साइटचा वेब अ‍ॅड्रेस एंटर करा.
      3. जोडा वर क्लिक करा.
    • साइटला अनुमती द्या:
      1. "सूचना पाठवण्यास अनुमती आहे" च्या बाजूला, जोडा वर क्लिक करा.
      2. साइटचा वेब अ‍ॅड्रेस एंटर करा.
      3. जोडा वर क्लिक करा.
    • व्यत्यय न आणणाऱ्या सूचनांना अनुमती द्या:
      1. सूचना पाठवण्याची विनंती करण्याची साइटना अनुमती द्या.
      2. व्यत्यय न आणणारे मेसेजिंग वापरा वर क्लिक करा.
        • हे तुम्हाला व्यत्यय आणणे थांबवण्यासाठी सूचना ब्लॉक करते. एखादी वेबसाइट तुम्हाला अजूनही सूचनांना अनुमती देण्यास सांगू शकते, पण कोणतीही पॉप-अप सूचना दिसणार नाही. त्याऐवजी, तुम्हाला वेबसाइटच्या अ‍ॅड्रेसच्या बाजूला फक्त बेल आयकन दिसेल. अ‍ॅक्सेसची अनुमती देण्यासाठी तुम्ही बेल आयकनवर क्लिक करू शकता.

टिपा:

  • Chrome ने गैरवर्तनाशी संबंधित किंवा दिशाभूल करणारी म्हणून मार्क केलेल्या साइटसाठी तुम्ही सूचनांना अनुमती दिली असल्यास, Chrome त्या सूचना ब्लॉक करू शकते आणि साइटला पुन्हा तुमच्या परवानगीची विनंती करावी लागू शकते. सूचनांना अनुमती देण्यासाठी तुम्ही सेटिंग बदलू शकता.
  • Chrome वेळोवेळी तुम्हाला तुम्ही दिलेल्या सूचना परवानगीचे पुनरावलोकन करण्याची आठवण करून देईल.
सूचनांशी संबंधित समस्यांचे निराकरण करणे
तुम्हाला एखाद्या साइटवरून सूचना मिळवायच्या असल्यास, पण त्या मिळत नसल्यास:
  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. तुम्हाला ज्या साइटवरून सूचना मिळवायच्या आहेत त्या साइटवर जा.
  3. साइटची माहिती पहा Default (Secure) वर क्लिक करा.
  4. सूचनांना अनुमती देण्यासाठी, सूचना सुरू करा.

टीप: साइट ही व्यत्यय आणणारी आहे हे Chrome ला आढळते, तेव्हा ते सूचना पाठवण्याची साइटची परवानगी आपोआप काढून टाकू शकते आणि साइटने पुन्हा तुमच्या परवानगीची विनंती करावी हे आवश्यक करू शकते. हे पहिल्यासारखे करण्यासाठी, साइटवर नेव्हिगेट करा, ब्लॉक केलेल्या सूचना वर क्लिक करा आणि त्या मेसेजमधील सूचना पुन्हा सुरू करा.

साइटवरील पॉप-अप ब्लॉक करणे
तुम्हाला साइटकडून सूचना मिळत असल्यास, पण त्या नको असल्यास:
  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर सेटिंग्ज वर क्लिक करा.
  3. गोपनीयता आणि सुरक्षा आणि त्यानंतर साइट सेटिंग्ज आणि त्यानंतर पॉप-अप आणि रीडिरेक्‍ट वर क्लिक करा.
  4. "पॉप-अप पाठवण्याची आणि रीडिरेक्‍ट वापरण्याची अनुमती आहे" या अंतर्गत, साइट शोधा.
  5. साइटच्या उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर ब्लॉक करा वर क्लिक करा.
साइट सूचीबद्ध केलेली नसल्यास, "पॉप-अप पाठवण्याची आणि रीडिरेक्‍ट वापरण्याची अनुमती नाही" च्या बाजूला, जोडा वर क्लिक करा. साइटचा वेब अ‍ॅड्रेस एंटर करा आणि त्यानंतर जोडा वर क्लिक करा. साइटवरील सर्व पॉप-अप ब्लॉक करण्यासाठी, [*.]example.com हा पॅटर्न वापरा.
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
11466802199865024058
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false