Chrome साठी टिपा आणि युक्त्या

आमच्या खालील काही टिपा वापरून Chrome चा पुरेपूर वापर करा.

तुमचे Google खाते वापरून Chrome मध्ये साइन इन करा

तुम्ही तुमचे Google खाते वापरून Chrome मध्ये साइन इन करता, तेव्हा तुम्ही खात्यामध्ये तुमचे पासवर्ड, बुकमार्क आणि इतर डेटा यांसारखे तपशील सेव्ह करू शकता. हे तुम्हाला ते तुम्ही साइन इन केलेल्या इतर डिव्हाइसवर वापरू देते.

तुमचे Google खाते वापरून Chrome मध्ये साइन इन कसे करावे ते जाणून घ्या.

तुमची स्वतःची प्रोफाइल तयार करा

प्रत्येकाची स्वतःची सेटिंग्ज, बुकमार्क आणि थीम असलेले एकाहून अधिक लोक एकाच डिव्हाइसवर Chrome वापरू शकतात.

तुमच्याकडे ऑफिस आणि वैयक्तिक अशी वेगवेगळी खाती असल्यास, तुम्ही तुमचे बुकमार्क, एक्सटेंशन आणि सेटिंग्ज वेगळे ठेवण्यासाठी Chrome प्रोफाइल वापरू शकता.

Chrome ची प्रोफाइल कशी जोडायची ते जाणून घ्या.

एक्स्टेंशन आणि थीमसह Chrome पर्सनलाइझ करा

एक्स्टेंशन किंवा मजेदार थीमसह Chrome पर्सनलाइझ करा. तुम्ही Chrome वेब स्टोअर मध्ये नवीन एक्स्टेंशन आणि थीम शोधू शकता.

  • एक्स्टेंशन ही अतिरिक्त वैशिष्ट्ये आहेत जी तुम्ही Chrome मध्ये जोडू शकता.
  • ब्राउझरच्या बॉर्डरवर थीम दिसतात आणि तुम्ही नवीन टॅब उघडल्यावर बॅकग्राउंड दाखवतात

थीमसह Chrome कसे कस्टमाइझ करायचे ते जाणून घ्या.

विशिष्ट पेज उघडा किंवा तुम्ही सोडले होते तेथून पुढे सुरू ठेवा

तुम्ही तुमच्या कॉंप्युटरवर पहिल्यांदा Chrome उघडल्यावर तुमचे आवडते पेज लोड करण्यासाठी Chrome सेट करा. तुम्ही शेवटी Chrome वापरले होते तेव्हा ते सोडल्यावर जी पेज खुली होती तेथून पुढे सुरू ठेवू शकता.

तुमची स्टार्टअप पेज कशी सेट करायची ते जाणून घ्या.

खाजगीमध्ये ब्राउझ करा किंवा तुमचा इतिहास हटवा

तुम्ही कोणत्या साइटवर जाता आणि काय डाउनलोड करता याचा रेकॉर्ड Google Chrome ने सेव्ह करू नये असे तुम्हाला वाटत असल्यास, तुम्ही गुप्त मोडमध्ये खाजगीरीत्या वेबवर ब्राउझ करू शकता. तुम्ही तुमचा इतिहास, कुकी आणि इतर माहितीदेखील हटवू शकता: ते सर्व काढून टाका किंवा विशिष्ट कालावधीमधील काही काढून टाका.

गुप्त मोड वापरणे आणि तुमची माहिती हटवणे हे कसे करावे ते जाणून घ्या.

तुमचे नवीन टॅब पेज पर्सनलाइझ करा

Chrome तुमच्या वेब ॲक्टिव्हिटीच्या आधारावर तुमच्यासाठी उपयुक्त असू शकतो असा आशय निवडते. नवीन टॅब पेजवरील Chrome कार्ड ही Google Drive फाइल आणि तुमची शॉपिंग कार्ट यांचा झटपट अ‍ॅक्सेस पुरवतात.

तुमचे नवीन टॅब पेज पर्सनलाइझ कसे करावे ते जाणून घ्या.

संबंधित स्रोत

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
2334147986384554553
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false