Chrome मध्ये टॅब व्यवस्थापित करणे

तुम्ही Chrome मध्ये एकाहून अधिक टॅब उघडू शकता. तुम्ही तुमचे सर्व टॅब पाहू शकता आणि त्यांदरम्यान स्विच करू शकता. तुम्ही नवीन टॅब उघडता, तेव्हा Chrome पर्सनलाइझ केलेले नवीन टॅब पेज उघडते.

तुम्ही पुढील काही मार्ग वापरून तुमच्या नवीन टॅब पेजचा आशय कस्टमाइझ करू शकता:

  • विविध थीम
  • तुमचे शॉर्टकट
तुमचे नवीन टॅब पेज कस्टमाइझ कसे करावे हे जाणून घ्या.

टॅबसह सामान्य कृती

तुम्ही Chrome वर वेबमध्ये शोधता, तेव्हा मूलभूत कृती करा.

एक नवीन टॅब उघडणे
  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Chrome Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी संगतवार ठेवा आणि त्यानंतर नवीन टॅब New tab वर टॅप करा.

टीप: तुमच्या Chrome विंडोच्या सर्वात वरती, तुम्ही नवीन टॅब New tab वर टॅप करता, तेव्हा तुम्ही नवीन टॅब देखील उघडू शकता.

टॅब बंद करणे
  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Chrome Chrome उघडा.
  2. ॲड्रेस बारच्या उजवीकडे, टॅब स्विच करा Switch tabs वर टॅप करा. कोणतेही उघडे टॅब दिसतील.
  3. तुम्हाला बंद करायच्या असलेल्या टॅबच्या सर्वात वरती उजवीकडे, बंद करा Close वर टॅप करा. तुम्ही टॅब बंद करण्यासाठी स्वाइपदेखील करू शकता.
सर्व टॅब बंद करणे
  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Chrome Chrome उघडा.
  2. ॲड्रेस बारच्या उजवीकडे, टॅब स्विच करा Switch tabs वर टॅप करा. कोणतेही उघडे टॅब दिसतील.
  3. आणखी आणखी आणि त्यानंतर सर्व टॅब बंद करा वर टॅप करा.
नवीन टॅबवर स्विच करणे
  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Chrome Chrome उघडा.
  2. ॲड्रेस बारच्या उजवीकडे, टॅब स्विच करा Switch tabs वर टॅप करा. कोणतेही उघडे टॅब दिसतील.
  3. तुम्हाला हव्या असलेल्या टॅबवर स्‍वाइप करा आणि त्यावर टॅप करा.
टॅब पुन्हा क्रमाने लावणे
  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Chrome Chrome उघडा.
  2. ॲड्रेस बारच्या उजवीकडे, टॅब स्विच करा Switch tabs वर टॅप करा.
  3. तुम्हाला हलवायच्या असलेल्या टॅबला स्पर्श करून धरून ठेवा.
  4. टॅब वेगळ्या स्थानावर ड्रॅग करा.
तुमच्या टॅबचा गट तयार करणे
  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Chrome उघडा.
  2. टॅब स्विच करा Switch tabs वर टॅप करा.
    • टॅब गट तयार करा:
      1. टॅबला स्पर्श करून धरून ठेवा.
      2. तुम्हाला तो ज्या दुसऱ्या टॅबशी गटबद्ध करायचा आहे, त्यावर ड्रॅग करा.
      3. टॅब गटाचे नाव एंटर करा.
      4. टॅब गटाचा रंग निवडा.
      5. पूर्ण झाले निवडा.
    • सद्य गटामध्ये टॅब जोडा:
      1. टॅबला स्पर्श करून धरून ठेवा.
      2. गटामध्ये टॅब ड्रॅग करा.
    • गटामध्ये टॅब शोधा: गट निवडा.
    • गटामधून टॅब काढून टाका:
      1. टॅब गटावर टॅप करा.
      2. तुम्हाला जो टॅब काढून टाकायचा आहे त्याला स्‍पर्श करून धरून ठेवा.
      3. तुमच्या स्क्रीनच्या तळाशी असलेल्या "गटामधून काढून टाका" भागावर टॅब ड्रॅग करा.

टिपा:

  • गटामधील नवीन टॅबमध्ये लिंक उघडण्यासाठी, लिंकला स्पर्श करून धरून ठेवा, त्यानंतर गटामधील नवीन टॅबमध्ये उघडा वर टॅप करा.
  • तुमच्या Android टॅबलेटवर:
    • टॅब स्ट्रिपमधील सद्य टॅब गटामध्ये टॅब जोडण्यासाठी, टॅब गटामध्ये ड्रॅग करा.
    • टॅब स्ट्रिपमधील टॅब गटामधून टॅब काढून टाकण्यासाठी, टॅब गटामधून बाहेर ड्रॅग करा.
टॅब गटामध्ये लिंक उघडणे
  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Chrome Chrome उघडा.
  2. तुम्हाला उघडायच्या असलेल्या लिंकवर नेव्हिगेट करा.
  3. लिंकला स्‍पर्श करून धरून ठेवा.
  4. गटामधील नवीन टॅबमध्ये उघडा वर टॅप करा.
टॅब रीलोड करणे
  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Chrome Chrome उघडा.
  2. अ‍ॅड्रेस बारच्या उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर रीलोड करा Reload वर टॅप करा.

टॅबवर बल्क कृती करा

तुम्ही आणखी वर टॅप करता किंवा टॅबना स्‍पर्श करून धरून ठेवता, तेव्हा बल्क कृती करू शकता.

टॅब बंद करणे
  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Chrome Chrome उघडा.
  2. ॲड्रेस बारच्या उजवीकडे, टॅब स्विच करा Switch tabs वर टॅप करा.
  3. आणखी आणि त्यानंतर टॅब निवडा वर टॅप करा.
  4. तुम्हाला बंद करायचे असलेले टॅब निवडा.
  5. आणखी आणि त्यानंतर टॅब बंद करा वर टॅप करा.
गट टॅब
  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Chrome Chrome उघडा.
  2. ॲड्रेस बारच्या उजवीकडे, टॅब स्विच करा Switch tabs वर टॅप करा.
  3. कोणत्याही टॅबला स्‍पर्श करून धरून ठेवा किंवा आणखी वर टॅप करा.
  4. टॅब निवडा वर टॅप करा.
  5. तुम्हा गट तयार करायचे असलेले टॅब निवडा.
  6. आणखी आणि त्यानंतर गट टॅब टॅप करा.
टॅब गटामधून काढून टाकणे
  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Chrome उघडा.
  2. ॲड्रेस बारच्या उजवीकडे, टॅब स्विच करा Switch tabs वर टॅप करा.
  3. तुम्हाला गटामधून काढून टाकायचे आहेत असे टॅब असलेला टॅब गट उघडा.
  4. कोणताही टॅब स्‍पर्श करून धरून ठेवा किंवा आणखी आणि त्यानंतर टॅब निवडा टॅप करा.
  5. तुम्हाला गटातून काढून टाकायचे असलेले टॅब निवडा.
  6. आणखी आणि त्यानंतर टॅब गटातून काढून टाका वर टॅप करा.
गटामधील टॅब बंद करणे
  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Chrome उघडा.
  2. ॲड्रेस बारच्या उजवीकडे, टॅब स्विच करा Switch tabs वर टॅप करा.
  3. तुम्हाला बंद करायचे आहेत असे टॅब असलेला टॅब गट उघडा.
  4. आणखी आणि त्यानंतर टॅब निवडा वर टॅप करा.
  5. तुम्हाला गटामधून हटवायचे असलेले टॅब निवडा.
  6. आणखी आणि त्यानंतर टॅब बंद करा वर टॅप करा.
टॅब शेअर करा
  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Chrome उघडा.
  2. ॲड्रेस बारच्या उजवीकडे, टॅब स्विच करा Switch tabs वर टॅप करा.
  3. कोणताही टॅब स्‍पर्श करून धरून ठेवा किंवा आणखी आणि त्यानंतर टॅब निवडा टॅप करा.
  4. तुम्हा शेअर करायचे असलेले टॅब निवडा.
  5. आणखी आणि त्यानंतर टॅब शेअर करा टॅप करा.
  6. तुम्हाला कुठे शेअर करायचे आहे ते निवडा.
गटामध्ये टॅब शेअर करणे
  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Chrome उघडा.
  2. ॲड्रेस बारच्या उजवीकडे, टॅब स्विच करा Switch tabs वर टॅप करा.
  3. तुम्हाला हवे आहेत असे टॅब असलेला टॅब गट उघडा.
  4. टॅब निवडा वर टॅप करा.
  5. तुम्हा शेअर करायचे असलेले टॅब निवडा.
  6. आणखी आणि त्यानंतर टॅब शेअर करा टॅप करा.
टॅब बुकमार्क करणे
  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Chrome उघडा.
  2. ॲड्रेस बारच्या उजवीकडे, टॅब स्विच करा Switch tabs वर टॅप करा.
  3. कोणताही टॅब स्‍पर्श करून धरून ठेवा किंवा आणखी आणि त्यानंतर टॅब निवडा टॅप करा.
  4. तुम्हाला बुकमार्क करायचे असलेले टॅब निवडा.
  5. आणखी आणि त्यानंतर टॅब बुकमार्क करा वर टॅप करा.

तुमच्या Android टॅबलेटवर Chrome मध्ये नवीन विंडो उघडा

तुम्ही एकावेळी कमाल पाच विंडो उघडू शकता आणि तुमच्या Android टॅबलेटवर एका विंडोमधून दुसऱ्या विंडोमध्ये टॅब हलवू शकता.

नवीन विंडो उघडा

  1. तुमच्या Android टॅबलेटवर, Chrome Chrome उघडा.
  2. आणखी आणखी आणि त्यानंतर नवीन विंडो वर टॅप करा.

दुसऱ्या विंडोवर टॅब हलवा

मेनूमधून टॅब हलवणे

  1. तुमच्या Android टॅबलेटवर, Chrome Chrome उघडा.
  2. तुम्हाला हलवायच्या असलेल्या टॅबमध्ये, आणखी आणखी वर टॅप करा.
  3. दुसऱ्या विंडोवर हलवा वर टॅप करा.
  4. टॅब हलवण्यासाठी विंडो निवडा.
  5. टॅब हलवा वर टॅप करा.

ड्रॅग करून ड्रॉप करून टॅब हलवणे

  1. तुमच्या Android टॅबलेटवर, Chrome Chrome उघडा.
  2. तुम्हाला हलवायच्या असलेल्या टॅबमध्ये, त्याला स्‍पर्श करून धरून ठेवा, त्यानंतर तो इतर विंडोवर ड्रॅग करा.
    • तुम्ही टॅब स्ट्रिप, टॅब स्विचर यांमध्ये किंवा इतर विंडोच्या साइट आशयावर टॅब ड्रॉप करू शकता.

टीप: तुम्ही साइट आशयावर टॅब ड्रॅग करता, तेव्हा त्या टॅबचा आशय हा साइट आशयाची जागा घेईल.

स्प्लिट स्क्रीन मोड एंटर करा

महत्त्वाचे: स्प्लिट स्क्रीन फक्त Samsung टॅबलेट वर काम करतो.

नवीन विंडो उघडण्यासाठी आणि स्प्लिट स्क्रीन ट्रिगर करण्यासाठी:

  1. तुमच्या Android टॅबलेटवर, Chrome Chrome उघडा.
  2. नवीन विंडोमध्ये टॅब उघडण्यासाठी, त्याला स्‍पर्श करून धरून ठेवा, त्यानंतर तो तुमच्या स्क्रीनच्या कडेवर ड्रॅग करून ड्रॉप करा.

विंडो स्विच करा

  1. तुमच्या Android टॅबलेटवर, Chrome Chrome उघडा.
  2. आणखी आणखीआणि त्यानंतर विंडो व्यवस्थापित करा वर टॅप करा.
  3. तुम्हाला उघडायच्या असलेल्या विंडोवर टॅप करा.

विंडो बंद करा

  1. तुमच्या Android टॅबलेटवर, Chrome Chrome उघडा.
  2. आणखी आणखीआणि त्यानंतर विंडो व्यवस्थापित करा वर टॅप करा.
  3. तुम्हाला बंद करायच्या असलेल्या विंडोच्या बाजूला, आणखी आणखी आणि त्यानंतर विंडो बंद करा वर टॅप करा.
  4. कंफर्म करण्यासाठी, विंडो बंद करा वर टॅप करा.

संबंधित स्रोत

true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
9472665740896811808
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false