एकाहून अधिक प्रोफाइलसह Chrome वापरणे

प्रोफाइलसह, तुम्ही बुकमार्क, इतिहास, पासवर्ड आणि इतर सेटिंग्ज यांसारखी तुमच्या Chrome मधील सर्व माहिती स्वतंत्र ठेवू शकता.

तुम्हाला पुढील गोष्टी करायच्या असतात, तेव्हा प्रोफाइल हा उत्तम पर्याय आहे:

  • कॉंप्युटर एकाहून अधिक लोकांसोबत शेअर करणे.
  • ऑफिस आणि वैयक्तिक यांसारखी वेगवेगळी खाती स्वतंत्र ठेवणे.

तुम्ही Chrome शेअर करता, तेव्हा इतर लोक कोणत्या गोष्टी पाहू शकतात

फक्त तुमचा विश्वास असलेल्या लोकांसोबतच डिव्हाइस शेअर करा. एखाद्याकडे तुमचे डिव्हाइस असल्यास, त्यावरील इतर कोणत्याही Chrome प्रोफाइलवर ते स्विच करू शकतात. त्यांनी तुमची Chrome प्रोफाइल उघडल्यास, तुम्ही कोणत्या वेबसाइटना भेट दिली यासारखी माहिती ते पाहू शकतात.

नवीन प्रोफाइल जोडणे

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, प्रोफाइल प्रोफाइल वर क्लिक करा.
  3. जोडा वर क्लिक करा.
  4. तुम्ही तुमच्या Google खाते मध्ये सिंक करणे निवडल्यास, तुमचे खात्याचे नाव हेच आपोआप तुमचे प्रोफाइल नाव होईल.
  5. नाव, फोटो आणि कलर स्कीम निवडा.

तुम्ही नवीन प्रोफाइलसाठी तुमचे Google खाते वापरून Chrome सिंक करणे सुरू करा निवडल्यास, तुमचे बुकमार्क, इतिहास, पासवर्ड आणि इतर सेटिंग्ज आपोआप सिंक होतील.

Chromebook वापरत आहात का? तुम्ही इतर लोकांना तुमच्या Chromebook मध्ये जोडून त्यांच्यासोबत तुमचे Chromebook शेअर करू शकता.

दुसऱ्या प्रोफाइलवर स्विच करणे

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, प्रोफाइल प्रोफाइल वर क्लिक करा.
  3. तुम्हाला ज्या प्रोफाइलवर स्विच करायचे आहे ती प्रोफाइल निवडा. 

Chromebook वापरत आहात का? तुम्ही तुमच्या Chromebook वर एकाच वेळी एकाहून अधिक खाती वापरणे हे करू शकता.

नाव, फोटो किंवा रंग बदलणे

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, प्रोफाइल प्रोफाइल वर क्लिक करा
  3. "इतर प्रोफाइल" च्या बाजूला, प्रोफाइल व्यवस्थापित करा Manage people निवडा
  4. तुम्हाला संपादित करायच्या असलेल्या प्रोफाइलच्या सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर संपादित करा वर क्लिक करा.
  5. नवीन नाव एंटर करा किंवा नवीन फोटो अथवा कलर थीम निवडा. बदल आपोआप सेव्ह केले जातात.

प्रोफाइल काढून टाकणे

महत्त्वाचे: तुम्ही Chrome वरून तुमची प्रोफाइल काढून टाकल्यानंतर, प्रोफाइलचे बुकमार्क, इतिहास, पासवर्ड आणि इतर सेटिंग्ज काँप्युटरमधून मिटवली जातात.

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, प्रोफाइल प्रोफाइल वर क्लिक करा.
  3. "इतर प्रोफाइल" च्या बाजूला, प्रोफाइल व्यवस्थापित करा Manage people निवडा.
  4. तुम्हाला जी प्रोफाइल काढून टाकायची आहे तिच्यावर पॉइंट करा.
  5. प्रोफाइलच्या सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर हटवा वर क्लिक करा.
  6. कंफर्म करण्यासाठी, हटवा वर क्लिक करा.

संबंधित स्रोत

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
17136098706994702819
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false