Chrome ची भाषा बदलणे आणि वेबपेजचे भाषांतर करणे

तुम्ही Chrome मध्ये तुमची प्राधान्य असलेली भाषा बदलू शकता. Chrome हे तुमच्यासाठी पेजचे भाषांतरदेखील करू शकते.

Chrome मध्ये वेबपेजचे भाषांतर करा

तुम्हाला समजत नसलेल्या भाषेमध्ये लिहिलेल्या पेजला तुम्ही भेट देता तेव्हा, तुम्ही पेजचे भाषांतर करण्यासाठी Chrome वापरू शकता.

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Chrome Chrome उघडा.
  2. दुसर्‍या भाषेमध्ये लिहिलेल्या वेबपेजवर जा.
  3. सर्वात वरती, तुम्हाला ज्या भाषेमध्ये भाषांतर करायचे आहे ती निवडा.
    • डीफॉल्ट भाषा बदलण्यासाठी, सेटिंग्ज सेटिंग्ज आणि त्यानंतर आणखी भाषा वर टॅप करा आणि भाषा निवडा.
  4. Chrome या एका वेळेला वेबपेजचे भाषांतर करेल.
    • पेजचे नेहमी या भाषेमध्ये भाषांतर करण्यासाठी, सेटिंग्ज आणि त्यानंतर नेहमी [language] मध्ये भाषांतर करा वर टॅप करा.

Chrome मध्ये भाषांतराची विनंती करा

तुम्हाला पेजच्या सर्वात वरती भाषांतर करा न आढळल्यास, तुम्ही भाषांतराची विनंती करू शकता.

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Chrome Chrome उघडा.
  2. आणखी Moreआणि त्यानंतर भाषांतर करा वर टॅप करा.

Chrome ने भाषांतर करण्याची सुविधा न दिल्यास, वेबपेज रिफ्रेश करून पाहा. तुम्ही अजूनही Translate वर टॅप करू शकत नसल्यास, भाषांतरासाठी भाषा कदाचित उपलब्ध नसेल.

भाषांतर करण्यासाठी मजकूर हायलाइट करणे

मजकुराचे भाषांतर करण्यासाठी:

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Chrome Chrome उघडा.
  2. दुसऱ्या भाषेमध्ये असलेल्या एखाद्या वेब पेजवर जा.
  3. तुम्हाला भाषांतर करायचा असलेला मजकूर हायलाइट करा.
  4. Google Translate वर टॅप करा.
    • टेक्‍स्‍ट-टू-स्‍पीच ला सपोर्ट असलेल्या भाषेमध्ये मजकूर प्ले करण्यासाठी, बोला वर टॅप करा.

टीप: ५००० पेक्षा जास्त वर्ण हायलाइट केले असल्यास, तुम्ही पूर्ण पेजचे भाषांतर करणे हे निवडू शकता.

भाषा बदलण्यासाठी:

  1. तुम्हाला बदलायच्या असलेल्या भाषेवर टॅप करा.
  2. तुम्हाला हवी असलेली भाषा शोधण्यासाठी स्क्रोल करा किंवा ती शोध बारमध्ये एंटर करा.
  3. भाषेवर टॅप करा.

तुमची डीफॉल्ट भाषांतर सेटिंग्ज बदला

बाय डीफॉल्ट, तुम्हाला समजत नसलेल्या भाषेमध्ये लिहिलेल्या पेजसाठी Chrome भाषांतर करण्यासाठी सुविधा देते.

भाषांतर बंद करा

Chrome ने वेबपेजचे भाषांतर करण्यासाठी सुविधा द्यावी कि नाही हे तुम्ही नियंत्रित करू शकता.

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Chrome अ‍ॅप Chrome उघडा.
  2. आणखी More आणि त्यानंतर सेटिंग्जसेटिंग्ज वर टॅप करा.
  3. भाषा वर टॅप करा.
  4. पेजचे भाषांतर करा बंद करा.

तुम्हाला माहित असलेल्या सर्व भाषा जोडा

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Chrome अ‍ॅप Chrome उघडा.
  2. आणखी More आणि त्यानंतर सेटिंग्जसेटिंग्ज वर टॅप करा.
  3. भाषा वर टॅप करा.
  4. भाषा जोडा वर टॅप करा.
  5. तुम्हाला माहित असलेल्या किंवा भाषांतर करायच्या असलेल्या भाषेवर टॅप करा. एकाहून अधिक भाषांमधील वेबसाइट तुमच्या प्राधान्यांनुसार उपलब्ध असलेल्या सर्वात पहिल्या भाषेमध्ये दाखवल्या जातील.

तुम्ही "कधीही भाषांतर करू नका" निवडल्यास, ते येथे दिसेल.

टीप: तुम्हाला तुमच्या सूचीमधील भाषेमध्ये भाषांतर करायचे असल्यास, भाषेवर टॅप करा आणि भाषांतर करण्याची सुविधा निवडा.

"नेहमी भाषांतर करा" पहिल्यासारखे करा

तुम्ही एखाद्या भाषेचे नेहमी भाषांतर करण्याचे निवडल्यास, तुम्ही तुमची भाषांतर प्राधान्ये पहिल्यासारखी करू शकता.

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Chrome अ‍ॅप Chrome उघडा.
  2. त्या भाषेमध्ये लिहिलेल्या वेबपेजवर जा. पेज आपोआप भाषांतर करण्यास सुरुवात करेल.
  3. सर्वात वरती, सेटिंग्ज आणि त्यानंतर कधीही भाषांतर करू नका [भाषा] वर टॅप करा.
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
6769196887696044792
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false