Chrome रिमोट डेस्कटॉप वापरून दुसरा काँप्युटर अ‍ॅक्सेस करणे

तुम्ही Chrome रिमोट डेस्कटॉप वापरून दुसऱ्या कॉंप्युटरवरील फाइल आणि अ‍ॅप्लिकेशन अ‍ॅक्सेस करण्यासाठी कॉंप्युटर किंवा मोबाइल डिव्हाइस वापरू शकता.

तुमच्या कॉंप्युटरवर, Chrome रिमोट डेस्कटॉप हे वेबवर उपलब्ध आहे. तुमचे मोबाइल डिव्हाइस रिमोट अ‍ॅक्सेससाठी वापरण्याकरिता, Chrome रिमोट डेस्कटॉप ॲप डाउनलोड करा.

टीप: अ‍ॅडमिनिस्ट्रेटर म्हणून, तुम्ही Chrome रिमोट डेस्कटॉप वापरून वापरकर्ता अ‍ॅक्सेस नियंत्रित करता. Chrome रिमोट डेस्कटॉप याचा वापर कसा नियंत्रित करावा ते जाणून घ्या.

तुमच्या कॉंप्युटरवर रिमोट अ‍ॅक्सेस सेट करा

तुम्ही तुमच्या Mac, Windows किंवा Linux कॉंप्युटरवर रिमोट अ‍ॅक्सेस सेट करू शकता.

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. अ‍ॅड्रेस बारमध्ये, remotedesktop.google.com/access एंटर करा.
  3. "रिमोट अ‍ॅक्सेस सेट करा" मध्ये, डाउनलोड करा Download page वर क्लिक करा.
  4. Chrome रिमोट डेस्कटॉप डाउनलोड आणि इंस्टॉल करण्यासाठी स्क्रीनवरील सूचना फॉलो करा.

Chrome रिमोट डेस्कटॉप अ‍ॅक्सेस देण्यासाठी तुम्हाला तुमचा कॉंप्युटर पासवर्ड एंटर करण्याची आवश्यकता असू शकते. तुम्हाला प्राधान्ये मध्ये सुरक्षा सेटिंग्ज बदलण्यासाठी सूचितदेखील केले जाऊ शकते.

Linux वर Chrome रिमोट डेस्कटॉप कसे वापरावे याबद्दल अधिक जाणून घ्या.

तुमचा काँप्युटर दुसर्‍या एखाद्या व्यक्तीसोबत शेअर करा

तुम्ही तुमच्या कॉंप्युटरचा रिमोट अ‍ॅक्सेस इतरांना देऊ शकता. त्यांना तुमची अ‍ॅप्स, फाइल, ईमेल, दस्तऐवज आणि इतिहास यांचा संपूर्ण अ‍ॅक्सेस असेल.

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वर अ‍ॅड्रेस बारमध्ये, remotedesktop.google.com/support एंटर करा आणि एंटर प्रेस करा.
  3. "सपोर्ट मिळवा" मध्ये, डाउनलोड करा Download page वर क्लिक करा.
  4. Chrome रिमोट डेस्कटॉप डाउनलोड आणि इंस्टॉल करण्यासाठी स्क्रीनवरील सूचना फॉलो करा.
  5. "सपोर्ट मिळवा" मध्ये, कोड जनरेट करा निवडा.
  6. कोड कॉपी करा आणि तुम्हाला तुमच्या कॉंप्युटरचा अ‍ॅक्सेस ज्या व्यक्तीला द्यायचा आहे त्याला पाठवा.
  7. ती व्यक्ती साइटवर तुमचा अ‍ॅक्सेस कोड एंटर करते, तेव्हा तुम्हाला त्यांच्या ईमेल ॲड्रेससह डायलॉग दिसेल. त्यांना तुमच्या कॉंप्युटरच्या संपूर्ण अ‍ॅक्सेसची अनुमती देण्यासाठी शेअर करा निवडा.
  8. शेअरिंग सेशन संपवण्यासाठी, शेअरिंग थांबवा वर क्लिक करा.

अ‍ॅक्सेस कोड फक्त एकदा काम करेल. तुम्ही तुमचा कॉंप्युटर शेअर करत असल्यास, तुम्हाला दर ३० मिनिटांनी तुमचा कॉंप्युटर शेअर करणे सुरू ठेवायचे आहे का त्याची खात्री करण्यासाठी सांगितले जाईल.

काँप्युटर रिमोट पद्धतीने अ‍ॅक्सेस करा

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वर ॲड्रेस बारमध्ये, remotedesktop.google.com/access एंटर करा आणिEnter दाबा.
  3. तुम्हाला कोणता कॉंप्युटर हवा आहे ते निवडण्यासाठी अ‍ॅक्सेस करा वर क्लिक करा.
  4. दुसरा कॉंप्युटर अ‍ॅक्सेस करण्यासाठी आवश्यक असलेला पिन एंटर करा.
  5. कनेक्ट करण्यासाठी अ‍ॅरो निवडा.

तुमच्या सुरक्षेसाठी, सर्व रिमोट डेस्कटॉप सेशन पूर्णपणे एन्क्रिप्ट केलेली असतात.

रिमोट सेशन थांबवा

तुमचे काम पूर्ण झाल्यावर, तुमचे सेशन थांबवण्यासाठी तुमचा टॅब बंद करा. तुम्ही पर्याय आणि त्यानंतर डिस्कनेक्ट करा देखील निवडू शकता.

तुमच्या सूचीमधून काँप्युटर हटवा

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वर ॲड्रेस बारमध्ये, remotedesktop.google.com/access एंटर करा आणि Enter दाबा.
  3. तुम्हाला काढून टाकायच्या असलेल्या कॉंप्युटरच्या बाजूला, रिमोट कनेक्शन बंद करा Remove वर क्लिक करा.

रिमोट पद्धतीने सपोर्ट द्या 

  1. एखाद्या व्यक्तीने त्याचा रिमोट अ‍ॅक्सेस कोड तुमच्यासोबत शेअर केल्यास, तुम्ही रिमोट पद्धतीने सपोर्ट देऊ शकता.
  2. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  3. सर्वात वर ॲड्रेस बारमध्ये, remotedesktop.google.com/support एंटर करा आणि Enter दाबा.
  4. "सपोर्ट द्या" मध्ये कोड एंटर करा आणि कनेक्ट करा वर क्लिक करा.
Linux वर Chrome रिमोट डेस्कटॉप वापरा

पहिली पायरी: होस्ट कंपोनंटसाठी Debian पॅकेज इंस्टॉल करा

64-बिट Debian पॅकेज येथे डाउनलोड करा.

दुसरी पायरी: रिमोट कनेक्शनना अनुमती द्या

वरील "तुमच्या कॉंप्युटरचा रिमोट अ‍ॅक्सेस सेट करा" विभागावर जा.

तिसरी पायरी (पर्यायी): तुमचे व्हर्च्युअल डेस्कटॉप सेशन कस्टमाइझ करा

तुम्ही पहिल्यांदा कनेक्ट करता, तेव्हा तुम्हाला डीफॉल्ट सेशन निवडकर्ता मिळेल जेथे तुम्ही तुमची डेस्कटॉप पद्धत निवडू शकता. तुम्हाला नेहमी विशिष्ट डेस्कटॉप पद्धत लाँच करायची असल्यास:

  1. तुमच्या पसंतीच्या डेस्कटॉप पद्धतीसाठी /usr/share/xsessions/ मध्ये .desktop फाइल शोधा. फाइलमध्ये, तुम्हाला सेशन सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या कमांडसह Exec= ने सुरू होणारी ओळ दिसेल.

    • उदाहरणार्थ, Cinnamon मध्ये cinnamon.desktop नावाची फाइल आहे. काही आवृत्त्यांमधील फाइलमध्ये पुढील कमांड असू शकते: gnome-session --session=cinnamon.
  2. तुमच्या होम डिरेक्टरीमध्ये .chrome-remote-desktop-session नावाची पुढील आशय असलेली फाइल तयार करा: exec /etc/X11/Xsession '<YOUR_EXEC_COMMAND>'.
  3. तुमच्या .desktop फाइलच्या शेवटी असलेल्या कमांडला <YOUR_EXEC_COMMAND> वर बदला.
    • Cinnamon च्या उदाहरणामध्ये, योग्य कमांड exec /etc/X11/Xsession 'gnome-session --session=cinnamon' आहे.
  4. $HOME/.chrome-remote-desktop-session नावाची फाइल सेव्ह करा. पुढील वेळी तुम्ही Chrome रिमोट डेस्कटॉप होस्ट रीस्टार्ट केल्यावर तुम्हाला हा बदल दिसेल.
  5. व्हर्च्युअल डेस्कटॉप सेशन तयार केले आहे आणि Chrome रिमोट डेस्कटॉप सुरू होतो तेव्हा .chrome-remote-desktop-session सेशन सुरू होते.

टीप: तुमच्या डेस्कटॉपची पद्धत एकावेळी एकाहून अधिक सेशनला कदाचित सपोर्ट करू शकत नाही. तसे असल्यास, तुम्ही तुमच्या Chrome रिमोट डेस्कटॉप सेशनसाठी आणि तुमच्या स्थानिक सेशनसाठी वेगळ्या डेस्कटॉप पद्धती वापरण्याची किंवा सेशन निवडकर्ता वापरण्याची आम्ही शिफारस करतो.

तुम्ही सेशन निवडकर्ता वापरल्यास, तुम्ही दुसऱ्या डेस्कटॉपवर त्याच डेस्कटॉप पद्धतीमध्ये साइन इन करण्यापूर्वी Chrome रिमोट डेस्कटॉप किंवा तुमच्या स्थानिक सेशनमधील डेस्कटॉप पद्धतीमधून साइन आउट करण्याची आम्ही शिफारस करतो.

Chrome रिमोट डेस्कटॉप काढून टाका

Windows
  1. तुम्हाला Chrome रिमोट डेस्कटॉप अ‍ॅक्सेस काढून टाकायच्या असलेल्या प्रत्येक कॉंप्युटरवरून, अ‍ॅप काढून टाका:
    1. कंट्रोल पॅनल आणि त्यानंतर प्रोग्राम आणि त्यानंतर प्रोग्राम जोडा/काढून टाका वर जा.
    2. "Chrome रिमोट डेस्कटॉप" ॲप्लिकेशन शोधा.
    3. काढून टाका वर क्लिक करा.
Mac
  1. तुम्हाला Chrome रिमोट डेस्कटॉप अ‍ॅक्सेस काढून टाकायच्या असलेल्या प्रत्येक कॉंप्युटरवरून, अ‍ॅप अनइंस्टॉल करा:
    1. "Chrome रिमोट डेस्कटॉप होस्ट अनइंस्टॉलर" ॲप्लिकेशन शोधा.
    2. अनइंस्टॉलर लाँच करा आणि अनइंस्टॉल करा वर क्लिक करा

ट्रबलशूटिंगशी संबंधित टिपा

तुम्हाला Chrome रिमोट डेस्कटॉप याच्याशी संबंधित समस्या येत असल्यास, या टिपा वापरून पहा:

  • कॉंप्युटर शेअर करण्यासाठी किंवा अ‍ॅक्सेस करण्यासाठी तुम्ही इंटरनेटशी कनेक्ट केलेले असणे आवश्यक आहे. पेज उघडत नसल्यास, तुमच्या कॉंप्युटरची नेटवर्क सेटिंग्ज तपासा.
  • अँटीव्हायरस सॉफ्टवेअर तुम्हाला Chrome रिमोट डेस्कटॉप वापरण्यापासून थांबवू शकते. तुम्हाला Chrome रिमोट डेस्कटॉप वापरण्यात समस्या येत असल्यास, तुमचा अँटिव्हायरस पुढील गोष्टींना अनुमती देत असल्याची खात्री करा:
    • आउटबाउंड UDP ट्रॅफिक
    • इनबाउंड UDP प्रतिसाद
    • TCP पोर्ट ४४३ (HTTPS) वरील ट्रॅफिक
    • ३४७८ (STUN) पोर्टच्या TCP आणि UDP वरील ट्रॅफिक
  • अ‍ॅक्सेस केला जाणारा काँप्युटर ऑफिस किंवा शाळेच्या नेटवर्कवर असल्यास, तो तुम्हाला कदाचित इतरांना अ‍ॅक्सेस देऊ देणार नाही. अधिक माहितीसाठी, तुमच्‍या अ‍ॅडमिनिस्‍ट्रेटरशी संपर्क साधा.
  • तुम्ही व्यवस्थापित केलेल्या खात्यावर असल्यास, तुमचा अ‍ॅडमिनिस्ट्रेटर हा तुमचा Chrome रिमोट डेस्कटॉपचा अ‍ॅक्सेस नियंत्रित करू शकतो. Chrome रिमोट डेस्कटॉप हे कसे व्यवस्थापित केले जाते ते जाणून घ्या.
  • तुम्ही Chrome किंवा Chrome OS ची नवीनतम आवृत्ती वापरत असल्याची खात्री करा.

तुम्हाला इतर कोणत्याही समस्या येत असल्यास, कृपया त्यांची Chrome मदत फोरम मध्ये तक्रार करा.

Chrome रिमोट डेस्कटॉप मध्ये सुधारणा करा

Chrome रिमोट डेस्कटॉप मध्ये सुधारणा कशी करावी ते जाणून घेण्यासाठी, Google हे नेटवर्कमधील विलंब आणि तुमचे सेशन किती काळ सुरू होते यांच्याबद्दल अ‍ॅनोनिमाइझ केलेला डेटा गोळा व स्टोअर करते.

Chrome रिमोट डेस्कटॉप बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, आमचे Google गोपनीयता धोरण पहा.

संबंधित स्रोत

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
5579456336205525108
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false