Chrome मध्ये उत्तरे मिळवण्यासाठी Gemini वेब अ‍ॅप वापरा

Gemini वेब ॲपचा थेट अ‍ॅक्सेस मिळवण्यासाठी तुम्ही आता Chrome चा साइट शॉर्टकट वापरू शकता.

तुम्हाला काय आवश्यक आहे

Gemini वेब अ‍ॅप वापरण्यासाठी, तुम्हाला पुढील गोष्टी आवश्यक आहेत:

  • तुम्ही स्वतः व्यवस्थापित करत असलेले वैयक्तिक Google खाते. तुम्ही तरीही Family Link द्वारे व्यवस्थापित केलेले Google खाते वापरून Gemini वेब ॲप अ‍ॅक्सेस करू शकत नाही. Gemini अ‍ॅप्स गोपनीयता नोटिस वाचा.
  • Gemini वेब अ‍ॅप वापरण्यासाठी आवश्यक किमान वयाची पूर्तता करणे:
    • युरोपियन इकॉनॉमिक एरिया (ईईए), स्वित्झर्लंड आणि यूके यांसाठी: तुमचे वय १८ वर्षे किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे.
    • Gemini वेब अ‍ॅप उपलब्ध असलेल्या इतर देशांसाठी: तुमचे वय १३ वर्षे (किंवा तुमच्या देशात लागू असलेले वय) अथवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे. तुमचे वय १८ वर्षांहून कमी असल्यास, तुम्ही Gemini वेब अ‍ॅप सध्या फक्त इंग्रजीमध्ये वापरू शकता.

तुम्ही कोणत्या भाषांमध्ये आणि देशांमध्ये Gemini वेब अ‍ॅप वापरू शकता याबद्दल जाणून घ्या.

Chrome मध्ये Gemini वेब अ‍ॅप वापरणे

महत्त्वाचे: तुम्ही तुमचे डीफॉल्ट शोध इंजीन म्हणून Gemini संपादित करू शकत नाही, हटवू शकत नाही किंवा सेट करू शकत नाही.

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. अ‍ॅड्रेस बारमध्ये, @gemini एंटर करा.
  3. टॅब किंवा स्पेस प्रेस करा.
    • तुम्ही सूचनांमध्ये Gemini सोबत चॅट करा हेदेखील निवडू शकता.
  4. तुमचा प्रॉम्प्ट एंटर करा.
  5. एंटर प्रेस करा.
    • प्रतिसाद मिळवण्यासाठी, तुम्हाला gemini.google.com वर रीडिरेक्ट केले जाईल.

टीप: तुम्ही सेटिंग्ज मध्ये Gemini साइट शॉर्टकट डीअ‍ॅक्टिव्हेट करू शकता. शोध इंजीन आणि साइट शॉर्टकट व्यवस्थापित करणे शिका.

संबंधित स्रोत

true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
16148781131036432029
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false