तुम्ही Chrome इंस्टॉल आणि अपडेट करता, तेव्हा तुमचा डेटा सुरक्षित कसा राहतो

तुम्हाला सॉफ्टवेअर, तसेच सिक्युरिटी पॅचच्या नवीनतम आवृत्त्यांसह अप टू डेट ठेवण्यासाठी Chrome च्या Windows आणि macOS आवृत्त्या व Google Chrome Apps लाँचर हे GoogleUpdater वापरते. आणखी जास्त पारदर्शकता देऊ करण्यासाठी आणि इतर अ‍ॅप्लिकेशनकरिता तंत्रज्ञान उपलब्ध करण्यासाठी, GoogleUpdater तंत्रज्ञान हे मुक्त स्रोत आहे.

Chrome इंस्टॉल आणि अपडेट कशी काम करतात

GoogleUpdater ही अशी सेवा आहे जी Chrome अप टू डेट ठेवण्यात मदत करते. ते नियमितपणे नवीन अपडेट तपासते आणि ती उपलब्ध असल्यावर इंस्टॉल करते.

GoogleUpdater अपडेट तपासते, तेव्हा ते Google ला तुमच्या पुढील गोष्टींविषयी माहिती पाठवते:

  • चॅनल रिलीझ
  • हार्डवेअरसंबंधित मूलभूत माहिती
  • Chrome ची सद्य आवृत्ती आणि ती इंस्टॉल केल्याचा कालावधी
  • तुम्ही अलीकडे Chrome किंवा Chrome Apps लाँचर वापरले आहे का

Chrome हे Google ला युनिक नसलेला ४ अक्षरी टॅगदेखील पाठवते, ज्यामध्ये तुम्ही Chrome कसे मिळवले याविषयी माहिती असते. या माहितीमुळे लोक Chrome कसे इंस्टॉल करतात हे समजण्यात Google ला मदत होते. तुम्हाला योग्य सॉफ्टवेअर अपडेट मिळाल्याची खात्री करण्यासाठी ती वापरली जाते.

Chrome च्या मोबाइल आवृत्त्यांवर, अपडेट ही Android वर Google Play Store द्वारे किंवा iOS वर Apple App Store द्वारे व्यवस्थापित केली जातात. मात्र, अ‍ॅक्टिव्ह इंस्टॉलेशन मोजण्यासाठी आणि तुमची Chrome ची आवृत्ती कालबाह्य झाल्याचे तुम्हाला सूचित करण्यासाठी, Chrome तरीही Google चे सर्व्हर वापरते.

Chrome एक्स्टेंशन आणि अ‍ॅप्लिकेशनदेखील Chrome अपडेट करण्यासाठी वापरलेली समान सिस्टीम वापरून अप टू डेट ठेवली जातात. या अपडेट विनंत्यांमध्ये समान माहिती समाविष्ट केलेली असते, जसे की अ‍ॅप्लिकेशन आयडी, अ‍ॅप्लिकेशन अलीकडे वापरले गेले होते की नाही आणि ते किती कालावधीसाठी इंस्टॉल केले आहे. अ‍ॅप्लिकेशन आणि एक्स्टेंशनची लोकप्रियता व वापर समजून घेण्यासाठी Google ही माहिती वापरते.

Chrome तुमच्या गोपनीयतेचे संरक्षण कसे करते

अ‍ॅक्टिव्ह Chrome इंस्टॉलेशन आणि स्वतंत्र एक्स्टेंशनच्या संख्येचा अंदाज लावण्यासाठी Google हे GoogleUpdater वरील एकत्रित डेटा वापरते. तुमची गोपनीयता जपली जाईल अशा प्रकारे हे केले जाते. प्रत्येक इंस्टॉलेशनसाठी आयडेंटिफायर असाइन करणे आवश्यक नसते आणि Google ला कालांतराने त्याच Chrome इंस्टॉलेशनच्या अपडेटशी जुळण्याची अनुमती देत नाही. त्याऐवजी, एकाहून अधिक वेळा मोजले जाणे टाळण्यासाठी अपडेटच्या प्रत्येक विनंतीमध्ये यापूर्वीच्या विनंतीच्या तारखेचा समावेश असतो. वापरकर्ता मोजण्याविषयी अधिक जाणून घ्या.

तुम्ही नियंत्रक आहात

संबंधित स्रोत

true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
10945833894831001737
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false