तुमचे स्थान शेअर करणे

साइटना तुमचे स्थान पाहण्याची अनुमती द्या आणि त्यावरून आणखी उपयुक्त माहिती मिळवा. उदाहरणार्थ, तुमचे स्थान शेअर करून, तुम्ही तुमच्या जवळपासचे खाद्यपदार्थ आणखी जलद शोधू शकता.

साइटला तुमचे स्थान जाणून घेऊ द्या

बाय डीफॉल्ट, साइटला तुमचे स्थान पाहायचे असल्यास, Chrome तुम्हाला विचारते. तुम्ही कुठे आहात ते साइटला जाणून घेऊ देण्यासाठी, अनुमती द्या निवडा. तुमचे स्थान शेअर करण्याआधी, साइटच्या गोपनीयता धोरणाचे पुनरावलोकन करा.

तुमच्या फोनवर तुमचे डीफॉल्ट शोध इंजीन म्हणून तुम्ही Google वापरत असल्यास, Google वरील तुमच्या शोधांसाठी बाय डीफॉल्ट तुमचे स्थान वापरले जाते.

तुमची डीफॉल्ट स्थान सेटिंग्ज बदलणे

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome Chrome उघडा.
  2. सर्वात वर उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर सेटिंग्ज वर क्लिक करा.
  3. गोपनीयता आणि सुरक्षा आणि त्यानंतर साइट सेटिंग्ज वर क्लिक करा.
  4. स्थान वर क्लिक करा.
  5. तुम्हाला तुमचे डीफॉल्ट सेटिंग म्हणून हवा असलेला पर्याय निवडा.

विशिष्ट साइटची सेटिंग्ज बदलण्याकरिता, अपवाद जोडणे आणि संपादित करणे कसे करावे ते जाणून घ्या.

शाळा किंवा ऑफिसमध्ये Chrome किंवा Chromebook वापरत आहात का? तुमचा नेटवर्क अ‍ॅडमिनिस्ट्रेटर कदाचित तुमच्यासाठी स्थान सेटिंग्ज सेट करू शकतो. व्यवस्थापित केलेले Chrome डिव्हाइस वापरण्याबद्दल जाणून घ्या.

महत्त्वाचे: तुम्ही Mac डेस्कटॉपवर Chrome वापरत असल्यास, "तुमच्या Mac सिस्टम प्राधान्यांमध्ये स्थान बंद केले आहे" अशी सूचना तुम्हाला मिळू शकते. तुमच्या काँप्युटरची स्थान प्राधान्ये अपडेट करण्यासाठी, स्क्रीनवरील सूचना फॉलो करा.

Chrome तुमचे स्थान कसे शेअर करते

तुम्ही Chrome ला तुमचे स्थान साइटसोबत शेअर करू दिल्यास, Chrome तुम्ही कुठे आहात याचा अंदाज घेण्यासाठी Google स्थान सेवा येथे माहिती पाठवते. त्यानंतर Chrome ती माहिती तुमचे स्थान हवे असलेल्या साइटसह शेअर करू शकते.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
10333481711360979809
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false