तुमचे स्थान शेअर करणे

साइटना तुमचे स्थान पाहण्याची अनुमती द्या आणि त्यावरून आणखी उपयुक्त माहिती मिळवा. उदाहरणार्थ, तुमचे स्थान शेअर करून, तुम्ही तुमच्या जवळपासचे खाद्यपदार्थ आणखी जलद शोधू शकता.

साइटला तुमचे स्थान जाणून घेऊ द्या

बाय डीफॉल्ट, साइटला तुमचे स्थान पाहायचे असल्यास, Chrome तुम्हाला विचारते. तुम्ही कुठे आहात ते साइटला जाणून घेऊ देण्यासाठी, अनुमती द्या निवडा. तुमचे स्थान शेअर करण्याआधी, साइटच्या गोपनीयता धोरणाचे पुनरावलोकन करा.

तुमच्या फोनवर तुमचे डीफॉल्ट शोध इंजीन म्हणून तुम्ही Google वापरत असल्यास, Google वरील तुमच्या शोधांसाठी बाय डीफॉल्ट तुमचे स्थान वापरले जाते.

तुमची डीफॉल्ट स्थान सेटिंग्ज बदला

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Chrome अ‍ॅप Chrome उघडा.
  2. अ‍ॅड्रेस बारच्या उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर सेटिंग्ज वर टॅप करा.
  3. साइट सेटिंग्ज आणि त्यानंतर स्थान वर टॅप करा.
  4. स्थान सुरू किंवा बंद करा.

विशिष्ट साइटची सेटिंग्ज बदलण्यासाठी, खाली सूचीबद्ध केलेल्या साइटच्या नावावर टॅप करा.

Google ला असलेला तुमच्‍या स्थानाचा अ‍ॅक्सेस बदला

Google तुमचे डीफॉल्ट शोध इंजीन असताना, अ‍ॅड्रेस बारमधील आणि Google वरील तुमच्या शोधांसाठी तुमचे स्थान वापरले जाते.

शोधांमध्ये तुमच्या स्थानाचा वापर थांबवण्यासाठी:

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Chrome अ‍ॅप Chrome उघडा.
  2. google.com सारख्या कोणत्याही Google Search पेजला भेट द्या.
  3. वेब अ‍ॅड्रेसच्या डावीकडे, पेजची माहिती Default (Secure) वर टॅप करा.
  4. परवानग्या आणि त्यानंतर स्थान अ‍ॅक्सेस वर टॅप करा.
  5. सध्याच्या शोध इंजीनसाठी ब्लॉक करा निवडा.

Chrome तुमचे स्थान कसे शेअर करते

तुम्ही Chrome ला तुमचे स्थान साइटसोबत शेअर करू दिल्यास, Chrome तुम्ही कुठे आहात याचा अंदाज घेण्यासाठी Google स्थान सेवा येथे माहिती पाठवते. त्यानंतर Chrome ती माहिती तुमचे स्थान हवे असलेल्या साइटसह शेअर करू शकते.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
13461167428358964319
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false