Chrome मधील डिव्‍हाइसवरील साइट डेटाविषयी जाणून घ्या

तुम्‍ही वेबसाइटना तुमच्‍या डिव्‍हाइसवर डेटा तात्‍पुरता सेव्ह करण्‍याची अनुमती देऊ शकता, जेणेकरून तुमचा वेबसाइटवरील अनुभव आणखी चांगला होईल. याला "डिव्हाइसवरील साइट डेटा" असे म्हणतात आणि तो सुरू केलेला असल्यावर, तुम्ही बाहेर पडता, तेव्हा तुमचे शॉपिंग कार्ट अ‍ॅक्टिव्ह ठेवण्यासारख्या गोष्टी करण्यात वेबसाइटना मदत करतो.

वेबसाइट तुमच्या डिव्हाइसवर डेटा कसा सेव्ह करते हे तुम्ही निवडू शकता:

  • साइटना तुमच्या डिव्हाइसवर डेटा सेव्ह करण्याची अनुमती द्या: साइट तुमच्या अपेक्षेप्रमाणे काम करण्याची अधिक शक्यता आहे.
  • तुम्ही सर्व विंडो बंद करता, तेव्हा साइटनी तुमच्या डिव्हाइसवर सेव्ह केलेला डेटा हटवा: साइट कदाचित तुमच्या अपेक्षेप्रमाणे काम करतील, पण त्यांनी एका भेटीपासून पुढील भेटीपर्यंत तुम्हाला लक्षात ठेवण्याची शक्यता कमी आहे.
  • साइटना तुमच्या डिव्हाइसवर डेटा सेव्ह करण्याची अनुमती देऊ नका (शिफारस केली जात नाही): साइट कदाचित तुमच्या अपेक्षेप्रमाणे काम करणार नाहीत. तुम्ही भेट देता त्या साइटबद्दलची माहिती तुमच्या डिव्हाइसवर तुम्हाला ठेवायची नसल्यास, हा पर्याय निवडा.

तुमच्या डिव्हाइसवर डिव्‍हाइसवरील साइट डेटा सेट करणे

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर सेटिंग्ज वर क्लिक करा.
  3. गोपनीयता आणि सुरक्षा आणि त्यानंतर साइट सेटिंग्ज वर क्लिक करा.
  4. अतिरिक्त आशय सेटिंग्ज आणि त्यानंतर डिव्‍हाइसवरील साइट डेटा वर क्लिक करा.
  5. डीफॉल्ट वर्तन निवडा.

संबंधित स्रोत

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
9502521250737075827
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false