Chrome मध्ये जाहिरातीसंबंधित गोपनीयता कशी काम करते

Chrome ची जाहिरातविषयक गोपनीयता वैशिष्‍ट्ये तुमच्या ऑनलाइन गोपनीयतेमध्ये सुधारणा करतात. त्यासोबतच, जाहिराती आणि जाहिरातींमुळे मिळणारा विनाशुल्क आशय व सेवा यांना ती सपोर्ट करतात.

Chrome ची जाहिरातीसंबंधित गोपनीयता कशी काम करते

तुम्ही भेट दिलेल्या साइट या त्यांचा आशय समृद्ध करण्यासाठी इतर साइटवरून आशय एंबेड करू शकतात, जसे की इमेज, जाहिराती आणि मजकूर. आज, तुम्ही वेब ब्राउझ करत असताना तुम्हाला ट्रॅक करण्यासाठी हा एंबेड केलेला आशय तृतीय पक्ष कुकी वापरू शकतो. आज तुम्ही कुकी ब्लॉक करण्याचे निवडू शकता, मात्र यामुळे बऱ्याच वेळा वेबसाइटच्या कार्यक्षमतेमध्ये व्यत्यय निर्माण होतो. Chrome मधील जाहिरातविषयक गोपनीयता वैशिष्‍ट्ये ट्रॅक न करता एकसमान ब्राउझिंग अनुभव देऊ शकतात.

हा सर्व २०२४ च्या उत्तरार्धात तृतीय पक्ष कुकीच्या नियोजित निर्मूलनाचा भाग आहे. अधिक खाजगी वेबच्या दिशेने हे फक्त पहिले पाऊल आहे. Chrome कालांतराने अधिक गोपनीयता संरक्षणे रोल आउट करत राहील.

Chrome हे तुमची गोपनीयता संरक्षित करण्यात कसे मदत करते

Ad Privacy APIs ही जाहिरात करण्यासाठी वापरली जातात, तेव्हा ती तुमची ओळख संरक्षित करतात आणि तुमच्याविषयी जाणून घेण्यासाठी साइट किती डेटा वापरू शकतात याचे प्रमाण कमी करतात. कसे ते येथे दिले आहे:

  • तुमची ओळख संरक्षित करणे: तुम्ही ब्राउझ करत असताना तुमची अ‍ॅक्टिव्हिटी ट्रॅक करण्याची साइटची क्षमता Ad Privacy APIs मर्यादित करतात. APIs ही तुम्हाला पुन्हा ओळखण्यापासूनदेखील संरक्षित करतात. उदाहरणार्थ, तुमची अ‍ॅक्टिव्हिटी आणि वेबसाइटवरील तुमची ओळख यासारखी ट्रॅकरकडे तुमच्याबाबत आधीपासून असलेली माहिती यानुसार, तुम्ही कोण आहात याचा अंदाज ट्रॅकर लावू शकतो.
    • Topics API हे तुमच्या अलीकडील ब्राउझिंग इतिहासावर आधारित तुमच्या स्वारस्यांची उच्च पातळीवरील माहिती साइटना देते. मूलतः अमर्यादित माहितीऐवजी, नवीन API साइटना कमाल तीन स्वारस्ये मिळवण्यासच अनुमती देते, जसे की "क्रीडा." हे कधीकधी रँडम स्वारस्यदेखील देते. आम्ही याला "रँडम डेटा जोडणे" असे संबोधतो आणि तुमची ओळख संरक्षित करण्यासाठी आम्ही हे करतो. या सर्वांचा अर्थ असा आहे, की Topics API हे ट्रॅकरला तुम्हाला ओळखण्यासाठी पुरेशी माहिती गोळा करणे अधिक कठीण करते. Topics API विषयी अधिक जाणून घ्या.
    • Protected Audience API हे साइटना तुमच्या डिव्हाइसवर फक्त मर्यादित ब्राउझिंग इतिहास स्टोअर करण्याची अनुमती देते. जाहिरात तंत्रज्ञान कंपन्या तुमच्या डिव्हाइसवर फक्त तुमच्या क्रॉस-साइट डेटावर प्रक्रिया करू शकतात. यामुळे तुम्हाला ओळखणे आणि तुमच्याविषयी माहिती गोळा करणे अधिक कठीण होते. Protected Audience API विषयी अधिक जाणून घ्या.
    • Attribution Reporting API हे सर्व साइट आणि ॲप्सवर तुमची अ‍ॅक्टिव्हिटी ट्रॅक न करता जाहिरातदारांना त्यांच्या ऑनलाइन जाहिरातींची परिणामकारकता मोजण्यात मदत करते. Topics प्रमाणे, हे API तुम्हाला ओळखण्यासाठी वापरल्या जाणार्‍या अस्पष्ट युनिक वैशिष्ट्यांमध्ये रँडम डेटादेखील जोडते. आणि ते अहवालांमध्ये वेळेचे विलंब जोडते, ज्यामुळे संपूर्ण डेटा सेटमध्ये तुमची अ‍ॅक्टिव्हिटी कनेक्ट करणेदेखील आणखी कठीण होते. ही संरक्षणे आज वापरकर्ता आयडेंटिफायरमुळे शक्य होणारे अनेक पुन्हा ओळखण्याचे हल्ले प्रतिबंधित करतात, ते आयडेंटिफायर अस्पष्ट आणि एन्क्रिप्ट केलेले असले तरीही. Attribution Reporting API विषयी अधिक जाणून घ्या.
  • डेटा संग्रह कमी करणे: आज, तृतीय पक्ष कुकीसारख्या तंत्रज्ञानांमुळे तुम्ही वेब ब्राउझ करत असताना जाहिरात तंत्रज्ञान कंपन्या तुमचा डेटा मोठ्या प्रमाणात गोळा करू शकतात. Ad Privacy APIs तुमच्याविषयी कधीही जाणून घेता येणारा डेटा मर्यादित करतात, विशेषतः तुम्ही एका साइटवरून दुसऱ्या साइटवर ब्राउझ करत असताना, तृतीय पक्षाच्या कुकी ब्लॉक केल्यानंतर तुमच्या गोपनीयतेमध्ये लक्षणीयरीत्या सुधारणा होते. APIs मुळे जाहिरात कंपन्यांना तुम्हाला ओळखणे खूप जास्त कठीण होते, म्हणजेच तुमच्यासोबत प्रोफाइल बिल्ड करणे आणि संलग्न करणे अधिक कठीण होते. APIs ही इतर डेटा मर्यादादेखील स्थापित करतात, जसे की:
    • Topics API हे तुमच्या अलीकडील ब्राउझिंग इतिहासाच्या आधारावर जाहिरातदारांना दर आठवड्याला फक्त काही विषय गोळा करण्यास मर्यादित करते. आज, तृतीय पक्ष कुकी आणि इतर आयडेंटिफायर हे जाहिरात तंत्रज्ञान कंपन्यांना कालांतराने तुमच्या जवळजवळ सर्व ब्राउझिंग इतिहासाच्या आधारावर तुमच्याविषयी अत्यंत तपशीलवार माहिती गोळा करण्याची अनुमती देतात.
    • तुम्ही पर्सनलाइझ केलेली जाहिरात पाहता, तेव्हा Protected Audience API हे डेटा कोणाला मिळतो आणि त्यांना कोणता डेटा मिळतो ते प्रतिबंधित करते. हे API वापरून, वेब पेजवर जाहिरात दाखवणाऱ्या प्रत्यक्ष कंपन्यांनाच त्या जाहिरात इंप्रेशनविषयी माहिती मिळते. याउलट, आज तृतीय पक्ष कुकी वापरणाऱ्या पेजवर पर्सनलाइझ केलेली जाहिरात दाखवली जाते, तेव्हा अनेक कंपन्या त्यांचा जाहिरात दाखवण्याशी काहीही संबंध नसला तरीही माहिती गोळा करू शकतात.
    • Attribution Reporting API हे दाखवलेल्या कोणत्याही जाहिरातीसाठी तुमच्याशी कनेक्ट केल्या जाऊ शकणार्‍या माहितीचे प्रमाण मर्यादित करते. आणि एकत्रित केलेल्या अहवालांसाठी, तुमची ओळख संरक्षित करण्याकरिता एकाच अहवालात अनेक वापरकर्ता अहवाल एकत्र करून, API हे मोजल्या जाऊ शकणार्‍या माहितीचे प्रकार प्रभावीपणे मर्यादित करते व रेकॉर्ड केलेल्या माहितीच्या रूपांतरणाचे प्रमाणदेखील मर्यादित करते. आज, ट्रॅकर हे तुमच्या अ‍ॅक्टिव्हिटीविषयी तपशीलवार माहितीसह अमर्यादित डेटा गोळा करू शकतात.
  • जाहिरात तंत्रज्ञान पुरवठादारांकडून आणखी जास्त जबाबदारी: जाहिरातींसाठी ही APIs वापरणाऱ्या जाहिरात तंत्रज्ञान कंपन्यांचा ट्रॅक ठेवून नवीन दृश्यमानता आणि जबाबदारी प्रदान करते. Chrome हे "अटेस्टेशन" मॉडेल वापरते, ज्यामुळे जाहिरात तंत्रज्ञान कंपन्यांनी त्यांना मिळणारा मर्यादित डेटा योग्य, गोपनीयतेचे संरक्षण करणाऱ्या पद्धतीने वापरण्यासाठी स्पष्टपणे आणि सार्वजनिकपणे वचनबद्ध करणे आवश्यक आहे. जाहिरात तंत्रज्ञान पुरवठादारांकडून आणखी जास्त जबाबदारीविषयी अधिक जाणून घ्या.
  • अधिक मजबूत वापरकर्ता नियंत्रणे: आज, तृतीय पक्ष कुकीसह तुमची जाहिरातीसंबंधित गोपनीयता व्यवस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. सातत्यपूर्ण साइन-इन सेवा यासारखे तृतीय पक्ष कुकीचे जाहिरातीवर आधारित नसलेले वापर गमावण्याची जोखीम घेऊन, तुम्ही तृतीय पक्ष कुकी पूर्णपणे बंद करू शकता किंवा तुम्ही तृतीय पक्ष कुकी अ‍ॅक्टिव्ह ठेवू शकता आणि शेकडो कुकी डोमेन व बऱ्याचदा ओळखण्यायोग्य नसलेले जाहिरात तंत्रज्ञान पुरवठादार क्रमाने लावू शकता. नवीन APIs वापरून, तुमची जाहिरातीसंबंधित ऑनलाइन गोपनीयता व्यवस्थापित करणे खूप सोपे आहे. उदाहरणार्थ, पर्सनलाइझ केलेल्या जाहिराती Protected Audience API द्वारे डिलिव्हर केल्या जातात, तेव्हा तुम्हाला पर्सनलाइझ केलेल्या जाहिराती दाखवण्यासाठी वापरायचे नसलेले विषय आणि साइट तुम्ही ब्लॉक करू शकता.
तुम्ही नियंत्रक आहात

महत्त्वाचे: वेबसाइटद्वारे दाखवलेल्या जाहिरातीदेखील साइटच्या धोरणांच्या अधीन असतात.

त्या साइट Ad Privacy APIs वापरतात, तेव्हा तुम्ही ब्राउझ करत असताना ही सेटिंग्ज तुम्हाला पर्सनलाइझ केलेल्या जाहिराती दाखवण्यासाठी वापरत असलेली माहिती प्रभावित करण्याची अनुमती देतात. तुम्ही तुमच्या Chrome सेटिंग्जमध्ये ही वैशिष्ट्ये कधीही बंद करू शकता. तुम्ही Chrome मध्ये कुकी साफ करणे, अनुमती देणे आणि व्यवस्थापित करणे हेदेखील करू शकता.

ही नवीन सेटिंग्ज आणि तृतीय पक्ष कुकीचे डेप्रिकेशन हे काम प्रगतीपथावर आहे. २०२४ च्या उत्तरार्धापासून Chrome मध्ये तृतीय पक्ष कुकी डेप्रिकेट केल्या जाईपर्यंत, नवीन Ad Privacy APIs द्वारे प्रदान केलेले संपूर्ण गोपनीयता फायदे लागू होणार नाहीत.

तुमची Chrome जाहिरातीसंबंधित गोपनीयता सेटिंग्ज बदलण्यासाठी:

कॉंप्युटर

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर सेटिंग्ज निवडा.
  3. गोपनीयता आणि सुरक्षा आणि त्यानंतर जाहिरातीसंबंधित गोपनीयता निवडा.
  4. तुम्हाला सुरू किंवा बंद करायचे असलेले जाहिरात वैशिष्ट्य निवडा.

Android

  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Chrome Chrome उघडा.
  2. आणखी आणखीआणि त्यानंतर सेटिंग्ज वर टॅप करा.
  3. गोपनीयता आणि सुरक्षा आणि त्यानंतर जाहिरातीसंबंधित गोपनीयता वर टॅप करा.
  4. तुम्हाला सुरू किंवा बंद करायचे असलेले जाहिरात वैशिष्ट्य निवडा.

iOS

iOS डिव्हाइसवरील Chrome साठी जाहिरातीसंबंधित गोपनीयता सेटिंग्ज उपलब्ध नाहीत.

संबंधित स्रोत

true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
4648512022666353128
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false