Chrome मध्ये iPhone आणि iPad साठी इव्हेंट कार्यक्षमता जोडणे

तुम्ही Chrome मधून बाहेर न पडता कॅलेंडर इव्हेंट तयार करू शकता.

तुमच्या कॅलेंडर ॲपवर प्रगत वैशिष्ट्ये वापरा

प्रगत वैशिष्‍ट्ये वापरण्‍यासाठी, तुम्‍ही Google Calendar ॲप डाउनलोड करणे आणि तुमच्‍या Google खाते मध्ये साइन इन करणे आवश्‍यक आहे.

तुमच्या Google Calendar मध्ये साइटवरून इव्हेंट जोडणे

  • महत्त्वाचे:
    • तुम्ही कोणत्या कॅलेंडरमध्ये (वैयक्तिक किंवा कौटुंबिक) इव्हेंट सेव्ह करायचा हे निवडू शकता.
    • तुम्ही इव्हेंटमध्ये संपर्क किंवा विशिष्ट तारखा आणि वेळा यासारखी वैशिष्ट्ये जोडू शकता.
  1. वेबसाइटवर, तारखेला स्‍पर्श करून धरून ठेवा.
  2. Google Calendar मध्ये जोडा वर टॅप करा.
  3. सर्वात वरती, इव्हेंट तपशील जोडा किंवा संपादित करा.
    • पर्यायी: तळाशी, इव्हेंटमध्ये लोक, स्थाने आणि आणखी बरेच काही जोडण्यासाठी Google Calendar उघडा… वर टॅप करा.
  4. सर्वात वरती उजवीकडे, सेव्ह करा वर टॅप करा.
    • तुमचा इव्हेंट सेव्ह केला असल्यास कंफर्मेशन दिसेल.

Apple Calendar मध्ये साइटवरून इव्हेंट जोडणे

तुम्ही Apple Calendar मध्ये इव्हेंट जोडणेदेखील निवडू शकता, पण इव्हेंटमध्ये लोक, स्थाने आणि आणखी बरेच काही जोडण्याचा पर्याय तुमच्याकडे नसेल. 

  1. वेबसाइटवर, तारखेला स्‍पर्श करून धरून ठेवा.
  2. Apple Calendar वर जोडा वर टॅप करा.
  3. सर्वात वरती, इव्हेंट तपशील जोडा किंवा संपादित करा.
  4. सर्वात वरती उजवीकडे, जोडा वर टॅप करा.
    • तुमचा इव्हेंट सेव्ह केला असल्यास कंफर्मेशन दिसेल.

संबंधित स्रोत

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
10098383098791486310
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false