Chrome तुमची URL आणि शोध डेटा खाजगी कसा ठेवते

तुमच्या Google Chrome ब्राउझर विंडोच्या वरती, एकत्रित केलेला वेब अ‍ॅड्रेस आणि शोध बार आहे. तुम्ही अ‍ॅड्रेस बारवर फोकस करता आणि त्यामध्ये टाइप करता, तेव्हा तो तुमच्या डिव्हाइसचा ब्राउझिंग इतिहास व तुमचे डीफॉल्ट शोध इंजीन यांवर आधारित वेब अ‍ॅड्रेस आणि शोध क्वेरी दाखवतो. तुम्ही Chrome ची शोध इंजीन सेटिंग्ज यामध्ये शोध इंजीनने दिलेल्या डीफॉल्ट सूचना व्यवस्थापित करू शकता.

अ‍ॅड्रेस बार कसा काम करतो

सूचना आणि शोध परिणाम आणखी झटपट देण्यासाठी, Chrome हे बॅकग्राउंडमध्ये तुमच्या डीफॉल्ट शोध इंजीनशी आधीच कनेक्ट करू शकते.

"शोध आणि URLs ऑटोकंप्लीट करा" सेटिंग सुरू केलेले असल्यास, तुम्ही अ‍ॅड्रेस बारवर फोकस करता किंवा त्यामध्ये टाइप करता, तेव्हा Chrome हे तुमच्या डीफॉल्ट शोध इंजीनला डेटा पाठवते. तुम्ही टाइप करत असताना, तुमच्या शोध क्वेरी ऑटोकंप्लीट करण्यासाठी सूचना देण्याकरिता मजकूर पाठवला जातो. तसेच, Google हे तुमचे डीफॉल्ट शोध इंजीन असल्यास व तुम्ही तुमचा इतिहास तुमच्या Google खाते शी सिंक केला असल्यास, तुमचा आयपी अ‍ॅड्रेस, तुमच्या कॉंप्युटरवर "कुकी" म्हणून स्टोअर केलेली शोध माहिती आणि सध्याची URL या सर्व गोष्टी सर्वात सुसंबद्ध सूचना शोधण्यासाठी पाठवल्या जातात.

"Chrome ची वैशिष्ट्ये आणि परफॉर्मन्स यांमध्ये सुधारणा करण्यात मदत करा" हे सेटिंग सुरू केलेले असल्यास, सूचना वैशिष्ट्यामध्ये सुधारणा करण्यासाठी Chrome हे Google ला डेटादेखील परत पाठवते. तुम्ही सूचना निवडता, तेव्हा Chrome हे निवडलेल्या सूचनेबद्दल माहिती पाठवते, जसे की तो शोध होता की URL, तुम्ही ती निवडण्यापूर्वी किती वर्ण टाइप केले आणि परिणामांच्या सूचीमधील तिचे स्थान. पाठवलेल्या डेटामध्ये तुम्ही टाइप केलेला अचूक मजकूर किंवा तुम्ही निवडलेली URL समाविष्ट नसते.

तुमचे डीफॉल्ट शोध इंजीन Google नसल्यास, सूचना आणि शोध क्वेरी यांच्याशी संबंधित तुमच्या विनंत्या त्या शोध इंजीनच्या गोपनीयता धोरणांतर्गत लॉग केल्या जातात.

आम्ही तुमच्या डेटाचे संरक्षण कसे करतो

तुम्ही पासवर्ड, स्थानिक फाइल नावे किंवा पाथ असलेल्या HTTPS URLs यासारख्या विशिष्ट प्रकारांची संवेदनशील माहिती अ‍ॅड्रेस बारमध्ये एंटर करता, तेव्हा Chrome ते डिटेक्ट करते. तुम्ही एंटर केलेल्या मजकुरामध्ये संवेदनशील माहिती असू शकते असे Chrome ने निर्धारित केल्यास, सूचना ऑटोकंप्लीट करण्यासाठी Chrome तो मजकूर पाठवत नाही.

तुम्ही तुमचा ब्राउझिंग इतिहास तुमच्या Google खाते शी सिंक केला असल्यास, Chrome ला संबंधित शोध सूचना देण्यासाठी Google तुमचा ब्राउझिंग इतिहास वापरते. तुम्ही तुमच्या ब्राउझिंग इतिहासामधून URL हटवल्यास, यापुढे तुमच्या पर्सनलाइझ केलेल्या सूचनांवर परिणाम होत नाही. तुम्ही तुमच्या ब्राउझिंग इतिहासामधील आयटम न हटवल्यास, तुमची Google खाते सेटिंग्ज यानुसार ते तुमच्या Google खाते मध्ये कमाल एक वर्ष स्टोअर केले जातात.

गुप्त मोडमध्ये, तुम्ही सूचना निवडेपर्यंत, Chrome तुमच्या शोध इंजीनला कोणतीही माहिती पाठवत नाही.

तुम्ही नियंत्रक आहात

सूचित केलेला वेब अ‍ॅड्रेस आणि शोध सेटिंग्ज बदलणे

तुम्ही टाइप केलेला मजकूर तुमच्या डीफॉल्ट शोध इंजीनला पाठवावा की नाही हे नियंत्रित करण्यासाठी:

कॉंप्युटर

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी संगतवार ठेवा आणि त्यानंतर सेटिंग्ज आणि त्यानंतर तुम्ही आणि Google निवडा.
  3. सिंक आणि Google सेवा निवडा.
  4. शोध सूचनांमध्ये सुधारणा करा हे सुरू किंवा बंद करा.

Android

  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Chrome Chrome उघडा.
  2. अधिक संगतवार ठेवा आणि त्यानंतर सेटिंग्ज Settings आणि त्यानंतर Google सेवा वर टॅप करा.
  3. शोध सूचनांमध्ये सुधारणा करा हे सुरू किंवा बंद करा.

iOS

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Chrome Chrome उघडा.
  2. तळाशी उजवीकडे, आणखी संगतवार ठेवा आणि त्यानंतर सेटिंग्ज Settings आणि त्यानंतर Google सेवा वर टॅप करा.
  3. शोध सूचनांमध्ये सुधारणा करा हे सुरू किंवा बंद करा.

टीप: हे सेटिंग बंद केलेले असले, तरीही Chrome हे तुमचा स्थानिक शोध आणि ब्राउझिंग इतिहास यावर आधारित सूचना ऑफर करू शकते. तुम्ही तुमच्या शोध इंजीनच्या सेटिंग्जमध्ये शोध इतिहास व्यवस्थापित करू शकता. तुमच्या Chrome ब्राउझिंग इतिहासाची सेटिंग्ज कशी व्यवस्थापित करावी हे जाणून घ्या.

Google Drive च्या शोध सूचनांशी संबंधित सेटिंग्ज व्यवस्थापित करणे

तुम्ही तुमचा इतिहास तुमच्या Google खाते सह सिंक केल्यास, तुम्हाला तुमच्या Google Drive फाइलकडून सूचना मिळू शकतात.

कॉंप्युटर

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. आणखी संगतवार ठेवा आणि त्यानंतर सेटिंग्ज आणि त्यानंतर तुम्ही आणि Google निवडा.
  3. सिंक आणि Google सेवा निवडा.
  4. Google Drive च्या सूचना दाखवा हे सुरू किंवा बंद करा.

संबंधित स्रोत

true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
5848979811863962713
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false