Chrome मध्ये तुमची जाहिरातीसंबंधित गोपनीयता व्यवस्थापित करणे

तुम्ही ब्राउझ करत असताना Chrome तुम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी आणि तुमच्या गोपनीयतेचे संरक्षण करण्यासाठी काम करते. नवीन वैशिष्‍ट्ये तुमच्या ओळखीचे संरक्षण करण्यात मदत करतात आणि तुम्हाला दाखवायच्या असलेल्या जाहिराती जाहिरातदार कसे निवडतात यावर अधिक नियंत्रण देतात. ही नवीन वैशिष्ट्ये काँप्युटर आणि Android डिव्हाइसवर हळूहळू रोल आउट होतील.

तुम्ही ब्राउझ करता त्या साइट आणि तुम्ही त्यांना किती वेळा भेट देता यावर आधारित Chrome हे तुम्हाला स्वारस्य असलेल्या विषयांची नोंद ठेवते. साइट तुमच्या स्वारस्यांबद्दलची माहिती Chrome वापरून स्टोअरदेखील करू शकतात. तुम्ही ब्राउझिंग करत राहता, तसे तुम्हाला आणखी पर्सनलाइझ केलेला जाहिरात अनुभव देण्यासाठी, Chrome हे जाहिरातीचे विषय किंवा साइटने सुचवलेल्या जाहिरातींविषयी स्टोअर केलेली माहिती शेअर करण्याची विनंती करू शकते. जाहिरातींचा परफॉर्मन्स मोजण्यासाठी, साइट आणि अ‍ॅप्सदरम्यान मर्यादित प्रकारांचा डेटा शेअर केला जाऊ शकतो.

तुम्ही Chrome सेटिंग्जमध्ये कधीही या वैशिष्ट्यांची निवड रद्द करू शकता. तुम्ही ब्राउझ करत असताना, तुम्हाला मिळणारी जाहिरात या सेटिंग्ज आणि तुम्ही भेट देत असलेल्या साइटच्या धोरणांनुसार पर्सनलाइझ केली जाऊ शकते.

जाहिरात गोपनीयता सेटिंग्ज संपादित करणे

  1. तुमच्या डिव्हाइसवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वर उजवीकडे, आणखी आणि त्यानंतर सेटिंग्ज वर टॅप करा.
  3. गोपनीयता आणि सुरक्षा आणि त्यानंतर जाहिरातीसंबंधित गोपनीयता वर टॅप करा.
  4. तुम्हाला सुरू किंवा बंद करायचे असलेले जाहिरात वैशिष्ट्य निवडा.
जाहिरातीचे विषय व्यवस्थापित करणे

तुमचा जाहिरात अनुभव पर्सनलाइझ करण्यासाठी, तुम्ही ब्राउझ करता त्या साइट आणि तुम्ही त्यांना किती वारंवार भेट देता यावर आधारित Chrome हे तुम्हाला स्वारस्ये असलेल्या विषयांची नोंद ठेवते. Chrome हे साइटसह एका वेळी तीन स्वारस्ये शेअर करू शकते. तुम्हाला साइटसोबत शेअर करायचे नसलेले विषय तुम्ही ब्लॉक करू शकता. विषय ब्लॉक केल्यावर, Chrome पुन्हा तो विषय शेअर करणार नाही, पण तुम्हाला त्या विषयाशी संबंधित जाहिराती दिसू शकतात. तुमच्‍या गोपनीयतेचे आणखी संरक्षण करण्‍यासाठी, Chrome हे ४ आठवड्यांपेक्षा जुने असलेले तुमच्‍या आवडीचे विषय आपोआप हटवते.

विषय ब्लॉक करण्यासाठी:

  1. तुमच्या डिव्हाइसवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वर उजवीकडे, आणखी आणि त्यानंतर सेटिंग्ज वर टॅप करा.
  3. गोपनीयता आणि सुरक्षा आणि त्यानंतर जाहिरातीसंबंधित गोपनीयता आणि त्यानंतर जाहिरातीचे विषय वर टॅप करा.
  4. "तुमचे विषय" या अंतर्गत, ब्लॉक करायचे असलेले विषय निवडा.

टिपा:

  • अलीकडील ब्राउझिंग इतिहासावर आधारित, विषयांची सूची दिसण्यासाठी याला थोडा वेळ लागू शकतो. तुम्ही भेट देता त्या साइटने हे वैशिष्ट्य स्वीकारले नसल्यास, तुम्हाला विषयांची सूचीदेखील मिळू शकत नाही.
  • साइटवर असताना, Chrome ने तुमचे स्वारस्य असलेले विषय साइटसोबत शेअर केले आहात का हे तुम्ही तपासू शकता. अ‍ॅड्रेस बारमध्ये, साइटची माहिती पहा Default (Secure) आणि त्यानंतर जाहिरातीसंबंधित गोपनीयता वर टॅप करा.
साइटने सुचवलेल्या जाहिराती व्यवस्थापित करणे

पर्सनलाइझ केलेला जाहिरात अनुभव डिलिव्हर करण्यात मदत करण्यासाठी, साइटची शिफारस केली जाऊ शकते आणि यानंतर तुम्हाला आवडू शकतात या गोष्टींविषयीच्या जाहिरात सूचना स्टोअर केल्या जाऊ शकतात. तुम्ही ब्राउझ करणे पुढे सुरू ठेवता, तसे तुम्हाला संबंधित साइटवरील सूचनांवर आधारित जाहिराती दिसू शकतात. Chrome हे ३० दिवसांपेक्षा जुन्या असलेल्या सूचना आपोआप हटवते, पण तुम्ही त्या साइटला पुन्हा भेट दिल्यास, त्या पुन्हा दिसू शकतात.

साइटने तुम्हाला जाहिरात सुचवू नये असे वाटत असल्यास, तुम्ही साइट ब्लॉक करू शकता. ब्लॉक केल्यानंतर, जाहिरात सूचनेशी संबंधित कोणताही डेटा हटवला जातो. ब्लॉक केलेल्या साइट आता Chrome सह जाहिरात सूचना स्टोअर करणार नाहीत, पण तुम्हाला तरीही त्या साइटशी संबंधित जाहिराती दिसू शकतात.

साइट ब्लॉक करण्यासाठी:

  1. तुमच्या डिव्हाइसवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वर उजवीकडे, आणखी आणि त्यानंतर सेटिंग्ज वर टॅप करा.
  3. गोपनीयता आणि सुरक्षा आणि त्यानंतर जाहिरातीसंबंधित गोपनीयता आणि त्यानंतर साइटने सुचवलेल्या जाहिराती वर टॅप करा.
  4. "साइट" या अंतर्गत, सूचीमधून साइट ब्लॉक करा.

टिपा:

  • अलीकडील ब्राउझिंग इतिहासावर आधारित, साइटची सूची दिसण्यासाठी याला थोडा वेळ लागू शकतो. तुम्ही भेट देता त्या साइटने हे वैशिष्ट्य स्वीकारले नसल्यास, तुम्हाला साइटची सूचीदेखील मिळू शकत नाही.
  • साइटवर असताना, साइट तुमच्यासाठी जाहिराती सुचवत आहे का हे तुम्ही तपासू शकता. अ‍ॅड्रेस बारमध्ये, साइटची माहिती पहा Default (Secure) आणि त्यानंतर जाहिरातीसंबंधित गोपनीयता वर टॅप करा.
जाहिरात मापन
तुम्ही ब्राउझ करत असताना, साइट या जाहिरातीच्या परफॉर्मन्सचे मापन करण्यासाठी मर्यादित प्रमाणात डेटा शेअर करतात, जसे की तुम्ही साइटला भेट दिल्यानंतर खरेदी केली आहे का.

संबंधित स्रोत

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
459720437759830808
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false