Chrome मध्ये पासकी व्यवस्थापित करणे

तुम्ही फक्त फिंगरप्रिंट, फेस स्कॅन किंवा स्क्रीन लॉक वापरून सहज आणि सुरक्षितपणे साइन इन करण्यासाठी पासकी वापरू शकता. पासकी या पासवर्डशिवाय तुमचे Google खाते आणि तुमच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या सर्व साइट व अ‍ॅप्समध्ये साइन इन करण्याचा एक सोपा आणि सुरक्षित मार्ग आहे. तुमच्या खात्याच्या सुरक्षेमध्ये सुधारणा करण्यासाठी तुम्हाला पासकी वापरून वेबसाइटवर साइन इन करण्यास किंवा पासकी तयार करण्यास सांगितले जाऊ शकते.

पासवर्डऐवजी पासकी वापरून साइन इन कसे करावे हे जाणून घ्या.

टीप: पासकी या औद्योगिक मानकांवर तयार केल्या जातात, त्यामुळे तुम्ही त्या अनेक प्लॅटफॉर्मवर वापरू शकता.

पासकीबद्दल आणखी उपयुक्त माहिती

पासकी या क्रिप्टोग्राफिक की पेअर आहेत, हा पासकी आणि पासवर्डमधील फरक आहे. की पेअर ही वेबसाइटशी संबंधित आहे. अर्धा भाग वेबसाइटशी शेअर केला जातो आणि उरलेला अर्धा भाग खाजगी असून, तो तुमच्या डिव्हाइसवर किंवा पासवर्ड व्यवस्थापकामध्ये सेव्ह केला जातो. हे तंत्रज्ञान वेबसाइट्स आणि ॲप्सचा तुमचा अ‍ॅक्सेस ऑथेंटिकेट करण्यासाठी, चोरीला जाऊ शकतो किंवा लीक होऊ शकतो अशा पासवर्डऐवजी सुरक्षितपणे जनरेट केलेला कोड वापरते.

पासकीच्या फायद्यांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:

  • तुम्हाला अक्षरे, अंक आणि वर्णांचा क्रम लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही.
  • तुम्ही फिंगरप्रिंट किंवा फेशियल रेकग्निशन तंत्रज्ञान वापरून खात्यांमध्ये साइन इन करू शकता.
  • तुम्ही वेबसाइट आणि अ‍ॅप या दोन्हीसह वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम व ब्राउझर व्यवस्था यांवर पासकी वापरू शकता.
  • पासकी या कधीही अंदाज लावता येणार नाहीत किंवा पुन्हा वापरता येणार नाहीत एवढ्या मजबूत असतात, त्यामुळे त्या हॅकरच्या प्रयत्नांपासून सुरक्षित राहतात.
  • पासकी या ज्या अ‍ॅप किंवा वेबसाइटसाठी तयार केल्या होत्या त्यांच्याशी कनेक्ट केलेल्या असतात, जेणेकरून कपटपूर्ण अ‍ॅप अथवा वेबसाइटमध्ये साइन इन करण्यासाठी तुमच्या पासकी वापरायला लावून तुम्हाला कधीही फसवले जाऊ शकत नाही.
  • Google Password Manager च्या पासकी या सर्व Android अ‍ॅप्सवर उपलब्ध आहेत.

पासकी वापरणे

तुम्ही तुमच्या डिव्हाइसवर पासकी स्टोअर करू शकता. प्रत्येक ऑपरेटिंग सिस्टीमसाठी प्रक्रिया वेगळी आहे आणि सर्व सिस्टीमवर उपलब्ध नसू शकते.

Windows मध्ये पासकी स्टोअर करणे

तुमच्याकडे Windows 10 किंवा त्यावरील आवृत्ती असल्यास, तुम्ही पासकी वापरू शकता. पासकी स्टोअर करण्यासाठी, तुम्ही Windows Hello सेट करणे आवश्यक आहे. Windows Hello सध्या सिंक्रोनायझेशन किंवा बॅकअपला सपोर्ट करत नाही, त्यामुळे पासकी फक्त तुमच्या कॉंप्युटरवर सेव्ह केल्या जातात. तुमचा कॉंप्युटर हरवला असेल किंवा ऑपरेटिंग सिस्टीम पुन्हा इंस्टॉल केली असेल, तर तुम्ही तुमच्या पासकी रिकव्‍हर करू शकत नाही.

पासकी व्यवस्थापन आणि पासकी ऑटोफिल वापरण्यासाठी, तुमच्या कॉंप्युटरवर Windows 11, आवृत्ती 22H2 किंवा त्यानंतरची आवृत्ती असणे आवश्यक आहे.

Windows मध्ये पासकी व्यवस्थापित करा
  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. आणखी आणखी आणि त्यानंतर पासवर्ड आणि ऑटोफिल आणि त्यानंतर Google Password Manager निवडा.
  3. डावीकडे, सेटिंग्ज आणि त्यानंतर पासकी व्यवस्थापित करा वर क्लिक करा.

टीप: एक किंवा अधिक पासकी तयार केल्यावरच "पासकी व्यवस्थापित करा" दिसते.

macOS मध्ये पासकी स्टोअर करणे

तुम्ही तुमच्या Chrome प्रोफाइलमध्ये पासकी सेव्ह करू शकता, जेथे त्या macOS Keychain द्वारे संरक्षित आहेत.  

महत्त्वाचे: Chrome हे iCloud Keychain मध्ये स्टोअर केलेल्या पासकी सेव्ह करू किंवा वापरू शकत नाही. तुमचा काँप्युटर हरवल्यास किंवा Chrome प्रोफाइल हटवली गेल्यास, तुम्ही तुमच्या पासकी रिकव्हर करू शकत नाही.

macOS मध्ये पासकी व्यवस्थापित करा
  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. आणखी आणखी आणि त्यानंतर पासवर्ड आणि ऑटोफिल आणि त्यानंतर Google Password Manager निवडा.
  3. डावीकडे, सेटिंग्ज आणि त्यानंतर पासकी व्यवस्थापित करा निवडा.

टीप: एक किंवा अधिक पासकी तयार केल्यावरच "पासकी व्यवस्थापित करा" दिसते.

सिक्युरिटी कीवर पासकी स्टोअर करणे

तुम्ही तुमच्या पासकी स्टोअर करण्यासाठी सिक्युरिटी की वापरू शकता.

महत्त्वाचे: सिक्युरिटी कीवर स्टोअर केलेल्या पासकीचा बॅकअप घेतला जात नाही. तुम्ही सिक्युरिटी की गमवल्यास किंवा रीसेट केल्यास, तुम्ही तुमच्या पासकी रिकव्हर करू शकत नाही.

दुसऱ्या डिव्हाइसवर पासकी वापरणे

तुम्ही दुसऱ्या डिव्हाइसवर पासकी तयार करण्यासाठी आणि वापरण्यासाठी तुमच्या काँप्युटरवर Chrome वापरू शकता. तुमच्या पासकी दुसऱ्या डिव्हाइसवर राहतात.

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. तुम्ही लॉग इन करू इच्छित असलेल्या साइटच्या साइन-इन पेजवर जा.
  3. तुमची पासकी वापरण्याची सूचना मिळेल, तेव्हा वेगळे डिव्हाइस निवडा.
    • तुम्हाला कदाचित दुसरा मार्ग वापरून पहा निवडावे लागेल.
  4. तुमचे Android किंवा iOS डिव्हाइस वापरून QR कोड स्कॅन करा.

टीप: तुम्ही Android डिव्हाइसवर QR कोड स्कॅन केल्यानंतर, तुम्ही तुमचा कॉंप्युटर लक्षात ठेवण्याचा पर्याय निवडू शकता. तुम्ही तसे केल्यास, तुम्हाला पासकीची आवश्यकता असते, तेव्हा कॉंप्युटर पर्याय म्हणून तुमचे Android डिव्हाइस दाखवतो. तुम्ही ते निवडता, तेव्हा तुमच्या ओळखीची पडताळणी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या डिव्हाइसवर सूचना मिळेल.

संबंधित स्रोत

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
15470843166982865924
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false