Chrome मध्ये पासकी व्यवस्थापित करणे

तुम्ही फक्त फिंगरप्रिंट, फेस स्कॅन किंवा स्क्रीन लॉक वापरून सहज आणि सुरक्षितपणे साइन इन करण्यासाठी पासकी वापरू शकता. पासकी या पासवर्डशिवाय तुमचे Google खाते आणि तुमच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या सर्व साइट व अ‍ॅप्समध्ये साइन इन करण्याचा एक सोपा आणि सुरक्षित मार्ग आहे. तुमच्या खात्याच्या सुरक्षेमध्ये सुधारणा करण्यासाठी तुम्हाला पासकी वापरून वेबसाइटवर साइन इन करण्यास किंवा पासकी तयार करण्यास सांगितले जाऊ शकते.

पासवर्डऐवजी पासकी वापरून साइन इन कसे करावे हे जाणून घ्या.

टीप: पासकी या औद्योगिक मानकांवर तयार केल्या जातात, त्यामुळे तुम्ही त्या अनेक प्लॅटफॉर्मवर वापरू शकता.

पासकीबद्दल आणखी उपयुक्त माहिती

पासकी या क्रिप्टोग्राफिक की पेअर आहेत, हा पासकी आणि पासवर्डमधील फरक आहे. की पेअर ही वेबसाइटशी संबंधित आहे. अर्धा भाग वेबसाइटशी शेअर केला जातो आणि उरलेला अर्धा भाग खाजगी असून, तो तुमच्या डिव्हाइसवर किंवा पासवर्ड व्यवस्थापकामध्ये सेव्ह केला जातो. हे तंत्रज्ञान वेबसाइट्स आणि ॲप्सचा तुमचा अ‍ॅक्सेस ऑथेंटिकेट करण्यासाठी, चोरीला जाऊ शकतो किंवा लीक होऊ शकतो अशा पासवर्डऐवजी सुरक्षितपणे जनरेट केलेला कोड वापरते.

पासकीच्या फायद्यांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:

  • तुम्हाला अक्षरे, अंक आणि वर्णांचा क्रम लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही.
  • तुम्ही फिंगरप्रिंट किंवा फेशियल रेकग्निशन तंत्रज्ञान वापरून खात्यांमध्ये साइन इन करू शकता.
  • तुम्ही वेबसाइट आणि अ‍ॅप या दोन्हीसह वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम व ब्राउझर व्यवस्था यांवर पासकी वापरू शकता.
  • पासकी या कधीही अंदाज लावता येणार नाहीत किंवा पुन्हा वापरता येणार नाहीत एवढ्या मजबूत असतात, त्यामुळे त्या हॅकरच्या प्रयत्नांपासून सुरक्षित राहतात.
  • पासकी या ज्या अ‍ॅप किंवा वेबसाइटसाठी तयार केल्या होत्या त्यांच्याशी कनेक्ट केलेल्या असतात, जेणेकरून कपटपूर्ण अ‍ॅप अथवा वेबसाइटमध्ये साइन इन करण्यासाठी तुमच्या पासकी वापरायला लावून तुम्हाला कधीही फसवले जाऊ शकत नाही.
  • Google Password Manager च्या पासकी या सर्व Android अ‍ॅप्सवर उपलब्ध आहेत.

पासकी वापरणे

तुम्ही तुमच्या डिव्हाइसवर पासकी स्टोअर करू शकता. प्रत्येक ऑपरेटिंग सिस्टीमसाठी प्रक्रिया वेगळी आहे आणि सर्व सिस्टीमवर उपलब्ध नसू शकते.

Android डिव्हाइसवर पासकी स्टोअर करा

महत्त्वाचे: पासकी स्टोअर करण्यासाठी, तुमच्या डिव्हाइसवर Android 9.0 किंवा त्यावरील आवृत्ती असणे आणि स्क्रीन लॉक सुरू असणे आवश्यक आहे.

तुम्ही तुमच्या Android डिव्हाइसवर पासकी वापरता, तेव्हा त्या तुमच्या Google Password Manager मध्ये स्टोअर केल्या जातात. पासकीचा सुरक्षितपणे बॅकअप घेतला जातो आणि त्या तुमच्या Android डिव्हाइसदरम्यान सिंक केल्या जातात.

पासवर्डवरून पासकीवर स्विच करणे

 पासवर्डवरून पासकीवर स्विच करा

तुमचे साइन इन सोपे करण्यासाठी पासकी तयार करा.

पासकी वापरून साइन इन करणे

 पासकी वापरून साइन इन करा

तुम्ही तुमच्या Google खाते मध्ये साइन इन करता, तेव्हा तुमच्या उपलब्ध पासकी सूचीबद्ध केल्या जातात.

पासकी व्यवस्थापित करणे
  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, तुमची सेटिंग्ज उघडा.
  2. पासवर्ड निवडा.

टीप: तुम्‍ही तुमचे Android डिव्‍हाइस गमावल्‍यास, तुम्‍ही नवीन डिव्हाइसवर तुमच्‍या पासकी रिकव्‍हर करू शकता. तुमच्या खात्यात साइन इन करा आणि तुमच्या हरवलेल्या डिव्हाइसचा सुरक्षा पिन, पॅटर्न किंवा पासवर्ड द्या.

दुसऱ्या डिव्हाइसवर पासकी वापरणे

तुम्ही दुसऱ्या डिव्हाइसवर पासकी तयार करण्यासाठी आणि वापरण्यासाठी तुमच्या काँप्युटरवर Chrome वापरू शकता. तुमच्या पासकी दुसऱ्या डिव्हाइसवर राहतात.

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. तुम्ही लॉग इन करू इच्छित असलेल्या साइटच्या साइन-इन पेजवर जा.
  3. तुमची पासकी वापरण्याची सूचना मिळेल, तेव्हा वेगळे डिव्हाइस निवडा.
    • तुम्हाला कदाचित दुसरा मार्ग वापरून पहा निवडावे लागेल.
  4. तुमचे Android किंवा iOS डिव्हाइस वापरून QR कोड स्कॅन करा.

टीप: तुम्ही Android डिव्हाइसवर QR कोड स्कॅन केल्यानंतर, तुम्ही तुमचा कॉंप्युटर लक्षात ठेवण्याचा पर्याय निवडू शकता. तुम्ही तसे केल्यास, तुम्हाला पासकीची आवश्यकता असते, तेव्हा कॉंप्युटर पर्याय म्हणून तुमचे Android डिव्हाइस दाखवतो. तुम्ही ते निवडता, तेव्हा तुमच्या ओळखीची पडताळणी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या डिव्हाइसवर सूचना मिळेल.

संबंधित स्रोत

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
669325884025000872
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false