Chrome चा परफॉर्मन्स पर्सनलाइझ करा

Chrome च्या परफॉर्मन्स सेटिंग्जसह, तुम्ही पुढील गोष्टी करू शकता:

  • अ‍ॅक्टिव्ह टॅबना सहज रन करण्यात मदत करणे
  • विशिष्ट साइटना डीअ‍ॅक्टिव्हेट होण्यापासून प्रतिबंधित करणे
  • तुमच्या कॉंप्युटरची बॅटरी लाइफ वाढवणे
  • झटपट ब्राउझ करणे आणि शोधणे

महत्त्वाचे: तुम्ही iOS आणि Android असलेल्या मोबाइल डिव्हाइसवरील Chrome चा परफॉर्मन्स पर्सनलाइझ करू शकत नाही. Chrome चा वेग वाढवण्याच्या इतर मार्गांबद्दल जाणून घ्या.

मेमरी सेव्हर सुरू किंवा बंद करणे

तुमच्या कॉंप्युटरची मेमरी वाचवण्यासाठी आणि अ‍ॅक्टिव्ह टॅब सुरळीतपणे रन होण्यात मदत करण्यासाठी, Chrome हे तुम्ही सध्या वापरत नसलेले टॅब डीॲक्टिव्हेट करते. तुम्ही इनॅक्टिव्ह टॅब अ‍ॅक्सेस करता, तेव्हा तो आपोआप रीलोड होतो.

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणि त्यानंतर सेटिंग्ज निवडा.
  3. डावीकडे, परफॉर्मन्स निवडा.
  4. मेमरी सेव्हर सुरू किंवा बंद करा.

टिपा:

  • तुमचे अ‍ॅक्टिव्ह व्हिडिओ आणि गेमिंग टॅब सुरळीतपणे रन होण्यात मदत करण्यासाठी, मेमरी सेव्हर सुरू करा.
  • तुमच्या कॉंप्युटरवरील काही सेटिंग्ज आणि अ‍ॅक्टिव्हिटी या टॅब डीअ‍ॅक्टिव्हेट करणे प्रतिबंधित करू शकतात.
    • अ‍ॅक्टिव्ह ऑडिओ किंवा व्हिडिओ (प्लेबॅक अथवा कॉल)
    • स्क्रीन शेअर
    • पेज सूचना
    • अ‍ॅक्टिव्ह डाउनलोड
    • अंशतः भरलेले फॉर्म
    • पिन केलेले टॅब
    • कनेक्ट केलेली डिव्हाइस (USB किंवा ब्लूटूथ)
टॅब मेमरीचा वापर सुरू किंवा बंद करा
  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणि त्यानंतर सेटिंग्ज निवडा.
  3. डावीकडे, स्वरूप निवडा.
  4. मेमरीचा वापर दाखवा सुरू किंवा बंद करण्यासाठी:
    • Windows, Linux आणि ChromeOS: "कर्सर फिरवून दिसणारे पूर्वावलोकन कार्ड" याअंतर्गत, टॅब मेमरी वापर दाखवा सुरू किंवा बंद करा.
    • Mac: टॅबच्या कर्सर फिरवून दिसणाऱ्या पूर्वावलोकन कार्डवर मेमरीचा वापर दाखवा सुरू किंवा बंद करा.
विशिष्ट साइट अ‍ॅक्टिव्ह ठेवणे

साइट डीॲक्टिव्हेट होणे टाळण्यासाठी, ती तुमच्या “या साइट नेहमी अ‍ॅक्टिव्ह ठेवा” याच्या वगळण्यासंबंधित सूचीमध्ये जोडा.

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणि त्यानंतर सेटिंग्ज निवडा.
  3. डावीकडे, परफॉर्मन्स निवडा.
  4. “या साइट नेहमी अ‍ॅक्टिव्ह ठेवा” च्या उजवीकडे, जोडा निवडा.
  5. इथून पुढे २ पर्याय आहेत:
    • सध्याच्या साइट जोडणे: टॅबमध्ये सध्या साइट उघड्या आहेत त्यांपैकी उपलब्ध असलेल्या साइटमधून निवडा.
      1. तुम्हाला जोडायच्या असलेल्या साइटच्या डावीकडील बॉक्स निवडा आणि जोडा वर क्लिक करा.
      2. मागे जाण्यासाठी, रद्द करा निवडा.
    • साइटना मॅन्युअली जोडा
      1. वेब अ‍ॅड्रेस एंटर करा.
      2. जोडा निवडा.
      3. मागे जाण्यासाठी, रद्द करा निवडा.

टीप: साइट मॅन्‍युअली वगळण्याशी संबंधित धोरणाचा वेब अ‍ॅड्रेस फॉरमॅट पुढील प्रमाणे आहे: [scheme://][.]host[:port][/path][@query].

तुम्हाला पुढील गोष्टी वगळायच्या असल्यास, साइट मॅन्युअली कशा जोडाव्यात याची ही काही उदाहरणे आहेत:

  • संपूर्ण डोमेन आणि सबडोमेन: URL स्कीम वगळा. उदाहरणार्थ, google.com हे drive.google.com आणि calendar.google.com यांसारख्या सबडोमेनचे डीअ‍ॅक्टिव्हेशन जुळवते आणि रोखते.
  • विशिष्ट डोमेन, पण कोणतेही सबडोमेन नाही: URL होस्टच्या आधी बिंदू (.) समाविष्ट करा. उदाहरणार्थ, .google.com हे www.google.com, drive.google.com, आणि calendar.google.com यांसारख्या सबडोमेनचे डीअ‍ॅक्टिव्हेशन जुळवणार आणि रोखणार नाही.
  • विशिष्ट उपडिरेक्टरी: URL पाथ समाविष्ट करा. उदाहरणार्थ, www.google.com/finance हे Google Finance च्या सर्व पेजचे डीअ‍ॅक्टिव्हेशन जुळवते आणि रोखते, पण www.google.com च्या मुख्य पेजचे डीअ‍ॅक्टिव्हेशन रोखणार नाही.
  • URL होस्ट आणि क्वेरी कंपोनंट: अ‍ॅस्टेरिस्क (*) हे वाइल्डकार्ड म्हणून वापरले जाऊ शकतात. उदाहरणार्थ, https://* हे सर्व HTTPS साइट आणि youtube.com/watch?v=* हे YouTube व्हिडिओचे डीअ‍ॅक्टिव्हेशन जुळवते व रोखते.
    • उपसर्ग, प्रत्यय किंवा URL होस्ट कंपोनंटच्या सबस्‍ट्रिंग जुळण्या यांच्यासाठी असलेल्या वाइल्डकार्डना सपोर्ट नाही. उदाहरणार्थ, *oogle.com किंवा google.com/* हे डीअ‍ॅक्टिव्हेशन जुळवणार आणि रोखणार नाही.
एनर्जी सेव्हर सुरू किंवा बंद करणे

तुमच्या डिव्हाइसची बॅटरी वाढवण्यासाठी, Chrome त्याचे इमेज कॅप्चर रेट आणि इतर बॅकग्राउंडमधील टास्क कमी करते. एनर्जी सेव्हर सुरू असताना, तुमचे डिव्हाइस अनप्लग केले असेल किंवा तुमची बॅटरी कमी असेल, तेव्हा तो आपोआप काम करतो. तुमचे डिव्हाइस प्लग इन केलेले असताना एनर्जी सेव्हर सुरू होत नाही.

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणि त्यानंतर सेटिंग्ज निवडा.
  3. डावीकडे, परफॉर्मन्स निवडा.
  4. एनर्जी सेव्हर सुरू किंवा बंद करा.
  5. तुम्हाला हवे असलेले सेटिंग निवडा.

टिपा:

  • लांबची रोड ट्रिप किंवा विमान प्रवासासाठी तुमच्या डिव्हाइसची बॅटरी वाढवण्याकरिता, एनर्जी सेव्हर सुरू करा.
  • एनर्जी सेव्हर सुरू असतो, तेव्हा तुम्हाला गेमिंग आणि व्हिडिओच्या परफॉर्मन्समध्ये बदल दिसू शकतात.
  • एनर्जी सेव्हर हे Windows, Mac आणि ChromeOS डिव्हाइसवर इंस्टॉल केलेल्या बॅटरीसह उपलब्ध आहे.
पेज प्रीलोड करणे सुरू किंवा बंद करणे

आणखी जलद ब्राउझ करण्यासाठी आणि शोधण्यासाठी, तुम्ही भेट देण्याची शक्यता असलेली पेज Chrome प्रीलोड करते. तुम्ही कुकीना अनुमती दिल्यास, पेज प्रीलोड करण्यासाठी Chrome हे कुकी वापरू शकते आणि साइटपासून तुमची ओळख लपवण्याकरिता पेज एन्क्रिप्ट करून Google द्वारे पाठवू शकते. कुकीबद्दल अधिक जाणून घ्या.

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणि त्यानंतर सेटिंग्ज निवडा.
  3. डावीकडे, परफॉर्मन्स निवडा.
  4. पेज प्रीलोड करा सुरू किंवा बंद करा.
  5. तुम्हाला हवे असलेले सेटिंग निवडा.

टिपा:

  • तुम्ही भेट देण्याची शक्यता असलेली काही पेज प्रीलोड करण्यासाठी, साधारण प्रीलोडिंग निवडा.
  • तुम्ही भेट देण्याची शक्यता असलेली आणखी काही पेज प्रीलोड करण्यासाठी, विस्तारित प्रीलोडिंग निवडा.

संबंधित स्रोत

true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
14221643444866179013
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false