USB, सिरीअल किंवा HID डिव्हाइसशी वेबसाइट कनेक्ट करणे

Chrome हे तुम्हाला तुमच्या कॉंप्युटरच्या USB, सिरीअल आणि HID डिव्हाइसशी वेबसाइट कनेक्ट करू देते. उदाहरणार्थ, कीबोर्ड, हेडसेट, स्पीकर, गेमपॅड, कॅमेरा आणि मायक्रोकंट्रोलरदेखील. Android वर, तुम्ही वेबसाइट USB डिव्हाइसशी कनेक्ट करू शकता.

महत्त्वाचे: सध्या, iPhone आणि iPad हे USB, सिरीअल किंवा HID डिव्हाइसना Chrome मधील वेबपेजशी कनेक्ट करण्याची अनुमती देत नाहीत.

तुमच्या डिव्हाइसचा अ‍ॅक्सेस कधी द्यायचा

फक्त विश्वसनीय साइटला डिव्हाइसचा अ‍ॅक्सेस द्या. तुम्ही वेबसाइट तुमच्या डिव्हाइसशी पेअर केल्यास, साइटला डिव्हाइसवरील सर्व माहिती मिळते आणि ती डिव्हाइस रीप्रोग्रामदेखील करू शकते. तुम्ही तुमच्या कॉंप्युटरवरील या डिव्हाइससाठी डीफॉल्ट परवानगी सेटिंग्ज निवडू शकता.

  1. Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर सेटिंग्ज वर क्लिक करा.
  3. गोपनीयता आणि सुरक्षा आणि त्यानंतर साइट सेटिंग्ज आणि त्यानंतर अतिरिक्त परवानग्या वर क्लिक करा.
  4. तुमच्या डिव्हाइसचा प्रकार निवडा:
    • USB डिव्हाइस
    • सिरीअल पोर्ट
    • HID डिव्हाइस
  5. डीफॉल्ट सेटिंग निवडण्यासाठी, पर्याय निवडा.

Chrome मधील वेबपेज तुमच्या डिव्हाइसशी पेअर करा

  1. योग्य केबल वापरून तुमचे डिव्हाइस कनेक्ट करा.
    • तुम्ही ब्लूटूथद्वारेदेखील तुमचे डिव्हाइस हे HID डिव्हाइसशी कनेक्ट करू शकता.
  2. Chrome मध्ये, तुमच्या डिव्हाइसशी कनेक्ट करू शकणारे वेबपेज उघडा.
  3. पेजवर क्लिक किंवा टॅप करा. तुम्हाला डिव्हाइस जोडण्यास सांगितले जाईल.
  4. सूचीमधून डिव्हाइस निवडा.
  5. पेअर करा किंवा कनेक्ट करा निवडा.

टीप: कनेक्‍ट केलेले डिव्हाइस Linux सिस्‍टीम अ‍ॅक्सेस करण्यासाठी, udev नियम योग्य प्रकारे कॉंफिगर करणे आवश्यक आहे.

तुमच्या डिव्हाइसवरील वेबसाइटचा अ‍ॅक्सेस काढून टाका

  1. वेब अ‍ॅड्रेसच्या डावीकडे, साइटची माहिती पहा Default (Secure) वर टॅप करा.
  2. USB डिव्हाइस, सिरीअल पोर्ट किंवा HID डिव्हाइसच्या बाजूला, काढून टाका काढून टाका वर टॅप करा.
Chrome मधील USB डिव्हाइसबद्दल अधिक जाणून घ्या
युनिव्हर्सल सिरीअल बस (USB) हे वायर केलेल्या एक्स्टेंशनसाठीचे मानक आहे. डिव्हाइस हे कोणत्या वैशिष्ट्यांना आणि कोणत्या डेटा फॉरमॅटना सपोर्ट करते हे USB “डिव्हाइसचे वर्ग” यामध्ये नमूद केलेले असते.
साधारण डिव्हाइस वर्गांमध्ये कीबोर्ड, माउस, ऑडिओ, व्हिडिओ आणि स्टोरेज डिव्हाइस यांचा समावेश असतो. USB डिव्हाइससाठीचे Chrome Enterprise धोरण वाचणे.
Chrome मधील सिरीअल डिव्हाइसबद्दल अधिक जाणून घ्या
सिरीअल डिव्हाइस हे असे डिव्हाइस आहे, जे सिरीअल कम्युनिकेशन इंटरफेस पुरवते आणि त्याला सिरीअल पोर्ट असेदेखील म्हणतात. माहिती ही एका वेळी एक बिट यानुसार सिरीअल पोर्टद्वारे क्रमशः आत किंवा बाहेर ट्रान्सफर होते. इथरनेट, FireWire आणि USB यांसारखे इंटरफेसदेखील सिरीअल स्ट्रीमच्या स्वरूपात डेटा पाठवतात, पण सिरीअल पोर्ट या संज्ञेचा सामान्यतः अर्थ म्हणजे RS-232, RS-485 किंवा RS-422 यांसारख्या हार्डवेअरचे अनुपालन.
मायक्रोकंट्रोलर, प्रिंटर, मोडेम आणि विशिष्ट माउस ही सिरीअल डिव्हाइसची उदाहरणे आहेत. सिरीअल डिव्हाइससाठीचे Chrome Enterprise धोरण वाचणे.
Chrome मधील HID डिव्हाइसबद्दल अधिक जाणून घ्या
ह्यूमन इंटरफेस डिव्हाइस (HID) म्हणजे HID प्रोटोकॉल, जे कनेक्‍ट केलेल्या डिव्हाइससोबतचे मानक संभाषण आहे. कीबोर्ड, माउस, हेडसेट आणि गेम नियंत्रक ही HID डिव्हाइसची उदाहरणे आहेत.
बटणे अ‍ॅक्सेस करणे, LED सुरू किंवा बंद करणे अथवा मायक्रोफोन म्यूट आणि अनम्यूट करणे यांसाठी साइट ही HID वापरू शकतात. HID डिव्हाइससाठीचे Chrome Enterprise धोरण वाचणे.
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
12936942448541270787
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false