साइट सेटिंग्जसंबंधी परवानग्या बदलणे

तुम्ही तुमची डीफॉल्ट सेटिंग्ज न बदलता वेबसाइटसाठी परवानग्या सेट करू शकता.

साइट परवानग्या व्यवस्थापित करणे

तुम्ही साइट परवानग्यांना सहजरीत्या अनुमती देऊ शकता किंवा त्या नाकारू शकता. तुम्ही विशिष्ट वैशिष्ट्यांच्या बाबतीत एकवेळ परवानग्यादेखील देऊ शकता.

एखादी साइट कॅमेरा, स्थान आणि मायक्रोफोनसारखी वैशिष्ट्ये वापरण्यासाठी परवानगीची विनंती करते, तेव्हा तुम्ही पुढील गोष्टी करू शकता:

  • या वेळी अनुमती देणे: विनंती केलेले वैशिष्ट्य हे साइटला फक्त तुमच्या सध्याच्या भेटीदरम्यान वापरता येईल. मात्र, भविष्यामधील भेटींच्या वेळी साइटला पुन्हा विनंती करावी लागेल.
  • प्रत्येक भेटीच्या वेळी अनुमती देणे: विनंती केलेले वैशिष्ट्य हे साइटला तुमच्या सध्याच्या भेटीदरम्यान, तसेच भविष्यामधील भेटींदरम्यान वापरता येईल.
  • अनुमती न देणे: विनंती केलेले वैशिष्ट्य हे साइट वापरू शकत नाही.

सर्व साइटसाठी सेटिंग्ज बदला

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर सेटिंग्ज वर क्लिक करा.
  3. गोपनीयता आणि सुरक्षा आणि त्यानंतर साइट सेटिंग्ज वर क्लिक करा.
  4. तुम्हाला अपडेट करायचे असलेले सेटिंग निवडा.

तुम्ही भेट दिलेल्या सर्व साइटसाठी परवानग्या आणि डेटा स्टोरेज बदलण्याकरिता, तुम्ही परवानग्या आणि सर्व साइटवर स्टोअर केलेला डेटा पहा हेदेखील निवडू शकता. 

बदलल्या जाऊ शकतात अशा परवानग्यांबद्दल जाणून घ्या
  • तृतीय पक्ष कुकी: तुम्ही भेट देता ती साइट इतर साइटवरील आशय एंबेड करू शकते, उदाहरणार्थ, इमेज, जाहिराती आणि मजकूर. या इतर साइटद्वारे सेट केलेल्या कुकीना तृतीय पक्ष कुकी म्हणतात. कुकी कशा व्यवस्थापित कराव्या हे जाणून घ्या.
  • इमेज: ऑनलाइन स्टोअर किंवा बातमीपर लेख यांसाठी फोटोसारखी इलस्ट्रेशन पुरवण्याकरिता साइट या सामान्यपणे इमेज दाखवतात.
  • JavaScript: व्हिडिओ गेम किंवा वेब फॉर्म यांसारखी परस्परसंवादी वैशिष्ट्ये दाखवण्यासाठी साइट या सामान्यपणे JavaScript वापरतात. JavaScript बद्दल अधिक जाणून घ्या.
  • प्रोटोकॉल हँडलर: तुम्ही ठरावीक लिंकवर क्लिक करता, तेव्हा साइट या तुमच्या ईमेल क्लायंटमध्ये मेसेज तयार करणे किंवा तुमच्या कॅलेंडरवर इव्हेंट जोडणे यांसारख्या टास्क हाताळू शकतात.
  • पॉप-अप आणि रीडिरेक्ट: जाहिराती दाखवण्यासाठी साइट पॉप-अप पाठवू शकतात किंवा तुम्हाला टाळायच्या असलेल्या वेबसाइटवर नेण्यासाठी रीडिरेक्ट वापरू शकतात. पॉप-अप आणि रीडिरेक्‍ट यांबद्दल अधिक जाणून घ्या.
  • नको असलेल्या जाहिराती: आशय किंवा सेवा कोणत्याही शुल्काशिवाय पुरवता येण्यासाठी साइट सामान्यपणे जाहिराती दाखवतात. मात्र, काही साइट नको असलेल्या किंवा दिशाभूल करणार्‍या जाहिराती दाखवण्यासाठी ओळखल्या जातात. जाहिरातींबद्दल अधिक जाणून घ्या.
  • स्थान: स्थानिक बातम्या किंवा जवळपासची दुकाने यांसारख्या सुसंबद्ध वैशिष्ट्यांसाठी किंवा माहितीकरिता साइट या सामान्यपणे तुमचे स्थान वापरतात. तुमचे स्थान कसे शेअर करावे हे जाणून घ्या.
  • सूचना: तुम्हाला ब्रेकिंग न्यूज किंवा चॅट मेसेजबद्दल कळवण्यासाठी साइट सामान्यपणे सूचना पाठवतात. सूचनांबद्दल अधिक जाणून घ्या.
  • कॅमेरा आणि मायक्रोफोन: व्हिडिओ कॉल यांसारख्या संवाद वैशिष्ट्यांसाठी साइट या सामान्यपणे तुमचा व्हिडिओ कॅमेरा आणि मायक्रोफोन वापरतात. कॅमेरा आणि मायक्रोफोन यांबद्दल अधिक जाणून घ्या.
  • सॅंडबॉक्स न केलेला प्लग-इन ॲक्सेस: तुम्हाला व्हिडिओ स्ट्रीम करणे किंवा सॉफ्टवेअर इंस्टॉल करणे यांसारख्या टास्क करू देण्यासाठी काही साइटना प्लगइनची आवश्यकता असते. तुमचा काँप्युटर अ‍ॅक्सेस करण्यासाठी तुमच्या साइटचे प्लग-इन Chrome च्या सँडबॉक्सला बायपास करू शकते का हे Chrome तुम्हाला बाय डीफॉल्ट विचारते.
  • ऑटोमॅटिक डाउनलोड: तुमचा वेळ वाचवण्यासाठी साइट संबंधित फाइल आपोआप एकत्रितपणे डाउनलोड करू शकतात. डाउनलोडबद्दल अधिक जाणून घ्या.
  • MIDI डिव्हाइस: संगीत तयार करणे आणि संपादित करणे यांसाठीच्या वैशिष्ट्यांकरिता साइट या म्युझिकल इन्स्ट्रुमेंट डिजिटल इंटरफेस (MIDI) डिव्हाइसशी सामान्यपणे कनेक्ट करतात.
  • ब्लूटूथ डिव्‍हाइस: साइटला रेकॉर्ड करण्यासाठी आणि डिव्हाइसबद्दल माहिती दाखवण्याची अनुमती देण्यासाठी साइट या सामान्यपणे ब्लूटूथ डिव्हाइसशी कनेक्ट करतात. ब्लूटूथ डिव्हाइस कनेक्शनबद्दल अधिक जाणून घ्या.
  • बॅकग्राउंड सिंक: तुम्ही साइट सोडल्यानंतर, फोटो अपलोड करणे किंवा चॅट मेसेज पाठवणे यांसारख्या टास्क पूर्ण करण्यासाठी ती सिंक होऊ शकते.
  • फॉंट: साइट या तुमच्या स्थानिक डिव्हाइसवर इंस्टॉल केलेले फॉंट वापरण्यास सांगू शकतात.
  • झूम पातळ्या: ठरावीक साइटवर किती झूम इन किंवा आउट करायचे हे तुम्ही सेट करू शकता. झूम इन किंवा आउट कसे करावे हे जाणून घ्या.
  • PDF दस्तऐवज: साइट काहीवेळा दस्तऐवज, करार आणि फॉर्म यांसारख्या PDF प्रकाशित करतात. PDF दस्तऐवजांबद्दल अधिक जाणून घ्या.
  • संरक्षित आशय: कॉपीराइटने संरक्षित केलेला आशय साइट प्ले करते, तेव्हा ती तुमचे डिव्हाइस ओळखण्यास सांगू शकते. संरक्षित आशयाबद्दल अधिक जाणून घ्या.
  • मोशन सेन्सर: व्हर्च्युअल रीअ‍ॅलिटी किंवा फिटनेस ट्रॅकिंग यांसारख्या वैशिष्ट्यांसाठी साइट या बरेचदा तुमच्या डिव्हाइसची मोशन सेन्सर वापरतात.
  • सिरीअल पोर्ट: नेटवर्क सेट करणे यांसारख्या डेटा ट्रान्सफर वैशिष्‍ट्यांसाठी साइट या सामान्यपणे सिरीअल पोर्टशी कनेक्ट करतात.सिरीअल डिव्हाइसशी साइट कशी कनेक्ट करावी हे जाणून घ्या.
  • फाइल संपादन: तुमचे काम आपोआप सेव्ह करणे यांसारख्या वैशिष्ट्यांसाठी साइट या सामान्यपणे तुमच्या डिव्हाइसवरील फाइल आणि फोल्डर अ‍ॅक्सेस करतात.
  • क्लिपबोर्ड: तुमच्या कॉपी केलेल्या मजकुरासाठी फॉरमॅट सेव्ह करणे यांसारख्या वैशिष्ट्यांकरिता साइट या सामान्यपणे तुमचा क्लिपबोर्ड वाचतात.
  • पेमेंट हँडलर: आणखी सोपे चेकआउट यांसारख्या वैशिष्ट्यांसाठी साइट या सामान्यपणे पेमेंट हँडलर इंस्टॉल करतात.
  • ऑगमेंटेड रीअ‍ॅलिटी: गेम यांसारख्या AR वैशिष्ट्यांसाठी साइट या सामान्यपणे तुमच्या कॅमेराचे स्थान ट्रॅक करतात.
  • व्हर्च्युअल रीअ‍ॅलिटी: तुम्हाला VR सेशनमध्ये एंटर करू देण्यासाठी साइट बरेचदा तुमची व्हर्च्युअल रीअ‍ॅलिटी डिव्हाइस आणि डेटा वापरतात.
  • एंबेड केलेला आशय: तुम्ही भेट दिलेल्या साइट या इतर साइटवरून आशय एंबेड करू शकतात, उदाहरणार्थ इमेज, जाहिराती आणि मजकूर. तुम्ही साइट ब्राउझ करताना तुमच्याविषयी सेव्ह केलेली माहिती वापरण्याची परवानगी या इतर साइट मागू शकतात. एंबेड केलेल्या आशयाविषयी अधिक जाणून घ्या.
  • असुरक्षित आशय: सुरक्षित साइट या सुरक्षित नसलेल्या इमेज किंवा वेब फ्रेम यांसारखा आशय एंबेड करू शकतात. बाय डीफॉल्ट, सुरक्षित साइट या असुरक्षित आशय ब्लॉक करतात. कोणत्या साइट असुरक्षित आशय दाखवू शकतात हे तुम्ही नमूद करू शकता. साइटवरील आशय आणि सुरक्षा यांबद्दल अधिक जाणून घ्या.
  • तुमचा डिव्हाइसचा वापर: चॅट अ‍ॅप्सवर तुमची उपलब्धता सेट करण्यासाठी, तुम्ही तुमचे डिव्हाइस सक्रियपणे कधी वापरता हे साइट सामान्यपणे डिटेक्ट करतात.
  • आवाज: संगीत, व्हिडिओ आणि इतर मीडियासाठी ऑडिओ पुरवण्याकरिता साइट आवाज प्ले करू शकतात. आवाजांबद्दल अधिक जाणून घ्या.
  • HID डिव्हाइस: असामान्य कीबोर्ड, गेम नियंत्रक आणि इतर डिव्हाइस वापरणाऱ्या वैशिष्ट्यांसाठी साइट या सामान्यपणे HID डिव्हाइसशी कनेक्ट करतात. HID शी साइट कशी लिंक करावी ते जाणून घ्या.
  • USB डिव्हाइस: दस्तऐवज प्रिंट करणे किंवा स्टोरेज डिव्हाइसमध्ये सेव्ह करणे यांसारख्या वैशिष्ट्यांसाठी साइट या सामान्यपणे USB डिव्हाइसशी कनेक्ट करतात. USB डिव्हाइसशी साइट कशी कनेक्ट करावी हे जाणून घ्या.
  • तृतीय पक्ष साइन इन: साइट या ओळखीशी संबंधित सेवांकडून मिळणारे साइन-इन प्रॉम्प्ट दाखवू शकतात. तृतीय पक्ष साइन-इन परवानग्या बदलणे.
  • डिव्‍हाइसवरील साइट डेटा: तुम्ही भेट दिलेल्या साइट या तुमचा अनुभव अधिक चांगला करण्यासाठी तुमच्या अ‍ॅक्टिव्हिटीची माहिती सेव्ह करू शकतात — उदाहरणार्थ, तुम्हाला साइटवर साइन इन केलेले ठेवण्यासाठी किंवा तुमच्या शॉपिंग कार्टमध्ये आयटम सेव्ह करण्यासाठी. डिव्‍हाइसवरील साइट डेटाविषयी जाणून घ्या.

विशिष्ट साइटची सेटिंग्ज बदला

तुम्ही विशिष्ट साइटसाठी परवानग्या ब्लॉक करू शकता किंवा त्यांना अनुमती देऊ शकता. डीफॉल्ट सेटिंग्जऐवजी साइट तिची सेटिंग्ज वापरेल. तुम्ही साइटसाठी डेटा हटवूदेखील शकता.

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. साइटवर जा.
  3. वेब अ‍ॅड्रेसच्या डावीकडे, साइटची माहिती पहा Default (Secure) वर क्लिक करा.
  4. साइट सेटिंग्ज वर क्लिक करा.
  5. परवानगी सेटिंग बदला.

टिपा:

  • तुमचे बदल आपोआप सेव्ह होतात.
  • तुम्ही वेब अ‍ॅड्रेसच्या बाजूला असलेल्या आयकनवर क्लिक केल्यानंतर, यापूर्वी सेव्ह केलेली साइट सेटिंग्ज उघडतात. तुम्ही ती Chrome मधील “साइट सेटिंग्ज” मेनूमध्ये न जाता बदलू शकता.
  • परवानग्या रीसेट करा हे बटण उपलब्ध असल्यास, तुम्ही तुमची बदललेली प्राधान्ये रीसेट करण्यासाठी त्यावर क्लिक करू शकता.
  • तुमच्या डेटाचे संरक्षण करण्यासाठी, Chrome हे तुम्ही अलीकडे न वापरलेल्या साइटवरील परवानग्या काढून टाकते.

संबंधित स्रोत

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
3000156836262661834
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false