Chrome मध्ये तुमचे नवीन टॅब पेज कस्टमाइझ करणे

तुमच्या डीफॉल्ट शोध इंजीननुसार, तुमच्या नवीन टॅब पेजवर सर्च बॉक्सच्या खाली काय दिसते ते तुम्ही नियंत्रित करू शकता.

तुमच्या काँप्युटरवर, तुम्ही पुढील गोष्टी कस्टमाइझ करू शकता:

  • इमेज आणि रंग असलेली थीम
  • दिसणारा आशय

तुमचे नवीन टॅब पेज कस्टमाइझ करण्‍यासाठी, तुम्ही तुमच्‍या Google खाते मध्‍ये साइन इन केलेले असणे आवश्‍यक आहे आणि Google हे तुमचे डीफॉल्‍ट शोध इंजिन म्हणून वापरणे हे करणे आवश्‍यक आहे.

तुमचे नवीन टॅब पेज कस्टमाइझ करा

तुम्ही नवीन टॅब उघडता तेव्हा, सर्च बॉक्सच्या खाली तुम्ही सर्वात जास्त वेळा भेट देत असलेल्या वेबसाइट किंवा तुम्ही निवडलेल्या वेबसाइटचे शॉर्टकट पाहू शकता.

शॉर्टकट किंवा तुम्ही सर्वात जास्त वेळा भेट देत असलेल्या वेबसाइट स्विच करण्यासाठी:
  1. Chrome उघडा.
  2. नवीन टॅब पेजच्या तळाशी उजवीकडे, Chrome कस्टमाइझ करा वर क्लिक करा.
  3. “शाॅर्टकर्ट” या अंतर्गत माझे शॉर्टकट किंवा सर्वात जास्त भेट देत असलेल्या साइट निवडा.
  4. शॉर्टकट लपवण्यासाठी, शॉर्टकट दाखवा बंद करा.
साइट काढून टाकण्यासाठी किंवा संपादित करण्यासाठी:
  1. तिच्या आयकनवर पॉइंट करा. 
  2. आयकनच्या सर्वात वर उजवीकडे, आणखी आणखी वर क्लिक करा.
  3. शॉर्टकट संपादित करा किंवा काढून टाका निवडा.

टीप: सुचवलेले लेख तुमच्या कॉंप्युटरवरील होम पेजवर दिसत नाहीत. 

ब्राउझरची थीम बदलणे

कस्टम बॅकग्राउंड इमेज जोडा

तुम्ही थीमच्या वर्गवाऱ्या आणि विशेष संग्रहांमधून निवडू शकता किंवा Chrome मध्ये बॅकग्राउंड म्हणून वापरण्यासाठी इमेज अपलोड करू शकता.

  1. नवीन टॅब पेजच्या तळाशी उजवीकडे, Chrome कस्टमाइझ करा  वर क्लिक करा.
    • सर्वात वरती उजवीकडे, तुम्ही साइड पॅनल आणि त्यानंतर Chrome कस्टमाइझ करा देखील निवडू शकता.
  2. “स्वरूप” या अंतर्गत, थीम बदला निवडा.
  3. तुम्ही पुढील गोष्टी करू शकता:
    • गॅलरीमधून थीम निवडणे.
    • इमेज अपलोड करा निवडणे.

तुम्ही अपलोड केलेल्या इमेजवर किंवा निवडलेल्या थीमच्या आधारे Chrome आपोआप ब्राउझरचा रंग सुचवते. तुम्हाला सुचवलेला रंग आवडला नसल्यास, “स्वरूप” या अंतर्गत, दुसरा रंग निवडा.

थीम रीसेट करण्यासाठी, पॅनलच्या तळाशी, डीफॉल्ट Chrome वर रीसेट करा निवडा.

टीप: तुमची बॅकग्राउंड दररोज बदलण्यासाठी, संग्रहावर क्लिक करा आणि दररोज रिफ्रेश करा सुरू करा.

तुमच्या ब्राउझरचा रंग बदला

  1. नवीन टॅब पेजच्या तळाशी उजवीकडे, Chrome कस्टमाइझ करा  वर क्लिक करा.
    • सर्वात वरती उजवीकडे, तुम्ही साइड पॅनल आणि त्यानंतर Chrome कस्टमाइझ करा देखील निवडू शकता. 
  2. “स्वरूप” या अंतर्गत, उपलब्ध पर्यायांमधून निवडा. 
    • तुम्ही थीम निवडता, तेव्हा Chrome एकत्र चांगले दिसणारे रंग सुचवते.

Chrome मधील गडद मोड व्यवस्थापित करा

  1. नवीन टॅब पेजच्या तळाशी उजवीकडे, Chrome कस्टमाइझ करा  निवडा.
    • सर्वात वरती उजवीकडे, तुम्ही साइड पॅनल  आणि त्यानंतर  Chrome कस्टमाइझ करा देखील निवडू शकता. 
  2. “स्वरूप” या अंतर्गत, यापैकी एक निवडा:
    • फिकट : Chrome फिकट थीममध्ये असेल.
    • गडद : Chrome गडद थीममध्ये असेल..
    • डिव्हाइस : Chrome तुमच्या डिव्हाइसची थीम फॉलो करेल. 

गडद मोड किंवा गडद थीम याबद्दल अधिक जाणून घ्या

तुमच्या नवीन टॅब पेजवर Chrome कार्ड वापरा

Chrome तुमच्या ॲक्टिव्हिटीवर आधारित तुम्हाला स्वारस्य असू शकेल असा आशय निवडते. तुमची कार्ड नवीन टॅब पेजवर दिसण्यासाठी तुम्ही तुमच्या Google खाते वर साइन इन केलेले असणे आवश्यक आहे. तुम्ही कार्डमधील आयटमवर क्लिक करता, तेव्हा ते त्याच टॅबवर आशय उघडते.

Chrome कार्ड वापरून तुम्ही पुढील गोष्टी करू शकता:

  • तुमची कार्ड पाहणे.
  • कार्डवरील आशय डिसमिस करणे किंवा कार्ड सुरू आणि बंद करणे.
  • पर्सनलाइझ केलेल्या साइट आणि आशय शोधण्यासाठी तुमची कार्ड वर क्लिक करणे.

कार्ड सुरू किंवा बंद करा

  1. नवीन टॅब पेजच्या तळाशी, कस्टमाइझ करा वर क्लिक करा.
  2. कार्ड आणि त्यानंतर कार्ड कस्टमाइझ करा वर क्लिक करा.
  3. तुम्हाला दाखवायची असलेली किंवा लपवायची असलेली कार्ड निवडा.
तुमच्या नवीन टॅब पेजवर ब्राउझ करणे पुन्हा सुरू करणे

तुमचा Chrome ब्राउझर इतिहास आणि शोध गटानुसार व्यवस्थापित करण्याचा एक मार्ग आहे.

कार्डवर क्लिक करून तुम्ही सहजपणे ब्राउझ करणे पुन्हा सुरू करू शकता:

  • नवीन टॅब पेजवर, तुमच्या इतिहासामधील साइटवर क्लिक करा.
  • नवीन टॅब पेजवर, तुम्ही संबंधित शोधांवर क्लिक करू शकता.

सर्व परिणाम उघडा

टॅबचा नवीन गट उघडा, ज्यामध्ये तुमचा सुरुवातीचा शोध आणि संबंधित वेब पेज यांचा समावेश आहे.

  1. Chrome मध्ये नवीन टॅब किंवा विंडो उघडा.
  2. तुमच्या स्क्रीनच्या मध्यभागी, ब्राउझ करणे पुन्हा सुरू करा कार्ड शोधा.
  3. कार्डच्या सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर सर्व नवीन टॅब गटामध्ये उघडा वर क्लिक करा.

विशिष्ट कार्ड लपवा

तुम्ही विशिष्ट शोधाबद्दल पुन्हा शोधत नाही तोपर्यंत नवीन टॅब पेजवरून तो शोध काढून टाका.

  1. Chrome मध्ये नवीन टॅब किंवा विंडो उघडा.
  2. तुमच्या स्क्रीनच्या मध्यभागी, ब्राउझ करणे पुन्हा सुरू करा कार्ड शोधा.
  3. कार्डच्या सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर [search] लपवा वर क्लिक करा.

ब्राउझ करणे पुन्हा सुरू करण्याबद्दल अधिक जाणून घ्या.

Chrome मध्ये तुमची कार्ट वापरण्यास सुरुवात करा
तुम्ही रिटेल विक्रेत्याच्या कार्टमध्ये आयटम जोडता, पण चेकआउट पूर्ण करत नाही, तेव्हा तुमच्या नवीन टॅब या पेजमध्ये कार्टची लिंक मिळवू शकता. 

महत्त्वाचे: Chrome मध्ये कार्ट ही १४ दिवसांसाठी किंवा तुम्ही चेक आउट करेपर्यंत दाखवली जातात.

तुमच्या कार्टमधील आयटमवर सवलती मिळवा

काही वेळा, रिटेल विक्रेते तुमच्या कार्टवर सवलती देतात. या सवलतींना अनुमती देण्यासाठी:

  1. Google तुमची परवानगी मागेल, तेव्हा सवलती मिळवा वर क्लिक करा.
  2. कार्टच्या सर्वात वरती, सवलतीशी संबंधित बॅज तपासा.
  3. रिटेल विक्रेत्याच्या साइटवर जा, बॅजवर क्लिक करा.
  4. तुमच्या खरेदीवर सवलत आपोआप लागू केली जाते.
    • सवलत आपोआप लागू न झाल्यास, सवलतीचा कोड मॅन्‍युअली कॉपी करून पेस्ट करा.

विशिष्ट रिटेल विक्रेत्यांना लपवा

  1. Chrome मध्ये नवीन टॅब किंवा विंडो उघडा.
  2. तुमच्या स्क्रीनच्या मध्यभागी, तुमचे बुकमार्क या अंतर्गत, तुम्हाला जो रिटेल विक्रेता लपवायचा आहे तो शोधा.
  3. तुम्हाला जे कार्ट लपवायचे आहे त्याच्या सर्वात वरती उजव्या कोपऱ्यात, आणखी वर क्लिक करा.
  4. पर्याय निवडा:
    • तुम्ही तुमच्या कार्टमधील गोष्टी बदलेपर्यंत स्टोअरला लपवण्यासाठी, [रिटेल विक्रेत्याचे नाव] ला लपवा हे निवडा.
    • स्टोअरला कायमस्वरूपी लपवण्यासाठी, [रिटेल विक्रेत्याचे नाव] ला पुन्हा दाखवू नका हे निवडा.

तुमची कार्ट लपवा

  1. Chrome मध्ये नवीन टॅब किंवा विंडो उघडा.
  2. तुमच्या स्क्रीनच्या मध्यभागी, "तुमची कार्ट" च्या सर्वात वर उजवीकडे आणखी वर क्लिक करा.
  3. पर्याय निवडा:
    • तुम्ही बदल करेपर्यंत तुमची कार्ट डिसमिस करण्यासाठी, ही कार्ट लपवा निवडा.
    • तुमची कार्ट बंद करण्यासाठी, कार्ट दाखवू नका निवडा.
Chrome मध्ये Drive प्राधान्य कार्ड वापरा

व्यवस्थापित केल्या जाणाऱ्या काही डिव्हाइसवर, Chrome हे तुम्हाला आवश्यक असू शकतील अशा Drive फाइलसाठी शॉर्टकट तयार करते आणि ते तुमच्या नवीन टॅब या पेजवर आपोआप जोडते. "Drive संबंधित प्राधान्य" हे कार्ड बऱ्याच कारणांमुळे तुमच्या नवीन टॅब पेजवर दिसते. उदाहरणार्थ, पुढील गोष्टी घडल्यास, फाइलना प्राधान्य दिले जाऊ शकते आणि त्या दिसू शकतात:

  • एखाद्याने फाइलवर नवीन टिप्पणी केल्यास.
  • फाइल तुमच्या पुढील मीटिंगमध्ये अटॅच केलेली असल्यास.

"Drive संबंधित प्राधान्य" हे कार्ड एका वेळी तीन फाइल दाखवते आणि तुमच्या वेब शॉर्टकटच्या खाली दिसते.

तुमच्या कॉंप्युटरवर, "Drive प्राधान्य" कार्ड दिसणार नाही.

तुमच्या नवीन टॅब पेजवर Drive प्राधान्य कार्ड लपवा

  1. Chrome उघडा.
  2. एखादा टॅब आपोआप दिसत नसल्यास, नवीन टॅब उघडा.
  3. "Drive संबंधित प्राधान्य" या कार्डच्या सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी वर क्लिक करा.
  4. पर्याय निवडा:
    • Drive कार्डचा आशय डिसमिस करण्यासाठी, आतासाठी लपवा निवडा.
    • Drive कार्ड बंद करण्यासाठी, Google Drive फाइल कधीही दाखवू नका निवडा.

संबंधित स्रोत

true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
744720270692245929
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false