Chrome मध्ये कोट किंवा मजकूर शेअर करा किंवा लिंक करा

थेट पेजवरील हायलाइट केलेल्या विशिष्ट मजकुरावर जाईल अशी शेअर करता येण्यासारखी लिंक तुम्ही तयार करू शकता.

हायलाइट केलेल्या मजकुरावर थेट उघडणारी लिंक तयार करण्यासाठी: 

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा. 
  2. तुम्हाला मजकूर असलेले जे पेज शेअर करायचे आहे त्यावर जा. 
  3. तुम्हाला शेअर करायचा असलेला मजकूर हायलाइट करण्यासाठी क्लिक करा आणि धरून ठेवा, त्यानंतर तुमचा माउस ड्रॅग करा.
  4. कॉंटेक्स्ट मेनू उघडण्यासाठी, हायलाइट केलेल्या मजकुरावर राइट-क्लिक करा.
  5. हायलाइटवर जाणारी लिंक कॉपी करा निवडा. 
    • तुम्ही हा पर्याय निवडू शकत नसल्यास, निवडलेल्या आशयासाठी हे वैशिष्ट्य कदाचित काम करत नसेल.
  6. ईमेल किंवा मेसेज थ्रेड यांसारख्या कोणत्याही ठिकाणी ही लिंक पेस्ट करा.

टीप: लिंक केलेल्या आशयामधील मजकुरामधून हायलाइट काढून टाकण्यासाठी, हायलाइट केलेल्या मजकुरावर राइट-क्लिक करा आणि हायलाइट काढून टाका निवडा.

true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
17866258301155302456
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false