थेट पेजवरील हायलाइट केलेल्या विशिष्ट मजकुरावर जाईल अशी शेअर करता येण्यासारखी लिंक तुम्ही तयार करू शकता.
हायलाइट केलेल्या मजकुरावर थेट उघडणारी लिंक तयार करण्यासाठी:
- तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
- तुम्हाला मजकूर असलेले जे पेज शेअर करायचे आहे त्यावर जा.
- तुम्हाला शेअर करायचा असलेला मजकूर हायलाइट करण्यासाठी क्लिक करा आणि धरून ठेवा, त्यानंतर तुमचा माउस ड्रॅग करा.
- कॉंटेक्स्ट मेनू उघडण्यासाठी, हायलाइट केलेल्या मजकुरावर राइट-क्लिक करा.
- हायलाइटवर जाणारी लिंक कॉपी करा निवडा.
- तुम्ही हा पर्याय निवडू शकत नसल्यास, निवडलेल्या आशयासाठी हे वैशिष्ट्य कदाचित काम करत नसेल.
- ईमेल किंवा मेसेज थ्रेड यांसारख्या कोणत्याही ठिकाणी ही लिंक पेस्ट करा.
टीप: लिंक केलेल्या आशयामधील मजकुरामधून हायलाइट काढून टाकण्यासाठी, हायलाइट केलेल्या मजकुरावर राइट-क्लिक करा आणि हायलाइट काढून टाका निवडा.