स्पेसविषयी जाणून घ्या

महत्त्वाचे: Chat सेवेचा अ‍ॅक्सेस असलेल्या डोमेनच्या सर्व सदस्यांना स्पेसची नावे दिसतात.

एखादा विषय, प्रोजेक्ट किंवा एकसमान स्वारस्य यांविषयी लोकांच्या गटासोबत अथवा संस्थेसोबत संवाद साधण्यासाठी, Google Chat मध्ये स्पेस तयार करा. उदाहरणार्थ, तुम्ही आगामी मार्केटिंग मोहिमांसाठी टाइमलाइनची चर्चा करण्याकरिता स्पेस तयार करू शकता.

स्पेस वापरून, तुम्ही पुढील गोष्टी करू शकता:

  • स्वारस्य असलेला सामान्य विषय किंवा तुमचे प्रोजेक्ट यांवर तुमचे संभाषण केंद्रित करणे किंवा संस्थात्मक घोषणा करणे.
  • तपशीलवार चर्चा आवश्यक असलेल्या गोष्टींसाठी थ्रेड तयार करणे.
  • फाइल शेअर करणे आणि सदस्यांना टास्क असाइन करणे.
  • तुमच्या स्पेसमध्ये सोपे वर्कफ्लो तयार करण्यासाठी अ‍ॅप्स जोडणे.

सहयोग किंवा घोषणांसाठी स्पेस वापरणे

महत्त्वाचे: तुम्ही तुमच्या वैयक्तिक Google खाते सह Chat वापरल्यास, तुम्ही फक्त सहयोगासाठी स्पेस तयार करू शकता.

सहयोगासाठी स्पेस वापरणे

  • वैयक्तिक, ऑफिस किंवा शाळेच्या खात्यांसाठी उपलब्ध आहे.
  • महत्त्वाच्या प्रोजेक्टसाठी किंवा टीम अपडेटसाठी अथवा प्रवास किंवा खाद्यपदार्थ बनवणे यांसारख्या एकसमान स्वारस्यांसाठी कनेक्ट करण्याकरिता या प्रकारची स्पेस वापरा.
  • गटामधील प्रत्येकजण मेसेज पोस्ट करू शकते, त्याला प्रतिक्रिया आणि उत्तर देऊ शकते.
  • तुम्ही मुख्य संभाषण विंडोमध्ये संपूर्ण गटाला मेसेज पाठवू शकता किंवा मेसेजला थेट उत्तर देऊ शकता आणि थ्रेड तयार करू शकता.

घोषणांसाठी स्पेस तयार करणे

  • ऑफिस आणि शाळेच्या खात्यांसाठी उपलब्ध आहे.
  • तुमच्या टीमसह महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेट शेअर करण्यासाठी या प्रकारची स्पेस वापरा.
  • स्पेस व्यवस्थापक म्हणून, तुम्ही पुढील गोष्टी करू शकता:
    • मुख्य संभाषण विंडोमध्ये घोषणा पोस्ट करणे.
    • स्पेसच्या सदस्यांनी तुमच्या घोषणेवर केलेल्या टिप्पण्यांना प्रतिसाद देणे.
    • उत्तरे बंद करणे.
  • स्पेसचा सदस्य म्हणून, तुम्ही फक्त घोषणांना थेट प्रतिक्रिया आणि उत्तर देऊ शकता.
  • तुम्ही घोषणांसाठी स्पेस तयार केल्यानंतर, तुम्ही स्पेसचा प्रकार बदलू शकत नाही.

थ्रेड असलेल्या स्पेस संगतवार लावणे

स्पेसमधील मुख्य संभाषणाव्यतिरिक्त, तुम्ही कोणत्याही मेसेजला उत्तर देऊ शकता आणि वेगळा थ्रेड तयार करू शकता. महत्त्वाच्या चर्चांचा मागोवा ठेवण्यासाठी आणि मुख्य संभाषणामध्ये गोंधळ होणे रोखण्यासाठी तुम्ही थ्रेड वापरू शकता.

थ्रेडमध्ये, तुम्ही पुढील गोष्टी करू शकता:

  • मेसेज पाठवणे आणि त्यांना उत्तर देणे.
  • थ्रेड फॉलो आणि अनफॉलो करणे.
  • थ्रेडमधील नवीन मेसेजविषयी तुम्हाला सूचना कशी पाठवली जात आहे हे बदलणे.

स्पेसमधील थ्रेड वापरणे.

स्पेसचा अ‍ॅक्सेस व्यवस्थापित करणे

ऑफिस किंवा शाळेच्या खात्यांमध्ये, तुम्ही स्पेस ही खाजगी अथवा प्रत्येकासाठी किंवा तुमच्या संस्थेमधील लक्ष्यित प्रेक्षकांसाठी शोधसुलभ करू शकता.

खाजगी स्पेसविषयी जाणून घ्या

  • टीम, प्रोजेक्ट आणि गटांमध्ये चर्चेसाठी योग्य.
  • स्पेसमध्ये सामील होण्यासाठी, स्पेसच्या सदस्याने तुम्हाला आमंत्रित करणे किंवा स्पेसमध्ये जोडणे आवश्यक आहे.
  • तुम्ही सदस्य नसल्यास किंवा स्पेसमध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित केलेले नसल्यास, तुम्ही ती Chat मध्ये ब्राउझ करू शकत नाही.

शोधसुलभ स्पेसविषयी जाणून घ्या

  • विशिष्ट व्यक्ती किंवा टीमपर्यंत मर्यादित नसलेल्या विषयांसाठी योग्य.
  • स्पेस ही शोधसुलभ असते, तेव्हा तुम्ही स्पेस ब्राउझ करू शकता, तिचे पूर्वावलोकन करू शकता आणि स्पेसमध्ये सामील होऊ शकता.
  • तुमच्याकडे स्पेसची लिंक असल्यास, तुम्ही लिंक वापरून त्यामध्ये सामील होऊ शकता.

स्पेस आणि थेट मेसेज यांमधील फरक

तुम्ही Chat मधील स्पेस किंवा थेट मेसेजद्वारे लोकांच्या गटासोबत संवाद साधू शकता. संभाषणाच्या दोन्ही पद्धती वेगवेगळ्या मार्गांनी काम करतात आणि वेगळी उद्दिष्टे साध्य करतात:

  • स्पेस: लोक फाइल शेअर करू शकतात अशा मध्यवर्ती ठिकाणी, टास्क असाइन करणे आणि जोडलेले राहणे.
  • थेट मेसेज: गटासोबत थेट चॅट करणे. उदाहरणार्थ, मीटिंगनंतर झटपट चर्चा करण्यासाठी थेट मेसेज वापरा.
  स्पेस थेट मेसेज
मेसेज इतिहास

इतिहास बाय डीफॉल्ट सुरू असतो आणि तुमच्या संस्थेच्या धोरणावर अवलंबून असतो. मेसेज इतिहासाविषयी अधिक जाणून घ्या.

वैयक्तिक खात्यांसाठी, तुम्ही इतिहास सुरू किंवा बंद करू शकता. Google Workspace खात्यांसाठी, इतिहास हा तुमच्या संस्थेच्या सेटिंग्जवर आधारित असतो. मेसेज इतिहासाविषयी अधिक जाणून घ्या.

नाव

स्पेस व्यवस्थापक स्पेसचे नाव निवडतो.

तुम्ही Google Workspace खाते वापरत असल्यास आणि तुमच्या संस्थेमधील एखाद्या व्यक्तीने स्पेस तयार केली असल्यास, तुम्ही स्पेसचे नाव बदलू शकता.

स्पेस वैयक्तिक खात्याद्वारे तयार केलेली असल्यास, कोणताही स्पेस सदस्य स्पेसचे नाव बदलू शकतो.

सदस्यांची नावे सूचीबद्ध केलेली आहेत.

वर्णन स्पेस व्यवस्थापक रूमचे वर्णन निवडतो. थेट मेसेजना वर्णने नसतात.
डीफॉल्ट सूचना सदस्य ज्या संभाषणांमध्ये आहेत किंवा ते @mentioned असतात, तेव्हा तुम्हाला सूचित केले जाते. सदस्यांना प्रत्येक मेसेजविषयी सूचित केले जाते.
सदस्यत्व

सदस्य स्पेसमधून बाहेर पडू शकतात. स्पेसमध्ये पुन्हा सामील होण्यासाठी, दुसऱ्या सदस्याने त्यांना पुन्हा जोडणे किंवा आमंत्रित करणे आवश्यक आहे.


टीप: स्पेस शोधसुलभ असल्यास, तुम्ही कधीही पुन्हा सामील होऊ शकता.

सदस्य बाहेर पडून पुन्हा सामील होऊ शकतात.

टीप: डिसेंबर २०२० पूर्वी तयार केलेल्या थेट मेसेजसाठी, सदस्य बाहेर पडू शकत नाहीत.
तेच लोक असलेल्या एकाहून अधिक चॅट स्पेस तुमच्याकडे तोच गट असलेल्या दोन किंवा अधिक स्पेस असू शकतात. तुमच्याकडे तोच गट असलेली दोन किंवा अधिक संभाषणे असू शकतात.
टास्क तयार आणि असाइन करा इतर स्पेसच्या सदस्यांसाठी टास्क तयार आणि ती असाइन करू शकतात. नाव नसलेल्या गट संभाषणांमध्ये टास्क वैशिष्ट्ये नसतात.
शेअर केलेल्या फाइल फाइल शेअर करू शकतात आणि स्पेससोबत शेअर केलेल्या फाइलची सूची पाहू शकतात. गटासोबत फाइल शेअर करू शकतात, पण स्पेससोबत शेअर केलेल्या फाइलची सूची पाहू शकत नाहीत.

संबंधित स्रोत

true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
15818378966870733511
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
1026838
false
false