Google Calendar मधील इव्हेंट Apple Calendar मध्ये जोडणे

तुम्ही तुमच्या Mac, iPhone किंवा iPad वर Apple कॅलेंडरमध्ये Google Calendar इव्हेंट जोडू शकता.

महत्त्वाचे: तुमच्या कॉंप्युटरवर Apple Calendar ची नवीनतम आवृत्ती आणि Apple ची नवीनतम ऑपरेटिंग सिस्टीम असल्याची खात्री करा. तुमच्या Apple कॉंप्युटरची ऑपरेटिंग सिस्टीम शोधणे किंवा तुमच्या कॉंप्युटरची ऑपरेटिंग सिस्टीम अपडेट करणे हे कसे करावे ते जाणून घ्या .

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, Apple Calendar Apple Calendar उघडा.
  2. तुमच्या स्क्रीनच्या सर्वात वरती डाव्या कोपऱ्यात, Calendar आणि त्यानंतर प्राधान्ये वर क्लिक करा.
  3. खाती टॅबवर क्लिक करा.
  4. खाती टॅबच्या डाव्या बाजूला, जोडा Plus वर क्लिक करा.
  5. Google आणि त्यानंतर पुढे सुरू ठेवा निवडा.
  6. तुमच्या Google खात्याशी संबंधित माहिती जोडण्यासाठी, स्क्रीनवरील पायऱ्या फॉलो करा.
  7. तुम्हाला Apple Calendar आणि Google Calendar हे किती वेळा सिंक करायचे आहे ते निवडण्यासाठी, तुमच्या खाती टॅबवरील "कॅलेंडर रिफ्रेश करा" हे वापरा.

कोणती कॅलेंडर सिंक केली जातात ते बदलणे

कोणती कॅलेंडर आपोआप सिंक केली आहेत

  • तुम्हाला तुमच्या कॉंप्युटरवर Google Calendar मध्ये "माझी कॅलेंडर" या अंतर्गत दिसणारी कोणतीही कॅलेंडर
  • वाढदिवस

इतर कॅलेंडर सिंक करा

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, कॅलेंडर सिंक करणे या पेजला भेट द्या.
  2. कोणत्याही कॅलेंडरच्या नावांवर खूण करा किंवा त्यावरील खूण काढून टाका.
  3. सर्वात खाली उजव्या कोपऱ्यात, सेव्ह करा वर क्लिक करा.
  4. पूर्ण झाल्यावर, तुमचे कॅलेंडर रिफ्रेश करा.

डेलिगेशन टूल

तुम्ही Apple Calendar मध्ये "डेलिगेशन" हे टूल वापरून सिंक करत असल्यास, Calendar सिंक ने काम करण्यासाठी तुम्हाला ते बंद करावे लागेल.

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, Apple Calendar Apple Calendar उघडा.
  2. सर्वात वरती डाव्या कोपऱ्यात, Calendar आणि त्यानंतर प्राधान्ये वर क्लिक करा.
  3. खाती आणि त्यानंतर डेलिगेशन वर क्लिक करा.
  4. सर्व कॅलेंडरच्या चौकटीतली खूण काढून टाका.

Apple Calendar वर काम न करणारी Google Calendar वैशिष्‍ट्ये

  • इव्‍हेंटसाठी ईमेल सूचना
  • नवीन Google कॅलेंडर तयार करा
  • रूमसाठी शेड्युलर
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
4200656665744471183
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
88
false
false