Google Calendar किंवा इव्‍हेंट ट्रान्सफर करा

तुम्ही तुमच्‍या मालकीचे कॅलेंडर इतर मालकांना ट्रान्सफर करू शकता. तुम्‍ही इव्‍हेंटदेखील इतर मालक किंवा कॅलेंडर यांना ट्रान्‍सफर करू शकता.

टीप: तुम्‍ही Google Meet ची लिंक असलेले इव्‍हेंट ट्रान्‍सफर करता तेव्‍हा, त्‍या इव्‍हेंटना लागू असलेल्‍या व्हिडिओ कॉंफरन्सिंग धोरणांवरदेखील परिणाम होतो. ट्रान्‍सफर केलेल्‍या Google Calendar इव्‍हेंटच्‍या सेटिंग्ज कशा लागू होतात ते जाणून घ्या.

तुम्ही तयार केलेले कॅलेंडर ट्रान्सफर करा
तुमच्या मालकीचे कॅलेंडर असल्यास आणि तुमचे Google खाते हटवले गेल्यास, तुमचे कॅलेंडरदेखील हटवले जाईल. कॅलेंडर सेव्ह करण्यासाठी, मालकी दुसर्‍या व्यक्तीकडे ट्रान्सफर करा. तुम्ही नवीन Google खाते वर जात असल्यास, तुमच्या नवीन Google Calendar वर इव्‍हेंट इंपोर्ट करणे हे करा.
  1. तुमच्या कॉंप्युटरवर Google Calendar उघडा.
  2. पेजच्या डाव्या बाजूला, माझी कॅलेंडर वर क्लिक करा.
  3. तुम्हाला कोणालातरी जोडायच्या असलेल्या कॅलेंडरवर फिरवा आणि पर्याय आणखीआणि त्यानंतर सेटिंग्ज आणि शेअरिंग वर क्लिक करा.
  4. "विशिष्ट लोकांसोबत शेअर करा" विभागामध्ये, लोक जोडा वर क्लिक करा.
  5. तुम्हाला ज्यांना मालक बनवायचे आहे त्या व्यक्तीचा किंवा गटाचा ईमेल ॲड्रेस एंटर करा.
  6. "परवानग्या" यामध्ये बदल करा आणि शेअर करणे व्यवस्थापित करा निवडा.
  7. पाठवा वर क्लिक करा.

तुम्ही जोडलेला व्यक्ती किंवा गट आता कॅलेंडरचा मालक असेल.

तुमच्या मालकीच्या नसलेल्या एखाद्या कॅलेंडरवर एखादा इव्हेंट ट्रान्सफर करा

तुम्ही एखादा इव्हेंट तयार केला असल्यास, तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला त्याचे मालक बनवू शकता. दुसरी व्यक्ती मालक झाल्यावर, ती इव्हेंटचे कोणतेही तपशील बदलू शकते.

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, Google Calendar उघडा.
  2. एखाद्या इव्हेंटवर आणि त्यानंतर पर्याय आणखीआणि त्यानंतर मालक बदला वर क्लिक करा.
  3. एखादा नवीन मालक आणि त्यांच्यासाठी एखादा मेसेज एंटर करा.
  4. मालक बदला वर क्लिक करा.
  5. नवीन मालकाला लिंक असलेला ईमेल मिळतो. लिंक ही ६० दिवसांसाठी वैध असेल.
    महत्त्वाचे: नवीन मालक मालकी स्वीकारेपर्यंत, तुम्ही इव्हेंटचे मालक आहात.
तुमच्या मालकीच्या कॅलेंडरमध्ये इव्‍हेंट ट्रान्सफर करा
  1. तुमच्या कॉंप्युटरवर, Google Calendar उघडा.
  2. इव्‍हेंट आणि त्यानंतर इव्‍हेंट संपादित करा संपादित करा वर क्लिक करा .
  3. Calendar Calendar आणि कॅलेंडरच्या नावाच्या बाजूला, डाउन अ‍ॅरो डाउन अ‍ॅरो वर क्लिक करा.
  4. ज्या कॅलेंडरवर इव्हेंट हलवायचा आहे ते कॅलेंडर निवडा.
  5. सेव्ह करा वर क्लिक करा.
इव्‍हेंट दुसऱ्या कॅलेंडरमध्ये कॉपी करा
  1. तुमच्या कॉंप्युटरवर Google Calendar उघडा.
  2. इव्‍हेंट आणि त्यानंतर इव्‍हेंट संपादित करासंपादित करावर क्लिक करा.
  3. सर्वात वर, अधिक कृती वर क्लिक करा. 
  4. इव्‍हेंट कॉपी करण्यासाठी कॅलेंडर निवडा. तुम्हाला अन्य कॅलेंडरमध्ये बदल करण्याची परवानगी नसल्यास, तुम्हाला कदाचित हा पर्याय दिसणार नाही.
  5. सेव्ह करा वर क्लिक करा.

तुमचे कॅलेंडर दुसऱ्या व्यक्तीसोबत कसे शेअर करावे याबद्दल जाणून घ्या.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
6433065962118023556
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
88
false
false