Google Calendar ॲपच्या सिंकसंबंधित समस्यांचे निराकरण करणे

तुम्ही तयार किंवा अपडेट केलेले इव्हेंट तुमच्या काँप्युटरवर किंवा Google Calendar अ‍ॅपमध्ये दिसत नसल्यास हे पेज वापरा.

सर्वप्रथम, ही सामान्य निराकरणे वापरून पहा

तुम्ही Google Calendar अ‍ॅप वापरत असलेल्या डिव्हाइसवर या पायऱ्या फॉलो करा.

१. तुम्ही इंटरनेटशी कनेक्ट केले असल्याची खात्री करणे

तुम्ही इंटरनेटशी कनेक्ट केलेले आहे का हे तपासण्यासाठी, शोध घेऊन पहा.

तुम्ही कनेक्ट केलेले नसल्यास, डेटा किंवा वाय-फाय सुरू असल्याची आणि तुम्ही विमान मोडमध्ये नसल्याची खात्री करा.

२. तुम्ही Google Calendar ॲप वापरत आहात का हे तपासणे

तुम्ही Google Calendar अ‍ॅप वापरत आहात का हे तपासण्यासाठी, अ‍ॅपचा आयकन असा दिसत असल्याची खात्री करा: Calendar.

त्यानंतर, Google Calendar अ‍ॅप अप टू डेट असल्याची खात्री करण्यासाठी तुमच्या डिव्हाइसचे अ‍ॅप स्टोअर तपासा.

३. कॅलेंडर दृश्यमान आहे का हे तपासणे
  1. Google Calendar अ‍ॅप Calendar उघडा.
  2. सर्वात वर डावीकडे, मेनू मेनू वर टॅप करा.
  3. कॅलेंडरच्या नावाच्या डाव्या बाजूला, चौकटीत खूण केली असल्याची खात्री करा.
४. तुमच्या Google Calendar मध्ये नवीन इव्हेंट जोडले जात असल्याची खात्री करणे

तुम्ही इव्हेंट तयार करता, तेव्हा ती कोणत्या कॅलेंडरमध्ये जोडली जात आहे हे तपासा. ती इव्‍हेंट च्या कॅलेंडरमध्ये जोडली जात नसल्यास, तुम्हाला ती Google Calendar app किंवा calendar.google.com यामध्ये कदाचित दिसणार नाही.

  1. Google Calendar अ‍ॅप Calendar उघडा.
  2. तळाशी उजवीकडे, जोडा Create event वर टॅप करा.
  3. इव्‍हेंट आयकनच्या बाजूला Event, "इव्‍हेंट" शोधा.
    • "इव्‍हेंट" असे दिसत नसल्यास, योग्य कॅलेंडरवर स्विच करण्यासाठी, इव्‍हेंट आयकन Event वर टॅप करा.

त्यानंतर, ट्रबलशूटिंगसंबंधित या टिपा वापरून पहा

सर्वप्रथम वरील पायऱ्या वापरून पहा. त्या उपयुक्त न ठरल्यास, तुम्ही तुमच्या डिव्हाइसवर पायऱ्या वापरून पाहत असताना तुमच्या कॉंप्युटरवर या सूचना वाचा. 

टीप: Google Calendar अ‍ॅप हे मागील एका वर्षापर्यंतचे इव्हेंट सिंक करते. 

Calendar सिंक सुरू असल्याची खात्री करा
  1. तुमच्या डिव्हाइसवर Settings अ‍ॅप उघडा (Google सेटिंग्ज अ‍ॅप नाही).
  2. खाती वर टॅप करा.
  3. एक खाते निवडा.
  4. खाते सिंक वर टॅप करा.
  5. Google Calendar साठी खाते सिंक सुरू केले असल्याची खात्री करा.
योग्य कॅलेंडर सिंक केले असल्याचे कन्फर्म करा
  1. Google Calendar अ‍ॅप Calendar उघडा.
  2. सर्वात वर डावीकडे, मेनू मेनू वर टॅप करा.
  3. सेटिंग्ज वर टॅप करा.
  4. दिसत नसणाऱ्या कॅलेंडरच्या नावावर टॅप करा. तुम्हाला कॅलेंडर हे सूचीबद्ध केलेले दिसत नसल्यास, आणखी दाखवा वर टॅप करा.
  5. पेजच्या सर्वात वर, सिंक सुरू असल्याची खात्री करा (निळे). तुम्हाला तुमची प्राथमिक कॅलेंडरवर नाही, पण फक्त तुम्ही तयार केलेल्या कॅलेंडरसाठी सिंक सेटिंग दिसेल (याला साधारणतः, तुम्ही त्याचे नाव बदलत नाही तोपर्यंत "इव्‍हेंट" असे म्हणतात).

टीप: तुम्ही सिंक सुरू केल्यानंतर तुमचे इव्हेंट दिसण्यासाठी काही वेळ लागू शकतो.

तुमचे Calendar मॅन्युअली सिंक करा
  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Calendar ॲप Calendar उघडा.
  2. सर्वात वरती डावीकडे, मेनू मेनू आणि त्यानंतर रिफ्रेश करा वर टॅप करा.
Calendar चे स्टोरेज सुरू केले असल्याची खात्री करा
  1. तुमच्या डिव्हाइसवर Settings अ‍ॅप उघडा ("Google सेटिंग्ज" अ‍ॅप नाही).
  2. अ‍ॅप्स किंवा अ‍ॅप्स आणि सूचना आणि त्यानंतर अ‍ॅप माहिती वर टॅप करा.
  3. सर्वात वरती उजवीकडे, आणखी अधिकआणि त्यानंतर सिस्टीम दाखवा आणि त्यानंतर Calendar स्टोरेज वर टॅप करा. 
तुमच्या डिव्हाइसचे स्टोरेज तपासा
तुमच्या डिव्हाइसमधील स्टोरेज संपले असल्यास, कॅलेंडर सिंक होणे थांबते.
  1. तुमच्या डिव्हाइसवर Settings अ‍ॅप उघडा ("Google सेटिंग्ज" अ‍ॅप नाही).
  2. स्टोरेज विभाग शोधा.
  3. तुम्हाला जागा साफ करायची असल्यास, तुम्ही वापरत नसलेली अ‍ॅप्स अनइंस्टॉल करून पहा किंवा तुमच्या डिव्हाइसमधून फाइल अथवा फोटो हटवून पहा.
तुमच्या Calendar चा अ‍ॅप डेटा साफ करा
महत्त्वाचे: तुम्ही या पायऱ्यांमुळे काही सिंक न केलेला डेटा गमावू शकता. तुम्हाला तुमच्या कॉंप्युटरवरील Google Calendar वर कोणतीही इव्‍हेंटसंबंधित माहिती सापडत नसल्यास, ती गमावली जाईल. वरीलपैकी काहीच काम करत नसेल तरच या पायऱ्या वापरून पहा.
  1. तुमच्या डिव्हाइसवर Settings अ‍ॅप उघडा ("Google सेटिंग्ज" अ‍ॅप नाही).
  2. अ‍ॅप्स किंवा अ‍ॅप्स आणि सूचना विभागावर टॅप करा. तुम्हाला सेटिंग्जमध्ये कदाचित खाली स्क्रोल करावे लागू शकते किंवा वेगळ्या पेजवर जावे लागू शकते.
  3. सर्व अ‍ॅप्सची सूची मिळवण्यासाठी, अ‍ॅपसंबंधित माहिती वर टॅप करा.
  4. Calendar निवडा Calendar.
  5. स्टोरेज आणि त्यानंतर डेटा साफ करा आणि त्यानंतर ओके वर टॅप करा.
  6. तुम्हाला सूचीमध्ये "Calendar स्टोरेज" दिसत असल्यास, त्या अ‍ॅपसाठीदेखील डेटा साफ करा.
  7. तुमचे डिव्हाइस बंद करा, त्यानंतर ते पुन्हा सुरू करा.

Apple Calendar किंवा Outlook वापरून सिंक करा

तुम्ही Apple Calendar किंवा Outlook यांसारख्या दुसऱ्या प्रोग्राममध्ये तुमच्या Google Calendar इव्‍हेंट शोधण्याचा प्रयत्न करत असल्यास, सिंक करण्यासंबंधित सूचना वेगळ्या आहेत.

Apple Calendar किंवा Outlook सह कसे सिंक करावे हे जाणून घ्या.

वरील टिपा उपयुक्त ठरल्या नाहीत

Calendar तज्ञाची मदत घेणे

वरील ट्रबलशूटिंगसंबंधित टिपा उपयुक्त न ठरल्यास, Calendar मदत फोरम मध्ये पोस्ट करा, जिथे तुम्हाला ट्रबलशूट करण्यासाठी तज्ञाकडून मदत मिळू शकेल.

तुम्ही फोरममध्ये पोस्ट करता, तेव्हा या पेजवरील वापरलेल्या ट्रबलशूटिंग पायऱ्यांचा उल्लेख करा.

Google ला समस्येची तक्रार करणे

तुम्हाला कधीही समस्या आल्यास, तुम्ही समस्येची तक्रार करू शकता.

  1. Calendar अ‍ॅप Calendar उघडा.

  2. सर्वात वरती डावीकडे, मेनू मेनू आणि त्यानंतर मदत आणि फीडबॅक वर टॅप करा.

टीप: तुम्हाला हा पर्याय दिसत नसल्यास, तुमच्याकडे अ‍ॅपची जुनी आवृत्ती किंवा वेगळे कॅलेंडर अ‍ॅप असू शकते. वापरण्यायोग्य अ‍ॅप शोधण्यासाठी, पेजच्या सर्वात वर असलेल्या सूचना फॉलो करा.
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
3288157604549243813
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
88
false
false