तुमच्या वेबसाइटवर Google Calendar जोडणे

तुम्ही तुमच्या वेबसाइटवर तुमच्या कॅलेंडरची सुसंवादी आवृत्ती जोडू शकता आणि तुमचे कॅलेंडर इव्हेंट सेव्ह करण्यासाठी तुमच्या वेबसाइटवरील अतिथींकरिता बटणे जोडू शकता.

तुमच्या वेबसाइटवर कॅलेंडर एंबेड करणे

  1. कॉंप्युटरवर, Google Calendar उघडा. तुम्हाला तुमच्या वेबसाइटवर कॅलेंडर एंबेड करण्यासाठी फक्त कॉंप्युटरवरून कोड मिळू शकतो, Google Calendar अ‍ॅपवरून नाही. 
  2. सर्वात वरती उजवीकडे, सेटिंग्ज सेटिंग्ज आणि त्यानंतर सेटिंग्ज वर क्लिक करा.
  3. स्क्रीनच्या डावीकडे, तुम्हाला एंबेड करायच्या असलेल्या कॅलेंडरच्या नावावर क्लिक करा.
  4. "कॅलेंडर इंटिग्रेट करा" विभागामध्ये, दिसत असलेला आयफ्रेम कोड कॉपी करा. 
  5. एंबेड कोड या अंतर्गत, कस्टमाइझ करा वर क्लिक करा.
  6. तुमचे पर्याय निवडा, त्यानंतर दिसत असलेला HTML कोड कॉपी करा.

तुम्ही तुमचे एंबेड केलेले कॅलेंडर ज्या लोकांसोबत शेअर केले आहे, फक्त तेच हे पाहू शकतात. सर्व अतिथींना तुमचे कॅलेंडर पाहण्याची अनुमती देण्यासाठी, तुम्ही ते सार्वजनिक करणे आवश्यक आहे.

साइटवरील अतिथींना कॅलेंडर इव्हेंट सेव्ह करण्याची अनुमती देणे

तुम्ही तुमच्या वेबसाइटवर Google Calendar बटण जोडू शकता, जेणेकरून अतिथी त्यांच्या स्वतःच्या Google Calendar वर तुमचे इव्हेंट झटपट सेव्ह करू शकतील. कोणालाही तुमचा कॅलेंडर इव्हेंट सेव्ह करू देण्यासाठी, तुम्ही तुमचे कॅलेंडर सार्वजनिक करणे आवश्यक आहे.

  1. कॉंप्युटरवर Google Calendar उघडा. तुम्ही तुमच्या कॅलेंडरची दृश्यमानता फक्त कॉंप्युटरवरून बदलू शकता, मोबाइल अ‍ॅपवरून नाही.
  2. सार्वजनिक कॅलेंडरवर, इव्हेंट तयार किंवा संपादित करा.
  3. आणखी कृती आणि त्यानंतर इव्हेंट प्रकाशित करा वर क्लिक करा
  4. "इव्हेंट प्रकाशित करा" विंडोमध्ये, दिसत असलेला HTML कोड कॉपी करा.
  5. तुमच्या वेबसाइटचा संपादक उघडा, त्यानंतर तुम्हाला इव्हेंट बटण जेथे दिसायला हवे आहे तेथे हा कोड पेस्ट करा.
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
5130218861548429138
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
88
false
false