तुमचे कॅलेंडर प्रिंट करा

तुम्ही तुमचे Google Calendar कोणत्याही कालावधीमध्ये प्रिंट करू शकता.

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, Google Calendar उघडा.
  2. तारीख श्रेणी निवडण्यासाठी, सर्वात वरती उजवीकडे पुढील गोष्टींवर क्लिक करा:
    • दिवस
    • आठवडा
    • महिना
    • वर्ष
    • शेड्युल
    • चार दिवस
  3. सर्वात वरती उजवीकडे, सेटिंग्ज सेटिंग्जआणि त्यानंतर प्रिंट करा वर क्लिक करा.
  4. "प्रिंट पूर्वावलोकन" पेजवर, फॉंटचा आकार किंवा रंग यांसारखे तपशील बदला.
    • आकाराचे पर्याय निवडण्यासाठी, प्रिंट करा वर क्लिक करा.
  5. प्रिंट करा वर क्लिक करा.

टीप: जागा उपलब्ध असल्यास, इव्हेंटचे स्थान किंवा रूमदेखील प्रदर्शित केली(केल्या) जाते(जातात).

 

प्रिंटचे प्रगत पर्याय सेट करा

तुमची कॅलेंडर लपवा
  1. डावीकडे, "माझी कॅलेंडर" किंवा "इतर कॅलेंडर" अंतर्गत, तुम्हाला लपवायच्या असलेल्या कॅलेंडरच्या नावावर क्लिक करा. कॅलेंडरच्या बाजूच्या चौरसाला आउटलाइन दिलेली असल्यास, ती लपवली आहेत.
  2. प्रिंट करण्यासाठी, या पेजच्या सर्वांत वरती दिलेल्या पायऱ्या फॉलो करा.

टीप: कॅलेंडर दर्शवण्यासाठी, त्यावर क्लिक करा.

तुमचे कॅलेंडर एका पेजवर बसवणे

या पेजवर फक्त काही दिवस बसतात. तुमचे कॅलेंडर आणखी चांगल्या प्रकारे बसण्यासाठी हे करा:

लॅंडस्केप किंवा पोर्ट्रेट मोडमध्ये बदलणे

  1. सर्वांत वरती उजवीकडे, सेटिंग्ज सेटिंग्जआणि त्यानंतर प्रिंट करा वर क्लिक करा.
  2. "प्रिंट पूर्वावलोकन" या पेजवर, ओरिएंटेशन ड्रॉप-डाउनड्रॉप डाउन अ‍ॅरो वर क्लिक करा.
  3. लॅंडस्केप किंवा पोर्टेट वर क्लिक करा.
  4. प्रिंट करा वर क्लिक करा.

विकेंड लपवा

  1. सर्वांत वरती उजवीकडे, सेटिंग्ज सेटिंग्जआणि त्यानंतर प्रिंट करा वर क्लिक करा.
  2. "पर्याय पाहा" अंतर्गत, विकेंड दाखवा ही निवड रद्द करा.
  3. प्रिंट करा वर क्लिक करा.

फॉंटचा आकार बदला

  1. सर्वांत वरती उजवीकडे, सेटिंग्ज सेटिंग्जआणि त्यानंतर प्रिंट करा वर क्लिक करा.
  2. "प्रिंटचे पूर्वावलोकन" पेजवर, फॉंट आणखी लहान किंवा मोठा करा. 
  3. प्रिंट करा वर क्लिक करा.

टीप: तुम्ही फॉंटचा आकार बदलल्यास, त्यामुळे पेजवरील दिवसांची संख्या बदलणार नाही. त्यामुळे तुमचे कॅलेंडर वाचण्यासाठी आणखी सोपे होऊ शकते.

पीडीएफ म्हणून सेव्ह करा
  1. तुमचे कॅलेंडर प्रिंट करण्यासाठी, पायऱ्या फॉलो करा.
  2. प्रिंटचे पर्याय असलेल्या अंतिम विंडोमध्ये, "डेस्टिनेशन" अंतर्गत, बदला वर क्लिक करा.
  3. "डेस्टिनेशन प्रिंट करा" अंतर्गत, पीडीएफ म्हणून सेव्ह करा वर क्लिक करा.
  4. सेव्ह करा वर क्लिक करा.

टीप: तुमच्या कॅलेंडरची पीडीएफ पाहण्यासाठी, तुमच्या कॉंप्युटरचे डाउनलोड फोल्डर तपासा.

रंगीत प्रिंट करणे
  1. वरती उजवीकडे, सेटिंग्ज सेटिंग्ज आणि त्यानंतर प्रिंट करा वर क्लिक करा.
  2. “रंग आणि शैली” अंतर्गत, पूर्ण रंगीत वर क्लिक करा.
  3. प्रिंट करा वर क्लिक करा.

टीप: “पूर्ण रंगीत” निवडल्यास, कृपया उत्तर द्या हे पुढीलप्रमाणे दिसते:

  • प्रतिसाद मिळाला नाही: पारदर्शक बॉक्स
  • नाही: खोडलेल्या वर्तुळासह पारदर्शक बॉक्स
  • होय: पूर्ण रंगीत बॉक्स
  • कदाचित: प्रश्नचिन्हासह पूर्ण रंगीत
कॅलेंडरमधील इव्हेंटचे तपशील समाविष्ट करा
  1. वरती उजवीकडे, तुमचे कॅलेंडर "शेड्युल व्ह्यू" यामध्ये आहे, याची खात्री करा.
  2. वरती डावीकडे, सेटिंग्ज सेटिंग्ज आणि त्यानंतर प्रिंट करा वर क्लिक करा.
  3. प्रिंट पूर्वावलोकन या डायलॉगमध्ये, "आणखी पर्याय" अंतर्गत, वर्णने प्रिंट कराआणि तुमचा प्रतिसाद प्रिंट करा हे निवडा.
  4. प्रिंट करा वर क्लिक करा. 
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
18090579089607525581
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
88
false
false