Google Calendar सूचनांमध्ये सुधारणा करणे

तुम्हाला आगामी इव्हेंटबद्दल आठवण करून देण्यात मदत होण्यासाठी, तुम्ही तुमच्या फोनवर, काँप्युटरवर किंवा ईमेलद्वारे सूचना मिळवू शकता. तुम्ही एका इव्हेंटसाठी किंवा एकाहून अधिक इव्हेंटसाठी तुमची सूचना सेटिंग्ज बदलू शकता.

तुमची सूचना सेटिंग्ज बदलणे

तुम्हाला यामध्ये इव्हेंट सूचना मिळू शकतात:

  • ईमेल.
  • तुमच्या वेब ब्राउझरच्या बाहेर दिसणार्‍या डेस्कटॉप सूचना. तुमचे कॅलेंडर उघडे असणे आवश्यक आहे.
  • तुमच्या Google Calendar विंडोच्या आत दिसणार्‍या सूचना.

टीप: Google Calendar न वापरणार्‍या लोकांसाठी त्यांना आमंत्रित केलेले इव्हेंट तयार केले जातात, अपडेट केले जातात किंवा हटवले जातात तेव्हा त्यांना पाठवल्या जाणार्‍या Google Calendar ईमेल सूचना.

सूचना सुरू किंवा बंद करणे

सर्व इव्हेंटसाठी

महत्त्वाचे: सूचना सेटिंग्ज बदलण्यासाठी, तुम्ही Google Chrome किंवा Safari यांसारख्या इंटरनेट ब्राउझरमध्ये Google Calendar उघडणे आवश्यक आहे. तुम्हाला calendar.google.com ला सूचना दाखवू देण्यास सांगितले जाऊ शकते.

तुम्ही Google Calendar वरील तुमच्या सर्व इव्हेंटसाठी सूचना प्राधान्ये बदलू शकता.

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, Google Calendar उघडा.
  2. सर्वात वर उजवीकडे, सेटिंग्ज सेटिंग्ज आणि त्यानंतर सेटिंग्ज वर क्लिक करा.
  3. डावीकडे, सर्वसाधारण” या अंतर्गत, सूचना सेटिंग्ज वर क्लिक करा.
  4. “सूचना सेटिंग्ज” या अंतर्गत, तुम्ही पुढील गोष्टी करू शकता:
    • सूचना सुरू किंवा बंद करणे: सूचना ड्रॉप-डाउनवर क्लिक करा आणि तुम्हाला सूचना कशा मिळवायच्या आहेत ते निवडा.
    • स्नूझ केलेल्या सूचनांची वेळ अ‍ॅडजस्ट करणे: “डेस्कटॉप सूचना” सुरू करा, त्यानंतर स्नूझ केलेल्या सूचना दाखवा वर क्लिक करा आणि तुमची वेळ कस्टमाइझ करा.
    • तुम्ही इव्‍हेंटला “होय” किंवा “कदाचित” असा प्रतिसाद दिल्यावरच नोटिफिकेशन मिळवणे: "मी होय किंवा कदाचित असा प्रतिसाद दिल्यावरच मला सूचित करा" च्या शेजारील बॉक्सवर क्लिक करा.

टीप: स्नूझ केलेली नोटिफिकेशन ही फक्त Google Chrome ब्राउझरमध्ये दिसतात. तुमच्याकडे एकाच इव्हेंटसाठी नोटिफिकेशन सूचनेच्या एकाहून अधिक वेळा असल्यास, स्नूझ हे फक्त शेवटच्या नोटिफिकेशनवर दिसेल.

एका इव्‍हेंटसाठी

  1. Google Calendar उघडा. 
  2. इव्‍हेंट आणि त्यानंतर इव्‍हेंट संपादित करा Edit event वर क्लिक करा.
  3. सूचना च्या बाजूला: 
    • तुमच्या सूचना संपादित करण्यासाठी: तुम्हाला सूचना मिळवायची आहे की ईमेल हे निवडा. तुम्हाला पूर्वसूचना किती वेळा मिळवायच्या आहेत ते तुम्ही बदलू शकता.
    • दुसऱ्या प्रकारची सूचना जोडण्यासाठी: सूचना जोडा वर क्लिक करा.
    • सूचना काढून टाकण्यासाठी: काढून टाका काढून टाका वर क्लिक करा.
  4. पेजच्या सर्वात वर, सेव्ह करा वर क्लिक करा.

टीप: तुम्ही ईमेल, डेस्कटॉप सूचना किंवा दोन्हींद्वारे सूचना मिळवणे निवडू शकता. तुम्ही केलेले बदल इव्हेंटसाठी आमंत्रित केलेल्या इतर कोणावरही परिणाम करत नाहीत.

विशिष्ट कॅलेंडरसाठी

तुम्ही तुमच्या मालकीच्या विशिष्ट कॅलेंडरसाठी सूचना प्राधान्ये बदलू शकता.

  1. Google Calendar उघडा. 
  2. सर्वात वर उजवीकडे, सेटिंग्ज सेटिंग्ज आणि त्यानंतर सेटिंग्ज वर क्लिक करा.
  3. डावीकडे, "माझ्या कॅलेंडरची सेटिंग्ज" या अंतर्गत तुम्हाला बदलायचे असलेले कॅलेंडर आणि त्यानंतर कॅलेंडर सेटिंग्ज वर क्लिक करा.
  4. "इव्हेंटशी संबंधित सूचना" आणि "All-day event शी संबंधित सूचना” या अंतर्गत: 
    • तुमच्या सूचना संपादित करण्यासाठी: तुम्हाला सूचना मिळवायची आहे की ईमेल हे निवडा. तुम्हाला पूर्वसूचना किती वेळा मिळवायच्या आहेत ते तुम्ही बदलू शकता.
    • दुसऱ्या प्रकारची सूचना जोडण्यासाठी: सूचना जोडा वर क्लिक करा.
    • सूचना हटवण्यासाठी: सूचना काढून टाका काढून टाका वर क्लिक करा.

"ब्राउझर सूचनांना सपोर्ट करत नाही" एरर

या एररचा अर्थ असा की, इव्हेंट सूचना मिळवण्यासाठी तुम्हाला तुमचा ब्राउझर अपडेट करावा लागेल.

सूचना मिळाली नाही
  • तुम्ही तुमच्या कॅलेंडरसाठी सूचना सुरू करत असल्याची खात्री करा. वरील पायर्‍या फॉलो करा.
  • तुमच्या ब्राउझरच्या परवानगी सेटिंग्जमध्ये तुम्ही सूचना दाखवण्याचा पर्याय निवडला असल्याचे तपासा. नसल्यास, डेस्कटॉप सूचना सुरू करा.
  • तुमच्या इंटरनेट ब्राउझरमध्ये Google Calendar उघडे राहील याची खात्री करा.

Google Chrome

  1. Google Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर सेटिंग्ज वर क्लिक करा.
  3. गोपनीयता आणि सुरक्षा आणि त्यानंतर साइट सेटिंग्ज आणि त्यानंतर नोटिफिकेशन वर क्लिक करा.
  4. "अनुमती द्या" च्या बाजूला, जोडा वर क्लिक करा.
  5. calendar.google.com एंटर करा आणि त्यानंतर जोडा वर क्लिक करा.

इतर सर्व ब्राउझर

विशिष्ट सूचनांसाठी तुमच्या ब्राउझरची सपोर्ट साइट तपासा.

  1. तुमचा वेब ब्राउझर उघडा.
  2. तुमच्या ब्राउझर सूचना प्राधान्यांमध्ये जा.
  3. calendar.google.com साठी परवानग्या जोडा.

टीप: तुम्ही तुमच्या कॅलेंडरसाठी तुमच्या संस्थेमधील इतर एखाद्या व्यक्तीला नियुक्त केल्यास, त्या व्यक्तीने तुमच्या कॅलेंडरवरील एखादा इव्‍हेंट बदलल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार नाही.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
13499088383268426507
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
88
false
false