तुमचे कॅलेंडर एखाद्या व्यक्तीसह शेअर करा

महत्त्वाचे: तुमचे कॅलेंडर शेअर करताना सावधगिरी बाळगा आणि इतर लोक काय अ‍ॅक्सेस करू शकतात ते निवडा. तुमच्या कॅलेंडरसाठी पूर्ण अ‍ॅक्सेस परवानग्या असलेले कोणीही पुढील गोष्टी करू शकेल:

  • आमंत्रणांना प्रतिसाद देणे
  • इव्‍हेंट तयार करणे आणि संपादित करणे
  • तुमचे कॅलेंडर इतरांसोबत शेअर करणे
  • तुमच्या कॅलेंडरमधील बदलांविषयी ईमेल मिळवणे
  • तुमचे कॅलेंडर हटवणे

टीप: तुमचे खाते ऑफिस किंवा शाळेकडून व्यवस्थापित केले जात असल्यास, तुमच्या खात्याच्या अ‍ॅडमिनने संस्थेच्या बाहेर शेअर करणे मर्यादित किंवा बंद केले असू शकते. अधिक जाणून घेण्यासाठी, तुमच्या ॲडमिनशी संपर्क साधा.

तुमचे कॅलेंडर शेअर करणे

तुम्ही तयार केलेले कोणतेही कॅलेंडर तुम्ही शेअर करू शकता आणि प्रत्येक कॅलेंडरसाठी वेगळ्या अ‍ॅक्सेस परवानग्या सेट करू शकता. नवीन कॅलेंडर कसे तयार करायचे हे जाणून घ्या.

विशिष्ट लोकांसोबत कॅलेंडर शेअर करणे

  1. तुमच्या काँप्युटरवर, Google Calendar उघडा. तुम्ही Google Calendar ॲपमधून कॅलेंडर शेअर करू शकत नाही.
  2. डावीकडे, “माझी कॅलेंडर” विभाग शोधा. त्याचा विस्तार करण्यासाठी, डाउन अ‍ॅरो डाउन अ‍ॅरो वर क्लिक करा.
  3. तुम्हाला शेअर करायच्या असलेल्या कॅलेंडरवर कर्सर फिरवा आणि आणखी अधिक आणि त्यानंतर सेटिंग्ज आणि शेअरिंग वर क्लिक करा.
  4. “विशिष्ट लोकांसोबत शेअर करा” या अंतर्गत, लोक जोडा वर क्लिक करा.
  5. व्यक्तीचा किंवा Google गटाचा ईमेल अ‍ॅड्रेस जोडा. त्यांची परवानगी सेटिंग्ज ॲडजस्ट करण्यासाठी ड्रॉप-डाउन मेनू वापरा. अ‍ॅक्सेस परवानग्यांबद्दल अधिक जाणून घ्या.
  6. पाठवा वर क्लिक करा.
  7. मिळवणाऱ्याला त्याच्या सूचीमध्ये कॅलेंडर जोडण्यासाठी ईमेल केलेल्या लिंकवर क्लिक करावे लागेल. इतर एखाद्या व्यक्तीचे कॅलेंडर कसे जोडायचे ते जाणून घ्या.

टीप: तुमच्या मालकीचे नसलेले कॅलेंडर शेअर करण्यासाठी, तुम्हाला “बदल करा आणि शेअरिंग व्यवस्थापित करा” परवानगी देण्यास मालकाला सांगावे लागेल.

लोकांसोबत कॅलेंडर शेअर करणे

  1. तुमच्या काँप्युटरवर, Google Calendar उघडा. तुम्ही Google Calendar ॲपमधून कॅलेंडर शेअर करू शकत नाही.
  2. डावीकडे, “माझी कॅलेंडर” विभाग शोधा. त्याचा विस्तार करण्यासाठी, डाउन अ‍ॅरो डाउन अ‍ॅरो वर क्लिक करा.
  3. तुम्हाला शेअर करायच्या असलेल्या कॅलेंडरवर कर्सर फिरवा आणि आणखी अधिक आणि त्यानंतर सेटिंग्ज आणि शेअरिंग वर क्लिक करा.
  4. “अ‍ॅक्सेस परवानग्या” अंतर्गत, लोकांसाठी उपलब्ध करून द्या निवडा.
  5. “लोकांसाठी उपलब्ध करून द्या” च्या बाजूला, ड्रॉप-डाउन मेनूमध्ये तुम्हाला द्यायच्या असलेल्या अ‍ॅक्सेसची पातळी निवडा. अ‍ॅक्सेस परवानग्यांबद्दल अधिक जाणून घ्या.

टीप: Google Calendar नसलेल्या लोकांना तुमचे कॅलेंडर शोधू देण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ते सार्वजनिक करणे. सार्वजनिकरीत्या शेअर करण्याबद्दल अधिक जाणून घ्या.

तुमच्या संस्थेतील सर्वांसोबत कॅलेंडर शेअर करणे

तुम्ही तुमचे ऑफिस, शाळा किंवा इतर संस्थेमार्फत Google Calendar वापरत असल्यास, तुम्हाला “अ‍ॅक्सेस परवानग्या” अंतर्गत तुमचे कॅलेंडर तुमच्या संस्थेतील सर्वांसाठी उपलब्ध करून देण्याचा पर्याय दिसेल. अ‍ॅक्सेस परवानग्यांबद्दल अधिक जाणून घ्या.

हे सेटिंग कसे काम करते

  • तुमच्या संस्थेतील लोक तुमचे कॅलेंडर शोधू शकतात.
  • तुमच्या संस्थेबाहेरील लोक तुमचे कॅलेंडर शोधू शकणार नाहीत.
  • तुम्ही तुमच्या संस्थेबाहेरील एखाद्या व्यक्तीला मीटिंगसाठी आमंत्रित केल्यास, ते त्या मीटिंगबाबतची माहिती शोधू शकतात.
  • तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत तुमचे Calendar शेअर करता, तेव्हा तुम्ही "फक्त रिकामा/व्यस्त पहा (तपशील लपवा)" किंवा "इव्‍हेंटचे सर्व तपशील पहा" यांपैकी एक निवडू शकता.

तुमच्या कॅलेंडरचा आणि स्वतंत्र इव्हेंटचा अ‍ॅक्सेस नियंत्रित करणे

शेअर केलेल्या कॅलेंडरसाठी परवानगीसंबंधित सेटिंग्ज समजून घेणे
तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत तुमचे कॅलेंडर शेअर करता, तेव्हा ते तुमचे इव्‍हेंट कसे पाहतात आणि इव्‍हेंट जोडणे किंवा ते संपादित करणे यांसारख्या गोष्टी करू शकतात का हे तुम्ही निवडू शकता.

अ‍ॅक्सेससंबंधित परवानग्या

इतर लोक काय करू शकतात

फक्त रिकामा/व्यग्र पाहणे (तपशील लपवा)

  • तुमचे कॅलेंडर कधी बुक झालेले आहे आणि त्यामध्ये मोकळा वेळ कधी आहे हे पाहणे, परंतु तुमच्या इव्‍हेंटची नावे किंवा तपशील नाही.

सर्व इव्हेंटचे तपशील पाहणे

  • खालील गोष्टी वगळता सर्व इव्हेंटचे तपशील पहा:
    • खाजगी म्हणून मार्क केलेल्या इव्हेंटचे तपशील दृश्यमान नाहीत.
    • "अतिथी सूची पहा" या परवानगीशिवाय इव्हेंटची अतिथी सूची दृश्यमान नाही.
  • कॅलेंडरसाठी टाइम झोनसंबंधित सेटिंग शोधा.
  • इव्हेंट तयार केले गेल्यावर, बदलले गेल्यावर, रद्द केले गेल्यावर, त्यांना उत्तर दिले गेल्यावर किंवा आगामी इव्हेंट यांबाबत जाणून घेण्यासाठी ईमेल सूचनांचे सदस्य होणे.

इव्हेंटमध्ये बदल करणे

  • खाजगी इव्‍हेंटसह सर्व इव्‍हेंटचे तपशील शोधणे.
  • इव्‍हेंट जोडणे आणि संपादित करणे.
  • कॅलेंडरच्या ट्रॅशमधून इव्‍हेंट रिस्टोअर करणे किंवा कायमचे हटवणे.
  • कॅलेंडरसाठी टाइमझोन सेटिंग शोधणे.
  • इव्हेंट तयार केले गेल्यावर, बदलले गेल्यावर, रद्द केले गेल्यावर, त्यांना उत्तर दिले गेल्यावर किंवा आगामी इव्हेंट यांबाबत जाणून घेण्यासाठी ईमेल सूचनांचे सदस्य होणे.

बदल करणे आणि शेअरिंग व्यवस्थापित करणे

  • खाजगी इव्‍हेंटसह सर्व इव्‍हेंटचे तपशील शोधणे.
  • इव्‍हेंट जोडणे आणि संपादित करणे.
  • कॅलेंडरच्या ट्रॅशमधून इव्‍हेंट रिस्टोअर करणे किंवा कायमचे हटवणे.
  • कॅलेंडरसाठी टाइमझोन सेटिंग शोधणे.
  • शेअरिंग सेटिंग्ज बदलणे.
  • इव्हेंट तयार केले गेल्यावर, बदलले गेल्यावर, रद्द केले गेल्यावर, त्यांना उत्तर दिले गेल्यावर किंवा आगामी इव्हेंट यांबाबत जाणून घेण्यासाठी ईमेल सूचनांचे सदस्य होणे.
  • कॅलेंडर कायमचे हटवणे.

टिपा

  • तुमचे खाते ऑफिस किंवा शाळेकडून व्यवस्थापित केले जात असल्यास, तुमच्या खात्याच्या अ‍ॅडमिनने परवानगी सेटिंग्ज मर्यादित किंवा बंद केली असू शकतात. अधिक जाणून घेण्यासाठी, तुमच्या ॲडमिनशी संपर्क साधा.
  • तुम्ही इव्‍हेंटसाठीचे शेअरिंग सेटिंग्ज किंवा Gmail वरील इव्हेंटसाठीचे डीफॉल्ट सेटिंग्ज न बदलल्यास, तुम्ही तुमचे कॅलेंडर ज्यांच्यासोबत शेअर केले आहे असे कोणीही, “बदल करणे” याचा अ‍ॅक्सेस असलेले लोकदेखील, “फक्त मी” हे दृश्यमानता सेटिंग असलेले Gmail मधील इव्हेंट पाहू शकत नाहीत. Gmail वरील इव्हेंटबद्दल अधिक जाणून घ्या.

"परवानग्या अ‍ॅक्सेस करणे" आणि "विशिष्ट लोकांसह शेअर करणे" या सेटिंग्ज

तुमच्या शेअर केलेल्या कॅलेंडरच्या सेटिंग्जमध्ये, तुम्ही “परवानग्या अ‍ॅक्सेस करणे” आणि “विशिष्ट लोकांसोबत शेअर करणे” या सर्वसाधारण परवानग्या सेट करू शकता. दोन्हींच्या दरम्यान, विशिष्ट लोकांना अधिक व्यापक परवानगी लागू केली जाते.

उदाहरणार्थ, तुम्ही कॅलेंडर सार्वजनिकरीत्या उपलब्ध करून दिल्यास आणि “सर्व इव्हेंंटचे तपशील पहा” निवडल्यास व त्यानंतर तुम्ही कॅलेंडर विशिष्ट व्यक्तीसोबत शेअर केल्यास आणि “फक्त रिकामा/व्यस्त पहा” निवडल्यास, त्या व्यक्तीला तरीही तुमच्या सर्व इव्हेंटचे तपशील पाहता येतील.

स्वतंत्र इव्‍हेंटसाठी दृश्यमानतेसंबंधित सेटिंग्ज बदलणे
तुमच्या इव्हेंटना तुमच्या कॅलेंडरला असलेल्याच अ‍ॅक्सेस परवानग्या आपोआप मिळतात. मात्र, तुम्ही प्रत्येक इव्हेंटची दृश्यमानता संपादित करू शकता. इव्‍हेंटची दृश्यमानता सेटिंग्ज बदलण्याविषयी अधिक जाणून घ्या.

कॅलेंडर शेअरिंग बंद करणे

तुमचे कॅलेंडर सार्वजनिकरीत्या शेअर करणे थांबवणे
  1. तुमच्या काँप्युटरवर, Google Calendar उघडा.
  2. डावीकडे, “माझी कॅलेंडर" विभाग शोधा. त्याचा विस्तार करण्यासाठी, तुम्हाला डाउन अ‍ॅरो डाउन अ‍ॅरो वर क्लिक करावे लागू शकते.
  3. तुम्हाला अनशेअर करायच्या असलेल्या कॅलेंडरवर कर्सर फिरवा आणि आणखी अधिक आणि त्यानंतर सेटिंग्ज आणि शेअरिंग वर क्लिक करा.
    • सार्वजनिकरीत्या शेअर करणे थांबवण्यासाठी: “ॲक्सेस परवानग्या” या अंतर्गत, लोकांसाठी उपलब्ध करून द्या बंद करा.
    • तुमच्या संस्थेसोबत शेअर करणे थांबवण्यासाठी: “ॲक्सेस परवानग्या” या अंतर्गत, माझ्या संस्थेतील सर्वांसाठी उपलब्ध करून द्या बंद करा.
    • विशिष्ट लोकांसोबत शेअर करणे थांबवण्यासाठी: “विशिष्ट लोकांसोबत शेअर करा” या अंतर्गत, तुम्हाला काढून टाकायच्या असलेल्या व्यक्तीच्या बाजूला, काढून टाका काढून टाका वर क्लिक करा.

टीप: तुम्ही एकाहून अधिक कॅलेंडर शेअर करत असल्यास, तुम्हाला शेअर करणे थांबवायच्या असलेल्या इतर कोणत्याही कॅलेंडरसाठी या पायऱ्या रिपीट करा.

शेअरिंगसंबंधित समस्यांचे निराकरण करणे

तुम्ही ज्या व्यक्तीसोबत कॅलेंडर शेअर केले आहे ती व्यक्ती तुमचे कॅलेंडर शोधू शकत नाही
  1. तुम्ही योग्य ईमेल अ‍ॅड्रेस जोडला आहे का हे तपासा.
  2. त्यांना मिळालेल्या ईमेलमधील लिंकवर ते क्लिक करत असल्याची खात्री करा. त्यांना तो सापडत नसल्यास, त्यांनी त्यांचे स्पॅम फोल्डर तपासावे.
  3. त्या व्यक्तीला कॅलेंडरच्या शेअरिंग सेटिंग्जमधून काढून टाका आणि नंतर तिला परत जोडा.
  4. तुमचे खाते ऑफिस किंवा शाळेकडून व्यवस्थापित केले जात आहे का हे तपासा. तुमच्या खात्याच्या अ‍ॅडमिनने संस्थेच्या बाहेर शेअर करणे मर्यादित किंवा बंद केले असू शकते. तुमचा अ‍ॅडमिन कसा शोधायचा ते जाणून घ्या.

संबंधित स्रोत

 
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
5218949923704125115
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
88
false
false