तुमच्या इव्‍हेंटची गोपनीयता सेटिंग्ज बदलणे

तुम्ही तुमचे कॅलेंडर शेअर केल्यास, तुमच्या इव्हेंटमध्ये तुमच्या कॅलेंडरसारख्याच गोपनीयता सेटिंग्ज लागू होतील. तुम्हाला हवे असल्यास, काही ठरावीक इव्हेंटबद्दल इतर लोक काय पाहू शकतात ते तुम्ही बदलू शकता.

इव्‍हेंटची गोपनीयता सेटिंग्ज बदला

तुमचे कॅलेंडर कोणाहीसोबत शेअर केलेले नसल्यास, तुम्हाला कदाचित ही सेटिंग्ज दिसणार नाहीत.

  1. तुमच्या कॉंप्युटरवर Google Calendar उघडा.
  2. तुम्हाला अपडेट करायचा असलेला इव्हेंट उघडा.
  3. डीफॉल्ट दृश्यमानता वर क्लिक करा आणि इव्‍हेंटचे गोपनीयता सेटिंग निवडा.
  4. सेव्ह करा वर क्लिक करा.

टिपा:

  • सद्य इव्हेंटमधील बदल तुमच्या कॅलेंडरवर लागू होतात, पण इतर अतिथींच्या कॅलेंडरवर लागू होत नाहीत, हे असे तुम्ही पुढील गोष्टी अपडेट करता, तेव्हा होते:
    • गोपनीयता सेटिंग्ज "खाजगी" वरून "सार्वजनिक" वर बदलणे.
    • दृश्यमानता सेटिंग्ज "उपलब्ध आहे" वरून "व्यस्त आहे" वर बदलणे.
  • इव्‍हेंटचे शीर्षक गोपनीय ठेवण्यासाठी, आयोजकाने इव्‍हेंट "खाजगी" वर सेट करणे आवश्यक आहे.
    • गोपनीय इव्हेंट "सार्वजनिक" वर सेट केला गेला असे तुम्हाला वाटत असल्यास, इव्हेंट "खाजगी" वर अपडेट करण्यासाठी आयोजकाशी संपर्क साधा.

संपूर्ण कॅलेंडरची गोपनीयता सेटिंग्ज बदलण्यासाठी, तुमचे कॅलेंडर शेअर किंवा अनशेअर कसे करायचे ते जाणून घ्या.

गोपनीयता सेटिंग्ज

इव्‍हेंटशी संबंधित कोणती सेटिंग्ज उपलब्ध आहेत याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी तुमचे कॅलेंडर कसे शेअर केले जाते ते निवडा.

माझे कॅलेंडर कोणाहीसोबत शेअर केलेले नाही

तुमचे कॅलेंडर कोणाहीसोबत शेअर केलेले नाही, त्यामुळे तुमचे इव्हेंटदेखील कोणाहीसोबत शेअर केलेले नाहीत.

तुम्ही तुमच्या इव्हेंटसाठी कोणतीही सेटिंग्ज निवडली असली, तरीही इव्‍हेंट फक्त तुम्हाला पाहता येईल.

मी माझे कॅलेंडर फक्त विशिष्ट लोकांसोबत शेअर केले आहे

तुम्ही तुमचे कॅलेंडर लोकांसोबत शेअर करता तेव्हा, तुमच्याकडे त्यांना पुढील गोष्टी करू देण्याचा पर्याय असतो:

  • फक्त रिकामा/व्यस्त म्हणून पाहणे
  • इव्हेंटचे सर्व तपशील पाहणे
  • इव्हेंटमध्ये बदल करणे
  • इव्‍हेंटमध्ये बदल करणे आणि शेअरिंग व्यवस्थापित करणे

तुम्ही यांपैकी कोणते पर्याय निवडले आहेत त्यानुसार, तुम्ही ज्या लोकांसोबत तुमचे कॅलेंडर शेअर केलेले आहे ते तुमच्या इव्‍हेंटबद्दल वेगवेगळ्या प्रमाणात माहिती पाहू शकतात.

फक्त रिकामा/व्यस्त म्हणून पाहणे

  • डीफॉल्ट: इव्‍हेंट हे "व्यस्त" म्हणून दाखवले जातात.
  • सार्वजनिक: तुम्ही तुमचे कॅलेंडर ज्या लोकांसोबत शेअर केलेले आहे ते इव्‍हेंटचे सर्व तपशील पाहू शकतात.
  • खाजगी: इव्‍हेंट हे "व्यस्त" म्हणून दाखवले जातात.

इव्हेंटचे सर्व तपशील पाहणे

  • डीफॉल्ट: तुम्ही तुमचे कॅलेंडर ज्या लोकांसोबत शेअर केलेले आहे ते इव्‍हेंटचे सर्व तपशील पाहू शकतात.
  • सार्वजनिक: तुम्ही तुमचे कॅलेंडर ज्या लोकांसोबत शेअर केलेले आहे ते इव्‍हेंटचे सर्व तपशील पाहू शकतात.
  • खाजगी: इव्‍हेंट हे "व्यस्त" म्हणून दाखवले जातात.

इव्‍हेंटमध्ये बदल करा किंवा इव्‍हेंटमध्ये बदल करा आणि शेअरिंग व्यवस्थापित करा

डीफॉल्ट, सार्वजनिक आणि खाजगी सेटिंग्जसाठी, तुम्ही तुमचे कॅलेंडर ज्या लोकांसोबत शेअर केलेले आहे ते इव्हेंटचे कोणतेही तपशील बदलू शकतात.

मी माझे कॅलेंडर खाजगी केले आहे आणि लोक फक्त रिकामा/व्यस्त म्हणून पाहू शकतात
  • डीफॉल्ट: इव्‍हेंट हे "व्यस्त" म्हणून दाखवले जातात.
  • सार्वजनिक: इव्‍हेंटचे सर्व तपशील कोणीही पाहू शकतात.
  • खाजगी: इव्‍हेंट हे "व्यस्त" म्हणून दाखवले जातात.
मी माझे कॅलेंडर सार्वजनिक केले आहे आणि लोक इव्‍हेंटचे सर्व तपशील पाहू शकतात
  • डीफॉल्ट: इव्‍हेंटचे सर्व तपशील कोणीही पाहू शकतात.
  • सार्वजनिक: इव्‍हेंटचे सर्व तपशील कोणीही पाहू शकतात.
  • खाजगी: इव्‍हेंट हे "व्यस्त" म्हणून दाखवले जातात.

Gmail वरील इव्हेंट

  • तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत तुमचे कॅलेंडर शेअर केलेले असले, तरीही Gmail वरून तुमच्या कॅलेंडरमध्ये आपोआप जोडलेले इव्‍हेंट फक्त तुम्ही पाहू शकता.
  • इतरांनी इव्‍हेंट पाहवा असे तुम्हाला वाटत असल्यास, इव्‍हेंटची गोपनीयता सेटिंग्ज बदलण्यासाठी वरील सूचना फॉलो करा.
  • तुम्ही ऑफिस किंवा शाळेच्या खात्याद्वारे Calendar वापरत असल्यास, तुमचा अ‍ॅडमिनिस्ट्रेटर हा Gmail वरील इव्हेंट पाहू शकतो.

Gmail वरील इव्हेंट याबद्दल अधिक जाणून घ्या.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
9070970136880180165
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
88
false
false