Google Calendar ऑफलाइन वापरणे

ऑफलाइन कॅलेंडरचा वापर करून, तुम्ही तुमचे कॅलेंडर ऑफलाइन ॲक्सेस करू शकता. तुमचे इंटरनेट कनेक्शन कमकुवत असते, तेव्हा हे विशेष उपयुक्त आहे.

इंटरनेट कनेक्शन नसतानादेखील, तुम्ही पुढील गोष्टी करू शकता:

  • Chrome ब्राउझरमध्ये Google Calendar उघडणे.
  • तुमचे कॅलेंडर पाहणे आणि मागील ४ आठवड्यांमधील किंवा भविष्यातील कोणत्याही वेळेचे इव्हेंट पाहणे.
  • आठवडा, दिवस किंवा महिना यांनुसार इव्हेंट पाहणे.

डेस्कटॉपवर Calendar ऑफलाइन वापरणे

  1. Google Calendar उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, सेटिंग्ज आणि त्यानंतरसेटिंग्ज वर क्लिक करा.
  3. डावीकडे, “साधारण” या अंतर्गत ऑफलाइनआणि त्यानंतर ऑफलाइन कॅलेंडर सुरू करा वर क्लिक करा.
  4. आता रीलोड करा वर क्लिक करा.
    • तुमचे कॅलेंडर ऑफलाइन वापरासाठी सिंक करणे सुरू करेल. तुमच्या कॅलेंडरमध्ये सर्वात वरती उजवीकडे तुम्हाला सिंक दिसेल.
    • सिंक पूर्ण होते, तेव्हा तुमच्या कॅलेंडरचे स्टेटस हे ऑफलाइनसाठी तयार आहे असे दाखवते.
    • तुम्ही ऑफलाइन असता, तेव्हा तुमच्या कॅलेंडरचे स्टेटस ऑफलाइन म्हणून दाखवते.
      • सूचना दिसते: “असे दिसते आहे, की तुम्ही ऑफलाइन आहात. काही कृती कदाचित काम करणार नाहीत.”

महत्त्वाचे:

  • “माझी कॅलेंडर” आणि तुमच्या कॅलेंडरचा डेटा हा तुमचा कॉंप्युटर शेवटचा ऑनलाइन होता तेव्हापासून सिंक होईल.
  • तुम्ही ऑफलाइन असताना पुढील गोष्टी करू शकत नाही:
    • इव्हेंट तयार करणे किंवा संपादित करणे
    • अतिथींना ईमेल करणे
    • टास्क ॲक्सेस करणे
  • तुम्ही तुमच्या कॉंप्युटरच्या कॅशेमधील इमेज आणि फाइल साफ केल्यास, त्यामुळे Google Calendar साठीचा ऑफलाइन सपोर्टदेखील बंद होईल. कॅलेंडर ऑफलाइन वापरण्यासाठी Google Calendar ऑफलाइन पुन्हा सुरू करा.
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
9420630861138548957
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
88
false
false