Calendar मध्ये आमंत्रणे व्यवस्थापित करणे

तुमच्या Google Calendar वर कोण आमंत्रणे पाठवते ते नियंत्रित करा. तुम्ही हेदेखील करू शकता:

  • तुमच्या Calendar वरील प्रलंबित आमंत्रणांचा ॲक्सेस मर्यादित करणे.
  • नको असलेली आमंत्रणे आणि स्पॅम टाळण्यासाठी, पाठवणाऱ्यांना ओळखीची व्यक्ती म्हणून अनमार्क करणे.

महत्त्वाचे: तुमची अपडेट केलेली सेटिंग्ज फक्त नवीन आमंत्रणांना लागू होतात.

तुमची Calendar आमंत्रणे व्यवस्थापित करा

कॉंप्युटरवरून Calendar मध्ये आमंत्रणे कशी व्यवस्थापित करायची ते दाखवणारी अ‍ॅनिमेटेड GIF

महत्त्वाचे: तुमच्या विश्वसनीय कनेक्शनकडून मिळालेली आमंत्रणे ही आपोआप तुमच्या कॅलेंडरमध्ये जोडली जातील याची खात्री करण्यासाठी, त्यांचा ईमेल तुमच्या संपर्कांमध्ये जोडा. संपर्क कसा जोडायचा ते जाणून घ्या.

  1. तुमच्या कॉंप्युटरवर Google Calendar उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, सेटिंग्ज आणि त्यानंतर सेटिंग्ज वर क्लिक करा.
  3. डावीकडे, “साधारण” या अंतर्गत, इव्‍हेंट सेटिंग्ज आणि त्यानंतर माझ्या Calendar मध्ये आमंत्रणे जोडा वर क्लिक करा.
  4. पर्याय निवडा:
    • प्रत्येकाकडून: सर्व आमंत्रणे आपोआप तुमच्या Calendar मध्ये जोडली जातात.
    • फक्त पाठवणारा ओळखीचा असल्यास: पाठवणारा तुमच्या संपर्कांमध्ये असल्यास, तुमच्या संस्थेचा भाग असल्यास किंवा तुम्ही त्यांच्याशी याआधी संवाद साधलेला असल्यास, तुमच्या Calendar मध्ये इव्‍हेंट आपोआप जोडले जातात.
      • एखादा इव्‍हेंट तुमच्या Calendar मध्ये जोडलेला नसल्यास, तुम्हाला आमंत्रणाचा ईमेल मिळतो.
      • तुम्ही पाठवणाऱ्याला ओळखीची व्यक्ती म्हणून मार्क केल्यानंतर किंवा तुम्ही त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर, त्यांची आगामी आमंत्रणे तुमच्या कॅलेंडरमध्ये आपोआप जोडली जातात.
    • मी ईमेलमधील आमंत्रणाला प्रतिसाद दिल्यास: तुम्ही ईमेल सूचनेला प्रतिसाद देता फक्त तेव्हाच तुमच्या कॅलेंडरमध्ये एखादा इव्‍हेंट जोडला जातो.

महत्त्वाचे: तुम्ही फक्त पाठवणारा ओळखीचा असल्यास हे निवडल्यास, पाठवणाऱ्यांना ते तुमच्या संपर्कांमध्ये नसल्याचे उघड करू शकते.

Calendar मधील प्रलंबित आमंत्रणांसाठी दृश्यमानता मर्यादित करा

तुम्ही तुमचे Calendar शेअर करता तेव्हा, फक्त त्याच इव्‍हेंट दाखवणे ज्या तुमच्या Calendar वर दृश्यमान आहेत किंवा अज्ञात पाठवणाऱ्यांकडील आमंत्रणे अथवा तुम्ही प्रतिसाद न दिलेली आणि तुमच्या Calendar वर दृश्यमान नसलेली आमंत्रणे यांच्या समाविष्टासह सर्व इव्‍हेंट दाखवणे तुम्ही निवडू शकता. तुम्ही मी ईमेलमधून आमंत्रणाला प्रतिसाद दिल्यास किंवा पाठवणारा ही ओळखीची व्यक्ती असल्यास हे निवडता तेव्हा हा पर्याय "माझ्या Calendar वर आमंत्रणे जोडा" या अंतर्गत दिसतो.

महत्त्वाचे:

  • फक्त तुमची उपलब्धता मिळवण्याची परवानगी असलेल्या लोकांना तुमच्या इव्‍हेंटचे तपशील मिळत नाहीत. परवानग्या शेअर करण्याबद्दल जाणून घ्या.
  • तुम्ही इतरांना तुमची इव्‍हेंट आमंत्रणे पाहण्याची अनुमती दिल्यास, तुमच्या Calendar मध्ये अद्याप न जोडलेल्या इव्‍हेंटबद्दल त्यांना माहिती असू शकते. ते तुमच्या Calendar मधील येणारी इव्‍हेंट आमंत्रणे व्यवस्थापित करत असल्यास हे उपयुक्त आहे.
  1. तुमच्या कॉंप्युटरवर Google Calendar उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, सेटिंग्ज आणि त्यानंतर सेटिंग्ज वर क्लिक करा.
  3. डावीकडे, “साधारण” अंतर्गत, इव्‍हेंट सेटिंग्ज वर क्लिक करा.
  4. इतरांना माझे इव्‍हेंट पाहण्याची किंवा संपादित करण्याची परवानगी असल्यास, त्यांना सर्व आमंत्रणे पाहू द्या हे बंद करा.

आमंत्रणांसंबंधित समस्यांचे निराकरण करा

तुम्ही पाठवणाऱ्याला ओळखीची व्यक्ती म्हणून मार्क केल्यास किंवा त्यांच्याशी संवाद साधल्यास पण आमंत्रणे अजूनही "अज्ञात पाठवणाऱ्याचे आमंत्रण" म्हणून मार्क केलेली असल्यास, तुमचे Google खाते Google उत्पादनांना तुम्ही लोकांशी संवाद साधता, तेव्हा संपर्क माहिती सेव्ह करणे हे करण्याची अनुमती देत असल्याची खात्री करा.

पाठवणाऱ्याची आगामी आमंत्रणे तुमच्या Calendar मध्ये आपोआप जोडण्यासाठी, तुम्ही पाठवणाऱ्यांना तुमच्या संपर्कांमध्ये जोडणे हे मॅन्युअली करू शकता.

तुम्ही पाठवणारा ओळखीचा असेल फक्त तेव्हाच हे सुरू केल्यानंतरही तुम्हाला तुमच्या Android डिव्हाइसवरील Calendar मध्ये स्पॅम इव्हेंट आढळल्यास, कोणत्या ॲप्सना तुमच्या Calendar चा ॲक्सेस आहे याचे तुम्हाला पुनरावलोकन करावे लागू शकते.

पाठवणाऱ्या व्यक्तीला ओळखीचा म्हणून अनमार्क करा

तुम्ही चुकून पाठवणारा माझ्या ओळखीचा आहे वर क्लिक केल्यास पण संपर्क विश्वसनीय नसल्यास:

  1. contacts.google.com वर जा.
  2. सर्वात वरती डावीकडे, मुख्य मेनू आणि त्यानंतर इतर संपर्क वर क्लिक करा.
  3. व्यक्तीच्या संपर्क माहितीच्या उजवीकडे, आणखी कृती More आणि त्यानंतर हटवा आणि त्यानंतर हटवा वर क्लिक करा.

टीप:तुम्ही दुसऱ्या Google उत्पादनामधून संपर्काला ब्लॉक करणे हे केले असल्यास, तो संपर्क अज्ञात पाठवणारा म्हणून दिसतो.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
12628197238749198251
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
88
false
false