अनुचित कॅलेंडर आमंत्रणांची किंवा इव्हेंटची तक्रार नोंदवा

तुम्हाला तुमच्या कॅलेंडरवर संशयास्पद आमंत्रण किंवा इव्हेंट दिसल्यास, त्याची स्पॅम म्हणून तक्रार करा.

पायरी १: इव्‍हेंटची स्पॅम म्हणून तक्रार करा

महत्त्वाचे:

  • इव्‍हेंटची स्पॅम म्हणून तक्रार करण्यासाठी, तो Google Calendar वरून पाठवणे आवश्यक आहे. दुसऱ्या पुरवठादार, अ‍ॅप किंवा सेवा यांनी तयार केलेल्या कॅलेंडर इव्हेंटची स्पॅम म्हणून तक्रार केली जाऊ शकत नाही.
  • तुम्ही इव्‍हेंटची तक्रार करता, तेव्हा तो इव्‍हेंट तुमच्या Calendar मधून काढून टाकला जातो. इव्‍हेंट आवर्ती असल्यास, त्या मालिकेतील सर्व इव्‍हेंट काढून टाकले जातात.
  1. तुमच्या कॉंप्युटरवर Google Calendar उघडा.
  2. तुम्हाला तक्रार करायच्या असलेल्या इव्‍हेंटवर क्लिक करा.
  3. सर्वात वरती उजवीकडे, आणखी कृती आणि त्यानंतर स्पॅम म्हणून तक्रार करा वर क्लिक करा.

पायरी २: इव्‍हेंटच्या परवानग्या बदला

  1. तुमच्या कॉंप्युटरवर Google Calendar उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, सेटिंग्ज आणि त्यानंतर सेटिंग्ज वर क्लिक करा.
  3. "साधारण" टॅबमध्ये, इव्‍हेंट सेटिंग्ज आणि त्यानंतर माझ्या कॅलेंडरमध्ये आमंत्रणे जोडा वर क्लिक करा.
  4. फक्त पाठवणारा ओळखीचा असल्यास निवडा.
    • पाठवणारा तुमच्या संपर्कांमध्ये असल्यास, तुमच्या संस्थेचा भाग असल्यास किंवा तुम्ही त्यांच्याशी याआधी संवाद साधला असेल तरच हे तुमच्या कॅलेंडरमध्ये इव्‍हेंट जोडते.
      • हा पर्याय पाठवणाऱ्यांना ते तुमच्या संपर्कांमध्ये नाहीत हे उघड करू शकतो.

नवीन आमंत्रणे कशी व्यवस्थापित करायची ते जाणून घ्या.

संबंधित स्रोत

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
743226633471009561
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
88
false
false