सूचना

Users can now migrate Google Podcasts subscriptions to YouTube Music or to another app that supports OPML import. Learn more here

क्लासिक Google पुस्तके कसे वापरावे

तुम्ही Google Books वर पुस्तके आणि मासिके वाचू शकता, ती डाउनलोड करू शकता, त्यांचा संदर्भ देऊ शकता आणि ती भाषांतरित करू शकता. काही पुस्तके प्रकाशकांकडून पुरवली जातात, तर इतर लायब्ररी प्रोजेक्ट चा भाग म्हणून स्कॅन केली जातात.

पुस्तक किंवा मासिक वाचा, डाउनलोड, उद्धृत किंवा भाषांतरित करा

  1. Google पुस्तके वर जा.
  2. शीर्षक, लेखक, ISBN किंवा कीवर्ड शोधा.
  3. फिल्टरसह शोधण्यासाठी प्रगत शोध करा. तुम्ही पुस्तकाचा किती भाग पाहू शकता ते जाणून घ्या.
  4. शीर्षकावर क्लिक करा.
  5. डाउनलोड करण्यासाठी, संदर्भ देण्यासाठी, लिंक करण्यासाठी किंवा भाषांतरित करण्यासाठी खालील पायर्‍या फॉलो करा.

पुस्तक डाउनलोड करा

नंतर वाचण्यासाठी किंवा प्रिंट करण्यासाठी तुम्ही काही पुस्तके आणि मासिके कोणत्याही शुल्काशिवाय डाउनलोड करू शकता.

  1. सर्वात वरती डावीकडे, ई-पुस्तक - कोणत्याही शुल्काशिवाय वाचा वर कर्सर फिरवा.
  2. "डाउनलोड करा" च्या शेजारी, PDF किंवा EPUB वर क्लिक करा.

तुम्हाला "ई-पुस्तक - कोणत्याही शुल्काशिवाय वाचा" हे दिसत नसल्यास, ई-पुस्तक खरेदी करा वर क्लिक करा. हे तुम्हाला पुस्तक खरेदी करण्याचा पर्याय देईल.

पुस्तक उद्धृत करा

  1. डावीकडे, या पुस्तकाबद्दल वर क्लिक करा.
  2. "ग्रंथसूचीविषयक माहिती" कडे खाली स्क्रोल करा. तुम्हाला पुस्तक उद्धृत करण्यासाठी वापरता येणारी माहिती दिसेल.

पुस्तकाचा भाग कॉपी किंवा भाषांतरित करा

  1. पेजच्या वरच्या बाजूला कट करा Cut वर क्लिक करा. हा पर्याय सर्व पुस्तकांसाठी उपलब्ध नाही.
  2. पुस्तकामधील मजकूर निवडा.
    • मजकूराला शब्द म्हणून कॉपी करण्यासाठी, "निवड मजकूर" अंतर्गत, तो निवडा आणि कॉपी करा.
    • मजकूर इमेज म्हणून कॉपी करण्यासाठी, "इमेज" किंवा "एम्बेड करा" खाली, URL कॉपी करा.
    • मजकूर भाषांतरित करण्यासाठी भाषांतर करा वर क्लिक करा.

तुम्हाला मजकूर कॉपी किंवा भाषांतरित करण्याचा पर्याय दिसत नसल्यास, प्रकाशकाने तो या पुस्तकासाठी उपलब्ध करून दिलेला नाही.

पुस्तकाशी लिंक करा

Google पुस्तके वर स्वतंत्र शीर्षकांशी कसे लिंक करावे ते जाणून घ्या.

सामान्य समस्यांचे निराकरण करा

तुम्ही पुस्तक किंवा मासिक पाहू शकत नाही

या सामान्य दुरुस्त्या वापरून पहा:

  1. कोणतीही जाहिरात ब्लॉकर प्लग-इन किंवा एक्स्टेंशन बंद करा. एक्स्टेंशन बंद कशी करायची ते जाणून घ्या.
  2. Google पुस्तके उघडण्यासाठी, Chrome किंवा Safari सारखे दुसरे ब्राउझर वापरा.
  3. तुमच्या ब्राउझरचा कॅशे आणि कुकी साफ करण्यासाठी पायर्‍या फॉलो करा.

तुम्हाला तरीही समस्या असल्यास, आमच्याशी संपर्क साधा.

तुम्ही पूर्ण पुस्तक पाहू शकत नाही

मालकाने पूर्ण पुस्तक दाखवण्यासाठी सहमती दर्शवलेली नाही किंवा कदाचित ते पूर्णपणे स्कॅन केले गेलेले नाही.

  • लायब्ररीमध्ये पुस्तक शोधण्यासाठी: डावीकडे प्रिंट पुस्तक मिळवा आणि त्यानंतर लायब्ररीमध्ये शोधा वर क्लिक करा.
  • पुस्तक ऑनलाइन खरेदी करण्यासाठी: डावीकडे, प्रिंट पुस्तक मिळवा, वर क्लिक करा, त्यानंतर किरकोळ विक्रेता निवडा.
  • पुस्तक तुमच्या देशात सार्वजनिक डोमेनवर उपलब्ध आहे असे तुम्हाला वाटत असल्यास, आम्हाला त्याचे परीक्षण करण्यास सांगा.
  • तुमच्या मालकीचे पुस्तक किंवा मासिक असल्यास आणि तुम्हाला Google पुस्तके ला त्याचा आणखी भाग दाखवण्याची अनुमती द्यावी असे वाटत असल्यास, पुस्तकावर दावा करा.

समस्यांची तक्रार करा

खराब गुणवत्ता, गहाळ पेज किंवा बेकायशीर अथवा आक्षेपार्ह आशयाची तक्रार करण्यासाठी, आमच्याशी संपर्क साधा.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
Google Apps
मुख्य मेनू
11503218895272697685
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
100334
false
false