तुम्ही फॉलो करत असलेले ब्लॉग व्यवस्थापित करा

तुम्ही तुमच्या आवडत्या ब्लॉगवरील नवीनतम पोस्ट तुमच्या Blogger डॅशबोर्डवरील वाचन सूचीमध्ये जोडून त्या वाचू शकता.

ब्लॉग फॉलो करा

तुम्ही फॉलोअर गॅजेट वापरता तेव्हा, ब्लॉगचे फॉलोअर म्हणून तुमचे नाव आणि प्रोफाइल फोटो यांसह, तुमची Google प्रोफाइल सार्वजनिकरीत्या दिसेल. तुम्ही कधीही तुमची Google प्रोफाइल बदलू शकता. ब्लॉग निनावीपणे फॉलो करण्यासाठी, तो Blogger डॅशबोर्डवरून किंवा सेटिंग्ज मेनू मधून फॉलो करा.

ब्लॉगच्या फॉलोअर गॅजेटवरून

  1. Blogger मध्ये साइन इन करा.
  2. तुम्हाला फॉलो करायच्या असलेल्या ब्लॉगमध्ये, फॉलोअर गॅजेट शोधा.
  3. फॉलो करा वर क्लिक करा.
  4. दिसणार्‍या विंडोमध्ये, फॉलो करा वर क्लिक करा.
तुमच्या Blogger डॅशबोर्डवरून
  1. Blogger मध्ये साइन इन करा.
  2. डावीकडील मेनूमध्ये, वाचन सूची Bookmark वर क्लिक करा.
  3. वर उजवीकडे, वाचन सूची व्यवस्थापित करा संपादित करा वर क्लिक करा.
  4. जोडा वर क्लिक करा.
  5. तुम्हाला फॉलो करायच्या असलेल्या ब्लॉगची URL टाइप करा.
  6. पुढील वर क्लिक करा.
  7. सार्वजनिकरीत्या फॉलो करायचे किंवा निनावीपणे ते निवडा.
  8. फॉलो करा वर क्लिक करा.

ब्लॉग फॉलो करणे थांबवा

तुमच्या Blogger डॅशबोर्डवरून
  1. Blogger मध्ये साइन इन करा.
  2. डावीकडील मेनूमध्ये, वाचन सूची Bookmark वर क्लिक करा.
  3. वर उजवीकडे, संपादित करा संपादित करा वर क्लिक करा.
  4. तुम्हाला काढून टाकायच्या असलेल्या ब्लॉगच्या बाजूला, हटवा हटवा वर क्लिक करा.
ब्लॉगच्या फॉलोअर गॅजेटवरून
  1. Blogger मध्ये साइन इन करा.
  2. तुम्हाला यापुढे फॉलो करायच्या नसलेल्या ब्लॉगमध्ये, फॉलोअर गॅजेट शोधा.
  3. अनफॉलो करा वर क्लिक करा.
  4. दिसणार्‍या विंडोमध्ये, अनफॉलो करा वर क्लिक करा.

वाचकांना तुमचा ब्लॉग फॉलो करू द्या

इतर लोकांना तुमचा ब्लॉग फॉलो करू देण्यासाठी, फॉलोअर गॅजेट जोडा:

  1. Blogger मध्ये साइन इन करा.
  2. वर डावीकडे, डाउन ॲरो डाउन अ‍ॅरो वर क्लिक करा.
  3. अपडेट करण्यासाठी ब्लॉग निवडा.
  4. डावीकडील मेनूमध्ये, लेआउट वर क्लिक करा.
  5. तुम्हाला फॉलोअर गॅजेट कुठे जोडायचे आहे ते निवडा.
  6. गॅजेट जोडा वर क्लिक करा.
  7. उघडणार्‍या विंडोमध्ये, आणखी गॅजेट वर क्लिक करा.
  8. “फॉलोअर” शोधा आणि जोडा Add वर क्लिक करा.
  9. तुमची सेटिंग्ज निवडा.
  10. सेव्ह करा वर क्लिक करा.
  11. मांडणी सेव्ह करण्यासाठी, तळाशी उजवीकडे, सेव्ह करा सेव्ह करा वर क्लिक करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

मी ब्लॉग सार्वजनिकरीत्या फॉलो करत असताना कोणती प्रोफाइल वापरली जाते?

तुमची Google प्रोफाइल तुम्ही सार्वजनिकरीत्या फॉलो करत असलेल्या कोणत्याही ब्लॉगवर डिस्प्ले होईल. तुम्ही कधीही तुमची Google प्रोफाइल बदलू शकता.

लक्षात ठेवा:

  • तुम्ही तुमची Blogger किंवा दुसरी प्रोफाइल वापरून ब्लॉग निनावीपणे फॉलो करत असल्यास आणि तुम्ही तो सार्वजनिकरीत्या फॉलो करण्याचे ठरवल्यास, तुमची Blogger किंवा दुसरी प्रोफाइल नव्हे, तर Google प्रोफाइल डिस्प्ले केली जाईल.
  • तुम्ही तुमची Blogger किंवा दुसरी प्रोफाइल वापरून आधीपासून सार्वजनिकरीत्या फॉलो करत असलेले ब्लॉग तरीही तुम्ही ते फॉलो करण्यास सुरुवात केली तेव्हा वापरलेली प्रोफाइल वापरतील.

मला माझ्या ब्लॉगच्या फॉलोअरना ब्लॉक कसे करता येईल?

तुम्हाला फॉलो करण्यापासून एखाद्या व्यक्तीला रोखण्यासाठी:

  1. Blogger मध्ये साइन इन करा.
  2. वर डावीकडे, तुमच्या ब्लॉगच्या नावाच्या बाजूला, डाउन अ‍ॅरो डाउन अ‍ॅरो वर क्लिक करा.
  3. तुम्हाला ज्यावर काम करायचे आहे तो ब्लॉग निवडा.
  4. डावीकडील मेनूमध्ये आकडेवारी Statistics वर क्लिक करा.
  5. सर्वात वर, “फॉलोअर" च्या बाजूला, नंबरवर क्लिक करा.
  6. तुम्हाला ब्लॉक करायचा असलेला फॉलोअर शोधा आणि ब्लॉक करा वर क्लिक करा.
    • तुम्ही तुमच्या ब्लॉगवर पोस्ट केल्यावर, ब्लॉक केलेल्या फॉलोअरना यापुढे अपडेट मिळणार नाहीत.

टीप: तुम्ही एखाद्या व्यक्तीला तुमचा ब्लॉग फॉलो करण्यापासून ब्लॉक केले तरीदेखील, त्यांना तुमच्या ब्लॉगच्या URL वर जाता येईल आणि तुमचा ब्लॉग वाचता येईल तसेच त्यावर टिप्पण्या देता येतील.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
14893579796093490890
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
74
false
false