शोध इंजीनवर तुमचा ब्लॉग शोधण्यासाठी लोकांना मदत करा

तुम्ही खालील गोष्टी करता तेव्हा तुम्ही Google आणि Bing सारख्या शोध इंजीनवर इतरांसाठी तुमचा ब्लॉग शोधणे सुलभ करू शकता:

  • तुमचा ब्लॉग शोध इंजीनच्या सूचीमध्ये जोडा.
  • शोध परिणामांमध्ये सर्वात वर दिसण्याकरिता तुमच्या संपूर्ण साइटवर कीवर्ड वापरा.

तुमचा ब्लॉग शोध इंजीनच्या सूचीमध्ये जोडा

शोध इंजीनना तुमचा ब्लॉग शोधू देण्याकरिता:

  1. Blogger मध्ये साइन इन करा.
  2. सर्वात वर डावीकडे, सूचीमध्ये जोडण्यासाठी ब्लॉग निवडा.
  3. डावीकडील मेनूमधून, सेटिंग्ज वर क्लिक करा.
  4. "गोपनीयता" मध्ये शोध इंजीनसाठी दृश्यमानता सुरू करा.

तुमच्या ब्लॉगसाठी शोध इंजीन ऑप्टिमायझेशन (SEO) च्या टिपा

तुम्ही पोस्ट आणि पेजवरील शीर्षक आणि मजकुरामध्ये उपयुक्त कीवर्ड वापरू शकता. तुम्ही शोध इंजीनला कोणत्या पेज, पोस्ट आणि लिंक कडे दुर्लक्ष करावे तेदेखील सांगू शकता जेणेकरून, ती शोध परिणामांमध्ये दिसणार नाहीत.

तुमच्या पोस्ट आणि पेज शीर्षकांमध्ये कीवर्ड जोडा

शोधांमध्ये तुमच्या पोस्ट आणि पेजची रँकिंग सुधारण्यासाठी:

  • पोस्ट किंवा पेज कशाबद्दल आहे हे स्पष्ट करणारे कीवर्ड समाविष्ट करा.
  • तुमची शीर्षके ६० वर्णांपेक्षा कमी ठेवण्याचा प्रयत्न करा. लहान आणि संक्षिप्त शीर्षके वाचायला जास्त सोपी असतात आणि ती कापली जात नाहीत.

हेडर जोडा

शोध इंजीनना तुमची पोस्ट कशाबद्दल आहे हे सांगण्याकरिता तुम्ही H1, H2, H3 आणि इत्यादींसारखी हेडर जोडू शकता. हेडर जोडण्याकरिता:

  1. Blogger मध्ये साइन इन करा.
  2. सर्वात वर डावीकडे, तुम्हाला हेडर जोडायचा असलेला ब्लॉग निवडा.
  3. डावीकडील मेनूमधून, पोस्ट वर क्लिक करा.
  4. तुम्हाला संपादित करायची असेल त्या पोस्टच्या शीर्षकावर क्लिक करा.
  5. तुम्हाला हेडर बनवायच्या असेल त्या मजकुराला ठळक करा.
  6. मेनूमध्ये, परिच्छेद Menu वर क्लिक करा.
  7. तुम्हाला कोणत्या प्रकारचे शीर्षक हवे आहे ते निवडा.

तुमच्या इमेज शोध घेण्यायोग्य बनवा

तुमच्या इमेज शोध घेण्यायोग्य आणि सर्व वाचकांसाठी अ‍ॅक्सेस करण्यायोग्य बनवण्यासाठी, तुम्ही लहान वर्णन, ऑल्ट टेक्स्ट किंवा शीर्षक जोडू शकता:

  1. Blogger मध्ये साइन इन करा.
  2. सर्वात वर डावीकडे, ब्लॉग निवडा.
  3. तुमच्या पोस्टमध्ये एखादी इमेज जोडा आणि त्यावर क्लिक करा.
  4. संपादित करा Edit वर क्लिक करा.
  5. मजकूर बॉक्समध्ये:
    • "ऑल्ट" विभागात: मोठे वर्णन जोडा.
    • "शीर्षक" विभागात: छोटे वर्णन जोडा.
  6. अपडेट करा वर क्लिक करा.

शोधांमधून पेज लपवा

महत्त्वाचे: तुम्ही निवडलेल्या टॅगच्या अंतर्गत येणाऱ्या पोस्ट आणि पेज तुम्ही लपवू शकता. ठराविक पोस्ट ब्लॉक करण्यासाठी, पोस्ट संपादकाच्या सेटिंग्जमध्ये, "कस्टम रोबोट टॅग" च्या अंतर्गत, अनुक्रमणिका नाही सुरू करा.

तुम्हाला शोध इंजीनने काही पेज किंवा पोस्ट शोधू नयेत असे वाटत असल्यास, तुम्ही त्या लपवू शकता. पेज लपवण्यासाठी:

  1. Blogger मध्ये साइन इन करा.
  2. सर्वात वर डावीकडे, ब्लॉग निवडा.
  3. मेनूमध्ये डाव्याबाजूला, सेटिंग्ज वर क्लिक करा.
  4. "क्रॉलर आणि अनुक्रमणिका" मध्ये, कस्टम रोबोट हेडर टॅग सुरू करणे सुरू करा.
  5. होम पेज टॅग,संग्रहण आणि शोध पेज टॅग किंवा पोस्ट आणि पेज टॅग वर क्लिक करा.

शोध इंजीनना काही लिंकना फॉलो न करण्यास सांगा

  1. Blogger मध्ये साइन इन करा.
  2. सर्वात वर डावीकडे, ब्लॉग निवडा.
  3. डावीकडील मेनूमधून, पोस्ट वर क्लिक करा.
  4. तुम्हाला लपवायची असेल त्या पोस्टवर क्लिक करा.
  5. सर्वात वर, लिंक लिंक घाला and then URL तयार/संपादित करा वर क्लिक करा.
  6. ‘rel=nofollow’ विशेषता जोडा च्या शेजारी असलेल्या बॉक्सवर खूण करा.
  7. ओके वर क्लिक करा.

तुमची URL बदला किंवा रीडिरेक्ट करा

तुमच्या URL पुन्हा लिहा

तुमची पोस्ट अधिक वाचनीय करण्याकरिता आणि शोध इंजीनला त्या कशाबद्दल आहेत हे समजण्यास मदत करण्यासाठी, तुम्ही तुमच्या पोस्टची URL पुन्हा लिहू शकता: 

  1. Blogger मध्ये साइन इन करा.
  2. सर्वात वर डावीकडे, अपडेट करायचा असलेला ब्लॉग निवडा.
  3. डावीकडील मेनूमध्ये, पोस्ट and then नवी पोस्ट New post वर क्लिक करा.
  4. उजवीकडे, "पोस्ट सेटिंग्ज" मध्ये परमालिंक वर क्लिक करा.
  5. कस्टम परमालिंक निवडा आणि तुम्हाला वापरायची असलेली URL एंटर करा.
  6. प्रकाशित करा किंवा सेव्ह करा वर क्लिक करा.

URL करिता रीडिरेक्‍ट तयार करा

तुमच्या ब्लॉगवरून नवीन पोस्ट किंवा पेजवर URL रीडिरेक्ट करण्याकरिता:

  1. Blogger मध्ये साइन इन करा.
  2. सर्वात वर डावीकडे, ब्लॉग निवडा.
  3. डावीकडील मेनूमधून, सेटिंग्ज वर क्लिक करा.
  4. "एरर आणि रीडिरेक्‍ट" मध्ये कस्टम रीडिरेक्ट and then जोडा वर क्लिक करा.
  5. हटवलेली URL आणि तुम्हाला रीडिरेक्‍ट करायची असलेली URL जोडा. 
    • मूळ लेख हटवला गेला असल्यास, कायमचा सुरू करा.
  6. ओके and then सेव्ह करा वर क्लिक करा.
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
1574281866835315493
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
74
false
false