कस्टम डोमेन सेट करा

महत्त्वाचे: तुमच्या कस्टम डोमेनवर तुम्ही CAA रेकॉर्ड वापरत असल्यास letsencrypt.org साठी रेकॉर्ड जोडा, अन्यथा Blogger तुमचे SSL सर्टिफिकेट तयार किंवा रिन्यू करणार नाही. 

तुम्ही डोमेन खरेदी केल्यावर, तुमच्या ब्लॉगचा वेबसाइट अ‍ॅड्रेस पर्सनलाइझ करू शकता.

तुमचा डोमेन तुमच्या ब्लॉगसोबत सेट करा

तुम्ही डोमेन पुरवठादाराकडून डोमेन खरेदी करता, तेव्हा Blogger मध्ये तुमचा डोमेन सेट करू शकता आणि त्याची सेटिंग्ज व्यवस्थापित करू शकता.

 Important: It may take up to 24 hours for your “blogspot.com” address to redirect you to your custom domain.

Blogger मध्ये तुमचा डोमेन सेट करणे

  1. Blogger मध्ये साइन इन करा.
  2. सर्वात वरती डावीकडे, ब्लॉग निवडा.
  3. डावीकडील मेनूमध्ये, सेटिंग्ज वर क्लिक करा.
  4. “प्रकाशित करत आहे” अंतर्गत, कस्टम डोमेन वर क्लिक करा.
    1. तुम्ही खरेदी केलेल्या डोमेनची URL एंटर करा.
    2. सेव्ह करा वर क्लिक करा.
  5. तुम्हाला पुढील २ CNAMEs सह एरर येते:
    • ब्लॉग CNAME: नावासाठी, नाव हे सबडोमेनसारखे एंटर करा, जसे की "blog." किंवा "www." डेस्टिनेशनसाठी, “ghs.google.com” एंटर करा.
    • सुरक्षा CNAME: “नाव: XXX, डेस्टिनेशन: XXX”. हे प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळे असते आणि तुमच्या ब्लॉग व Google खाते यांनुसार असते.

तुमची डोमेन पुरवठादार सेटिंग्ज सेट करा

  1. तुमच्या डोमेन पुरवठादाराच्या वेबसाइटवर जा.
  2. कंट्रोल पॅनलमध्ये डोमेन नेम सिस्टीम (DNS) शोधा.
    1. "नाव, लेबल किंवा होस्ट" अंतर्गत, वरील पाचव्या पायरीमधील सबडोमेन एंटर करा.
    2. "डेस्टिनेशन, लक्ष्य किंवा यावर निर्देशित करतो" अंतर्गत, "ghs.google.com" एंटर करा.
  3. तुमचा ब्लॉग आणि Google खाते यांनुसार असलेले, दुसर्‍या CNAME चे तपशील एंटर करा.
  4. तुमची DNS सेटिंग्ज अ‍ॅक्टिव्हेट करण्यासाठी, किमान एक तास प्रतीक्षा करा.
  5. Blogger मध्ये तुमचा डोमेन सेट करणे हे पुन्हा करा.

सबडोमेन नसलेली URL तुमच्या ब्लॉगच्या URL वर रीडिरेक्ट करा

तुमच्या वाचकांना “mydomain.com” वरून “www.mydomain.com” वर रीडिरेक्ट करण्यासाठी नेकेड रीडिरेक्‍ट हे सेट करा:

  1. तुमच्या डोमेन पुरवठादाराच्या वेबसाइटवर जा.
  2. तुमची DNS सेटिंग्ज उघडा.
  3. Google आयपी वर पॉइंट करणारी ही चार ए-रेकॉर्ड जोडा. "mydomain.com" साठी ए-रेकॉर्ड आधीपासून असल्यास, तुम्ही सध्याची ए-रेकॉर्ड काढून टाकणे आवश्यक आहे.
    • 216.239.32.21
    • 216.239.34.21
    • 216.239.36.21
    • 216.239.38.21
  4. Blogger मध्ये साइन इन करा.
  5. सर्वात वर डावीकडे, ब्लॉग निवडा.
  6. डावीकडील मेनूमधून, सेटिंग्ज वर क्लिक करा.
  7. "प्रकाशित करणे" अंतर्गत, डोमेन रीडिरेक्ट करा (mydomain.com वरून www.mydomain.com वर) हे सुरू करा.

समस्या ट्रबलशूट करा

तुम्हाला समस्या असल्यास, तुम्ही या काही पायर्‍या वापरून पाहू शकता.

  • तुमचे डोमेन सेट करत असताना तुम्हाला कदाचित दोन CNAME एंटर करावी लागणार नाहीत.
  • "नाव, लेबल किंवा होस्ट" CNAME बरोबर आहे याची खात्री करा.
  • तुमचे कस्टम डोमेन काम करत नसल्यास, पायर्‍या पुन्हा वापरून पाहण्याआधी प्रतीक्षा करा. तुम्हाला समस्या असल्यास, तुमच्या डोमेन पुरवठादाराशी संपर्क साधा.

संबंधित स्रोत

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
18335385692966538448
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
74
false
false