Assistant च्या अ‍ॅक्टिव्हेशन तंत्रज्ञानांमध्ये सुधारणा होत असताना तुमचा डेटा खाजगी राहतो

फेडरेटेड लर्निंग हे गोपनीयता वर्धित करणारे तंत्रज्ञान आहे जे आम्ही तुमचा रॉ डेटा Google सर्व्हरना पाठवल्याशिवाय डिव्‍हाइसवरील मॉडेलमध्ये सुधारणा करण्यासाठी वापरतो. Google हे Google Assistant ने युक्त डिव्हाइसवर "Ok Google" यासारख्या डिव्हाइस अ‍ॅक्टिव्हेशनमध्ये सुधारणा करण्यासाठी फेडरेटेड लर्निंग वापरते.

तुम्ही "Ok Google, उद्याचे हवामान काय आहे?" असे विचारता, तेव्हा डिव्‍हाइसवरील मॉडेल तुम्ही "Ok Google" म्हटल्याचे डिटेक्ट करते आणि Google Assistant ला तुमची क्वेरी पाठवते.

तसेच, कॅमेरा असलेल्या सपोर्ट करणाऱ्या स्मार्ट होम डिव्हाइसवर, डिव्‍हाइसवरील मॉडेल ही जेश्चर, नजर आणि ओठांच्या हालचालीद्वारे अ‍ॅक्टिव्हेशन डिटेक्ट करण्यासाठी इमेज स्टोअर करू आणि वापरू शकतात.

तुमची डिव्हाइस चुकून अ‍ॅक्टिव्हेट होऊ शकतात किंवा तुम्ही "Ok Google" म्हटले नसेल, तरीही ट्रिगर होऊ शकतात. इतर बाबतीत, तुम्ही "Ok Google" म्हटले, तरीही कदाचित ट्रिगर होणार नाहीत.

चुकून होणारी आणि न झालेली अ‍ॅक्टिव्हेशन कमी करण्यासाठी, आम्ही आता फेडरेटेड लर्निंग हे Assistant च्या अ‍ॅक्टिव्हेशन तंत्रज्ञानांमध्ये सुधारणा करण्याकरिता वापरतो.

Google AI च्या ऑनलाइन कॉमिकमधून फेडरेटेड लर्निंगबद्दल अधिक जाणून घ्या.

तुमच्या व्हॉइस रेकॉर्डिंगबद्दल

"Assistant तुमच्या डिव्हाइसवर कसे अ‍ॅक्टिव्हेट होते यामध्ये सुधारणा करा" हे सुरू असते आणि Google Assistant अ‍ॅक्टिव्हेट होते किंवा हलक्याश्या आवाजाने अ‍ॅक्टिव्हेट होते, तेव्हा ते तुमच्या डिव्हाइसवर तुमच्या व्हॉइस रेकॉर्डिंगचे लहान भाग तात्पुरते स्टोअर करते. फेडरेटेड लर्निंगसह, Assistant ची स्पीच आणि अ‍ॅक्टिव्हेशन तंत्रज्ञाने कशी अ‍ॅडजस्ट करावी हे जाणून घेण्यासाठी आम्ही ही रेकॉर्डिंग वापरतो.

Google Assistant अ‍ॅक्टिव्हेट होते तेव्हा

Google Assistant अ‍ॅक्टिव्हेट होते, तसेच चुकून अ‍ॅक्टिव्हेट होते, तेव्हा ते Google सर्व्हरना तुमचे व्हॉइस रेकॉर्डिंग पाठवू शकते, जेणेकरून Assistant हे तुमच्या फोनवर हवामानाचा अंदाज सांगणे यासारखी तुमची विनंती पूर्ण करू शकेल. तुम्ही वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी सुरू केली असल्यास आणि ऑडिओ रेकॉर्डिंग समाविष्ट केली असल्यास, ही रेकॉर्डिंग Google सर्व्हरवर स्टोअर केली जातात.

Google Assistant हलक्याश्या आवाजाने अ‍ॅक्टिव्हेट होते तेव्हा

"हलक्याश्या आवाजाने होणारी ॲक्टिव्हेशन" ही अशी उदाहरणे आहेत ज्यामध्ये "Ok Google" मॉडेल हे ऑडिओ डिटेक्ट करते किंवा तुम्ही Google Assistant ला जवळजवळ अ‍ॅक्टिव्हेट करण्यासारखे काहीतरी म्हणता ते डिटेक्ट करते.

हलक्याश्या आवाजाने होणारी ॲक्टिव्हेशन यामधील तुमची व्हॉइस रेकॉर्डिंग Google सर्व्हरना पाठवली जात नाहीत, पण "तुमच्या डिव्हाइसवर Assistant कसे ॲक्टिव्हेट होते यामध्ये सुधारणा करा" हे सुरू असल्यास, ती तुमच्या डिव्हाइसवर सेव्ह केली जाऊ शकतात. तुमचे डिव्हाइस रेकॉर्डिंग स्टोअर करते, तेव्हा कदाचित ते काहीही सूचना देणार नाही आणि पुढील गोष्टींसह प्रति दिन कमाल २० रेकॉर्डिंग स्टोअर करू शकते:

  • तुम्ही तुमच्या फोनवर Assistant शी कसे आणि केव्हा संवाद साधता याबद्दलचा डेटा.
  • संवाद कितपत यशस्वी होता.
  • फोन कॉंफिगरेशनची माहिती.

रेकॉर्डिंग तुमच्या डिव्हाइसवर किती वेळ राहतात

"Ok Google" ॲक्टिव्हेशन आणि हलक्याश्या आवाजाने होणारी ॲक्टिव्हेशन यांसंबंधित डिव्हाइसवरील रेकॉर्डिंग तुम्ही आधीच न हटवल्यास, ती तुमच्या डिव्हाइसवर कमाल ६३ दिवस राहतात. तुमच्या डिव्हाइसवरील रेकॉर्डिंग कशी हटवावी याबद्दल जाणून घ्या.

फेडरेटेड लर्निंग सुरू किंवा बंद कसे करावे याबद्दल जाणून घ्या.

तुमच्या सेव्ह केलेल्या ट्रान्स्क्रिप्टबद्दल

"Assistant तुमच्या डिव्हाइसवर कसे अ‍ॅक्टिव्हेट होते यामध्ये सुधारणा करा" हे सुरू असते आणि Google Assistant अ‍ॅक्टिव्हेट होते किंवा हलक्याश्या आवाजाने अ‍ॅक्टिव्हेट होते, तेव्हा त्याने ऐकलेले पहिले कमाल २० शब्द ते तात्पुरते स्टोअर करते. ते पुढील गोष्टीदेखील स्टोअर करते:

  • तुम्ही तुमच्या फोनवर Assistant शी कसे आणि केव्हा संवाद साधता.
  • यशस्वीरीत्या केलेले संवाद.
  • फोन कॉंफिगरेशनची माहिती.

तुमच्या डिव्हाइसमधून कधीही बाहेर न पडता Assistant ची अ‍ॅक्टिव्हेशन तंत्रज्ञाने कशी अ‍ॅडजस्ट करावी याबद्दल जाणून घेण्यासाठी आम्ही हा डेटा वापरतो.

ट्रान्स्क्रिप्ट तुमच्या डिव्हाइसवर किती वेळ राहतात

Assistant च्या अ‍ॅक्टिव्हेशन तंत्रज्ञानांमध्ये सुधारणा करण्यात मदत करण्यासाठी वापरलेली ट्रान्स्क्रिप्ट आणि संलग्न मेटाडेटा तुम्ही न हटवल्यास, तो तुमच्या डिव्हाइसवर कमाल ६३ दिवस राहील. तुमच्या डिव्हाइसवरील ट्रान्स्क्रिप्ट कशी हटवावी याबद्दल जाणून घ्या.

फेडरेटेड लर्निंग सुरू किंवा बंद कसे करावे याबद्दल जाणून घ्या.

तुमच्या सेव्ह केलेल्या इमेजबद्दल

"Assistant तुमच्या डिव्हाइसवर कसे अ‍ॅक्टिव्हेट होते यामध्ये सुधारणा करा" हे सुरू असते आणि Google Assistant अ‍ॅक्टिव्हेट होते, तेव्हा ते तुमच्या डिव्हाइसवर इमेज तात्पुरत्या स्टोअर करते. तुमच्या डिव्हाइसवरील इमेज न गमावता Assistant ची अ‍ॅक्टिव्हेशन तंत्रज्ञाने कशी अ‍ॅडजस्ट करावी याबद्दल जाणून घेण्यासाठी आम्ही या इमेज वापरतो.

इमेज तुमच्या डिव्हाइसवर किती वेळ राहतात

Assistant च्या अ‍ॅक्टिव्हेशन तंत्रज्ञानांमध्ये सुधारणा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इमेज तुम्ही आधीच मॅन्युअली न हटवल्यास, त्या तुमच्या फोनवर कमाल ६३ दिवस राहतात. तुमच्या डिव्हाइसवरील इमेज कशा हटवाव्या याबद्दल जाणून घ्या.

फेडरेटेड लर्निंग सुरू किंवा बंद कसे करावे याबद्दल जाणून घ्या.

फेडरेटेड लर्निंगसह Google Assistant मध्ये सुधारणा कशी होते

Google Assistant हे Assistant च्या अ‍ॅक्टिव्हेशन तंत्रज्ञानांमध्ये सुधारण करण्यासाठी तुमच्या डिव्हाइसवर स्टोअर केलेली व्हॉइस रेकॉर्डिंग, ट्रान्स्क्रिप्ट आणि इमेज वापरते. Google Assistant आवाज, ट्रान्स्क्रिप्ट आणि इमेज डेटा यावरून मॉडेल कसे अ‍ॅडजस्ट करावे हे समजून घेते व मॉडेलमधील बदलांचा सारांश Google च्या सर्व्हरना पाठवते. प्रत्येकासाठी आणखी चांगले मॉडेल देण्याकरिता Google ही माहिती गोळा करते.

डिव्हाइस हे आयडल असते, प्लग इन केलेले असते आणि वाय-फाय शी कनेक्ट केलेले असते तेव्हाच Google Assistant तुमच्या डिव्हाइसवर फेडरेटेड लर्निंगशी संबंधित मोजण्या करते.

फेडरेटेड लर्निंग तुमच्या डेटाचे संरक्षण कसे करते

Google Assistant हे हलक्याश्या आवाजाने अ‍ॅक्टिव्हेट होते, तेव्हा व्हॉइस रेकॉर्डिंग Google सर्व्हरना पाठवले जात नाही. त्याऐवजी ते तुमच्या डिव्हाइसवर स्टोअर केले जाऊ शकते.

Google Assistant अ‍ॅक्टिव्हेट होते, तेव्हा ते तुमचे व्हॉइस रेकॉर्डिंग Google सर्व्हरना पाठवू शकते, जेणेकरून Assistant तुमची विनंती पूर्ण करू शकेल. त्याशिवाय, ते तुमच्या डिव्हाइसवर स्टोअर केले जाऊ शकते.

तुमचे व्हॉइस रेकॉर्डिंग, ट्रान्स्क्रिप्ट किंवा इमेज या गोष्टी तुमच्या डिव्हाइसवर स्टोअर केल्या जातात, तेव्हा त्या एंक्रिप्ट केलेल्या असतात आणि फक्त Assistant च्या अ‍ॅक्टिव्हेशन तंत्रज्ञानांमध्ये सुधारणा करण्यासाठी वापरल्या जातात. त्यांची आवश्यकता नसते, तेव्हा त्या हटवल्या जातात म्हणजेच ६३ दिवसांपेक्षा जास्त दिवस ठेवल्या जात नाहीत.

टीप: Google सर्व्हरनी तुमची व्हॉइस रेकॉर्डिंग स्टोअर करावी की नाही हे नियंत्रित करण्यासाठी, माझ्या अ‍ॅक्टिव्हिटी कंट्रोल वर जा.

सेटिंग्ज आणि तुमचा डेटा व्यवस्थापित करा

बाय डीफॉल्ट, Assistant च्या अ‍ॅक्टिव्हेशन तंत्रज्ञानांमध्ये सुधारणा करण्यासाठी फेडरेटेड लर्निंग वापरणे हे बंद केलेले असते.

Assistant च्या अ‍ॅक्टिव्हेशन तंत्रज्ञानांसाठी फेडरेटेड लर्निंग सुरू करा
  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, "Ok Google, Assistant सेटिंग्ज उघड" असे म्हणा.
  2. "सर्व सेटिंग्ज" या अंतर्गत, Assistant कसे अ‍ॅक्टिव्हेट होते यामध्ये सुधारणा करण्यात मदत करा वर टॅप करा. तुम्हाला सेटिंग न आढळल्यास, सर्वप्रथम तुम्ही वर टॅप करा.
  3. तुमच्या डिव्हाइसवर Assistant कसे अ‍ॅक्टिव्हेट होते यामध्ये सुधारणा करा हे सुरू करा.

हे सेटिंग सुरू केल्यामुळे तुमचा डेटा कसा गोळा, स्टोअर केला जातो किंवा वेगळ्या सेटिंग्ज अंतर्गत कसा वापरला जातो यावर परिणाम होणार नाही.

Assistant च्या अ‍ॅक्टिव्हेशन तंत्रज्ञानांसाठी फेडरेटेड लर्निंग बंद करा आणि तुमच्या डिव्हाइसवरील व्हॉइस रेकॉर्डिंग, ट्रान्स्क्रिप्ट व इमेज हटवा
  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, "Ok Google, Assistant सेटिंग्ज उघड" असे म्हणा.
  2. "सर्व सेटिंग्ज" या अंतर्गत, Assistant कसे अ‍ॅक्टिव्हेट होते यामध्ये सुधारणा करण्यात मदत करा वर टॅप करा. तुम्हाला सेटिंग न आढळल्यास, सर्वप्रथम तुम्ही वर टॅप करा.
  3. तुमच्या डिव्हाइसवर Assistant कसे अ‍ॅक्टिव्हेट होते यामध्ये सुधारणा करा हे बंद करा.

तुम्ही Assistant च्या अ‍ॅक्टिव्हेशन तंत्रज्ञानांमध्ये फेडरेटेड लर्निंग बंद करता तेव्हा

  • Google Assistant ने युक्त डिव्हाइसच्या अ‍ॅक्टिव्हेशनमध्ये सुधारणा करण्यासाठी, Google Assistant ने तुमच्या डिव्हाइसवर स्टोअर केलेली व्हॉइस रेकॉर्डिंग, ट्रान्स्क्रिप्ट आणि इमेज ते हटवते.
  • "Ok Google" त्याचप्रमाणे काम करणे पुढे सुरू राहते.
  • हे सेटिंग बंद केल्यामुळे तुमचा डेटा कसा गोळा, स्टोअर केला जातो किंवा वेगळ्या सेटिंग्ज अंतर्गत कसा वापरला जातो यावर परिणाम होणार नाही. तुम्ही वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी सुरू केली असल्यास आणि ऑडिओ रेकॉर्डिंग समाविष्ट केली असल्यास, Assistant हे Google सर्व्हरवर स्टोअर केलेली व्हॉइस रेकॉर्डिंग हटवणार नाही. Google सर्व्हरवरून तुमची व्हॉइस रेकॉर्डिंग कशी हटवावी याबद्दल जाणून घ्या.
Google सर्व्हरवरून तुमची व्हॉइस रेकॉर्डिंग हटवा

माझी अ‍ॅक्टिव्हिटी यामध्ये, तुम्हाला Google Assistant वरील तुमच्या मागील अ‍ॅक्टिव्हिटीची सूची दिसेल. अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये रेकॉर्डिंग समाविष्ट असल्यास, त्यामध्ये ऑडिओ आयकन बोला असतो.

  1. माझी अ‍ॅक्टिव्हिटी मधील तुमची Google Assistant अ‍ॅक्टिव्हिटी वर जा.
  2. तुम्हाला हटवायची असलेली अ‍ॅक्टिव्हिटी शोधा:
    • विशिष्ट अ‍ॅक्टिव्हिटी आणि रेकॉर्डिंग हटवण्यासाठी: तुम्हाला जी अ‍ॅक्टिव्हिटी आणि रेकॉर्डिंग हटवायचे आहे त्याच्या बाजूला, आणखी आणखी आणि त्यानंतर हटवा निवडा.
    • फक्त रेकॉर्डिंग असलेल्या अ‍ॅक्टिव्हिटीऐवजी संपूर्ण Google Assistant अ‍ॅक्टिव्हिटी हटवण्यासाठी: सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर पासूनची अ‍ॅक्टिव्हिटी हटवा आणि त्यानंतर संपूर्ण वेळ निवडा.

तुमची ऑडिओ रेकॉर्डिंग कशी व्यवस्थापित करावी याबद्दल अधिक जाणून घ्या.

Google सर्व्हरवर तुमची व्हॉइस रेकॉर्डिंग स्टोअर करू नका
  1. तुमच्या अ‍ॅक्टिव्हिटी कंट्रोल वर जा.
  2. वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी सुरू केली असल्यास, "व्हॉइस आणि ऑडिओ अ‍ॅक्टिव्हिटी समाविष्ट करा" याच्या बाजूला असलेल्या चौकटीतली खूण काढा.
    • वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी बंद केलेली असते, तेव्हा "व्हॉइस आणि ऑडिओ अ‍ॅक्टिव्हिटी समाविष्ट करा" या चौकटीत खूण केलेली नसते, Google Assistant तुमची व्हॉइस रेकॉर्डिंग Google सर्व्हरवर अ‍ॅक्टिव्हपणे स्टोअर करत नाही.

वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी याबद्दल अधिक जाणून घ्या.

"Ok Google" बंद करा
  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, "Ok Google, Assistant सेटिंग्ज उघडा" असे म्हणा किंवा Assistant सेटिंग्ज वर जा.
  2. "सर्व सेटिंग्ज" या अंतर्गत, सर्वसाधारण वर टॅप करा.
  3. Google Assistant बंद करा.
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
11340474328961886306
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
1633398
false
false