तुमच्या Android फोनवर सेटिंग्ज झटपट बदलणे

तुम्ही क्विक सेटिंग्ज वापरून तुमच्या फोनवरील कोणत्याही स्क्रीनवरून तुमची सेटिंग्ज शोधू आणि बदलू शकता. तुम्ही बरेचदा बदलणाऱ्या सेटिंग्जवर जाण्यासाठी, तुम्ही ती क्विक सेटिंग्ज मध्ये जोडू किंवा हलवू शकता.

महत्त्वाचे:

यांपैकी काही पायऱ्यांमध्ये तुम्ही स्क्रीनला स्पर्श करणे आवश्यक आहे.

क्विक सेटिंग्ज उघडा

  1. तुमची सुरुवातीची काही सेटिंग्ज शोधण्यासाठी, तुमच्या स्क्रीनच्या सर्वात वरून खाली स्वाइप करा.
  2. तुमची सर्व क्विक सेटिंग्ज शोधण्यासाठी, पुन्हा खाली स्‍वाइप करा.

सेटिंग्ज सुरू किंवा बंद करा

  • सेटिंग सुरू किंवा बंद करण्यासाठी, त्यावर टॅप करा. मंद केलेली सेटिंग्ज बंद आहेत.
  • सेटिंगसाठी आणखी पर्याय मिळवण्यासाठी, त्याला स्‍पर्श करा आणि धरून ठेवा.

सेटिंग जोडा, काढून टाका किंवा हलवा

  1. तुमच्या स्क्रीनच्या सर्वात वरच्या बाजूने, दोनदा खाली स्‍वाइप करा.
  2. तळाशी उजवीकडे, संपादित करा वर टॅप करा.
  3. सेटिंगला स्‍पर्श करून धरून ठेवा.
  4. तुम्हाला हवे तेथे सेटिंग ड्रॅग करा.
    • सेटिंग जोडण्याकरिता, ते "टाइल जोडण्यासाठी धरून ठेवून ड्रॅग करा" येथून वरती ड्रॅग करा.
    • सेटिंग काढून टाकण्याकरिता, "काढून टाकण्यासाठी येथे ड्रॅग करा" येथे खाली ड्रॅग करा.

टीप:

  • काही ॲप्स ही तुमच्‍या क्विक सेटिंग्ज मेनूमध्‍ये त्‍यांचा आयकन टाइल म्‍हणून जोडायचा आहे का याबाबत तुम्हाला विचारू शकतात. तुम्ही ते कधीही काढून टाकू शकता किंवा पुन्हा जोडू शकता. 
  • तुम्ही अनेक सेटिंग्ज सुरू केली असल्यास, स्क्रीनवरील जागेची बचत व्हावी यासाठी तुमचा फोन काही वेळा आयकन लपवतो. लपवलेले आयकन शोधण्यासाठी, तुमच्या फोनच्या स्क्रीनच्या सर्वात वरती, तुम्हाला बिंदू दिसेल.

ऑडिओ आणि व्हिडिओ नियंत्रित करा

  • तुमच्या फोनवर काय प्ले होत आहे हे पाहण्यासाठी, तुमच्या स्क्रीनच्या वरच्या बाजूने खाली स्वाइप करा.
  • मीडिया प्ले होत असलेले ॲप उघडण्यासाठी, पॅनलवर टॅप करा.
  • तुम्ही एकाहून अधिक मीडिया अ‍ॅप वापरत असल्यास, ती शोधण्यासाठी उजवीकडे किंवा डावीकडे स्‍वाइप करा.
  • आवाज कुठे प्ले होत आहे हे बदलण्यासाठी, पॅनलच्या सर्वात वरती उजवीकडे, तुमच्या ऑडिओ ॲक्सेसरीच्या नावावर टॅप करा. उदाहरणार्थ, "स्पीकर" किंवा "Pixel बड".
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
11564602706293949779
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
false
false