तुमच्या Android डिव्हाइसवर स्क्रीनशॉट घेणे किंवा तुमची स्क्रीन रेकॉर्ड करणे

तुम्ही तुमच्या फोनच्या स्क्रीनचा फोटो (स्क्रीनशॉट) घेऊ शकता किंवा व्हिडिओ रेकॉर्ड करू शकता. तुम्ही तुमची स्क्रीन कॅप्चर केल्यानंतर, इमेज किंवा व्हिडिओ पाहू, संपादित आणि शेअर करू शकता.

महत्त्वाचे: यांपैकी काही पायर्‍या फक्त Android 11 आणि त्यावरील आवृत्त्यांवर काम करतात. तुमची Android आवृत्ती कशी तपासायची ते जाणून घ्या.

स्क्रीनशॉट घ्या

  1. तुम्हाला कॅप्चर करायची असलेली स्क्रीन उघडा.
  2. तुमच्या फोननुसार:
    • पॉवर आणि व्‍हॉल्‍यूम कमी बटणे एकाच वेळी दाबा.
    • ते काम करत नसल्यास, पॉवर बटण काही सेकंदांसाठी दाबा आणि धरून ठेवा. त्यानंतर स्क्रीनशॉट वर टॅप करा.
    • यांपैकी काहीही काम करत नसल्यास, मदतीसाठी तुमच्या फोन उत्पादकाची सपोर्ट साइट यावर जा.
  3. तळाशी डावीकडे, तुम्हाला तुमच्या स्क्रीनशॉटचे पूर्वावलोकन दिसेल. काही फोनवर, स्क्रीनच्या सर्वात वरती, तुम्हाला स्क्रीनशॉट कॅप्चर दिसेल.

स्क्रोलिंग स्क्रीनशॉट घ्या

महत्त्वाचे: या पायऱ्या Android 12 आणि त्यावरील आवृत्ती रन करणाऱ्या डिव्हाइसवर, स्क्रोल करू शकणाऱ्या बऱ्याच स्क्रीनवर काम करतात.
  1. तुम्हाला कॅप्चर करायची असलेली स्क्रीन उघडा.
  2. पॉवर आणि व्‍हॉल्‍यूम कमी बटणे एकाच वेळी दाबा.
  3. तळाशी, आणखी कॅप्चर करा वर टॅप करा.
  4. तुम्हाला कॅप्चर करायचा असलेला आशय निवडण्यासाठी, क्रॉप करण्याकरिता असलेली मार्गदर्शक तत्त्वे वापरा.

तुमचा स्क्रीनशॉट शोधा, तो शेअर आणि संपादित करा

टीप: तुमच्याकडे Photos ॲप नसल्यास, तुम्ही बहुदा जुनी Android आवृत्ती रन करत आहात. तुमच्या फोनचे Gallery ॲप उघडा आणि अल्बम व्ह्यू आणि त्यानंतर स्क्रीनशॉट फोल्डर वर टॅप करा.

  1. Photos अ‍ॅप उघडा.
  2. लायब्ररी आणि त्यानंतर स्क्रीनशॉट वर टॅप करा.
    • स्क्रीनशॉट शेअर करण्यासाठी, शेअर कराShare वर टॅप करा.
    • स्क्रीनशॉट संपादित करण्यासाठी, संपादित करा Edit वर टॅप करा.

तुमची फोन स्क्रीन रेकॉर्ड करा

  1. स्क्रीनच्या वरच्या बाजूने खालीट्वाइस  स्वाइप करा.
  2. स्क्रीन रेकॉर्ड करा वर टॅप करा.
    • ते शोधण्यासाठी तुम्हाला उजवीकडे स्वाइप करावे लागू शकते.
    • ते तेथे नसल्यास, संपादित करा वर टॅप करा आणि तुमच्या क्विक सेटिंग्ज वर स्क्रीन रेकॉर्ड करा ड्रॅग करा.
  3. तुम्हाला काय रेकॉर्ड करायचे आहे ते निवडा आणि सुरुवात करा वर टॅप करा. काउंटडाउननंतर रेकॉर्ड करणे सुरू होईल.
    • तुम्ही सुरुवात करण्यापूर्वी, ऑडिओ रेकॉर्ड करण्याचे आणि स्क्रीनवर केलेले स्पर्श दाखवावे की नाही हे निवडू शकता.
  4. रेकॉर्ड करणे थांबवण्यासाठी, स्क्रीनच्या वरच्या बाजूने खाली स्‍वाइप करा आणि स्क्रीन रेकॉर्डर सूचना वर टॅप करा.

स्क्रीन रेकॉर्डिंग शोधा

  1. Photos अ‍ॅप उघडा.
  2. लायब्ररी आणि त्यानंतर चित्रपट वर टॅप करा.

संबंधित स्रोत

अधिक मदत आवश्‍यक?

या पुढील पायर्‍या करून पाहा:

true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
2443431479619473163
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
false
false