Android डिव्हाइस कॉंफिगरेशन सेवा याबद्दल जाणून घ्या

Android डिव्हाइस कॉंफिगरेशन सेवा ही वेळोवेळी Android डिव्हाइसमधील डेटा Google ला पाठवते. तुमचे डिव्हाइस अप-टू-डेट राहील आणि शक्य तेवढे सुरळीतपणे काम करत आहे याची खात्री करण्यासाठी Google ला या डेटामुळे मदत होते. 

कोणता डेटा गोळा केला जातो

Android डिव्हाइस कॉंफिगरेशन सेवा ही Android डिव्हाइसकडून पुढील गोष्टींच्या समावेशासह माहिती गोळा करते:

  • डिव्हाइस आणि खाते आयडेंटिफायर
  • डिव्हाइसच्या विशेषता
  • सॉफ्टवेअर आणि सुरक्षा सॉफ्टवेअरच्या आवृत्त्या
  • नेटवर्क कनेक्टिव्हिटी आणि परफॉर्मन्स डेटा

डिव्हाइस हे सहसा काही ठरावीक दिवसांनी Android डिव्हाइस कॉंफिगरेशन सेवेशी कनेक्ट होतात. काही डेटा पॉइंट (उदा. टाइमस्टॅंप) वगळता, Android डिव्हाइस कॉंफिगरेशन सेवा ही तुमच्या डिव्हाइसने नवीन माहिती पाठवल्यानंतर ती मागील डेटासह बदलते आणि तुमच्या Android डिव्हाइसने पाठवलेल्या माहितीची फक्त नवीनतम कॉपी ठेवते.

Google या डेटाचे काय करते

आम्ही Android डिव्हाइस कॉंफिगरेशन सेवेमधून मिळवलेला डेटा विविध उद्देशांसाठी वापरतो, जसे की:

  • तुमच्या डिव्हाइसला सॉफ्टवेअर अपडेट आणि सुरक्षा पॅच मिळत असल्याची खात्री करण्यात मदत करणे: उदाहरणार्थ, तुमच्या डिव्हाइसवरील सुरक्षा पॅच पातळी ही तुम्हाला अपडेटची आवश्यकता आहे का, निर्धारित करण्यासाठी वापरली जाते.
  • वेगवेगळे तपशील आणि सॉफ्टवेअर वापरणाऱ्या विविधता असलेल्या सर्व Android डिव्हाइसवर ॲप्स आणि सेवा काम करतील याची खात्री करणे: उदाहरणार्थ, तुम्हाला सॉफ्टवेअरच्या कंपॅटिबल आवृत्त्या दिल्या गेल्या आहेत याची खात्री करण्यासाठी Google Play हे तुमच्या स्क्रीन लेआउट यांसारख्या विशेषता वापरू शकते.
  • तुमचे डिव्हाइस आणि Android व्यवस्थेचा घोटाळा, गैरवापर आणि इतर हानिकारक वर्तनापासून संरक्षण करणे: उदाहरणार्थ, तुमच्या खात्याचे संरक्षण करण्यासाठी, लॉगइनशी संबंधित संशयास्पद वर्तन ओळखण्यात आम्हाला मदत व्हावी याकरिता आम्ही डिव्हाइस आयडेंटिफायर वापरतो.
  • Android डिव्हाइसबद्दलच्या एकूण मेट्रिक नोंद करून ठेवणे: उदाहरणार्थ, कनेक्टिव्हिटी राखणे आणि बॅटरी लाइफ टिकवून ठेवणे यांमधील ट्रेड ऑफ ऑप्टिमाइझ करण्यासाठी, डिव्हाइस हे मोबाइल नेटवर्कशी कसे कनेक्ट होतात याच्याशी संबंधित अनामित डेटा वापरतो.

मी हा डेटा हटवू शकतो/शकते का?

कारण, तुमचे डिव्हाइस काम करत आहे आणि योग्यरीत्या अपडेट केलेले आहे याची खात्री करण्यासाठी Android डिव्हाइस कॉंफिगरेशन सेवा यामधील डेटा महत्त्वाचा आहे, तुमचे डिव्हाइस वापरले जात असल्यास, तुम्ही डेटा हटवू शकत नाही. Android डिव्हाइस कॉंफिगरेशन सेवा ही Google चे गोपनीयता धोरण याचे अनुसरण करते.

तुम्ही तुमच्या Google खाते मधून साइन आउट केल्यास किंवा तुमच्या Android डिव्हाइसवरून ते पूर्णपणे हटवल्यास, कॉंफिगरेशनची माहिती यापुढे तुमच्या Google खात्याशी संबंधित राहणार नाही. Android डिव्हाइस कॉंफिगरेशन सेवा ही इनॅक्टिव्हिटीच्या कालावधीनंतर तुमचा डेटा आपोआप हटवेल.

Android डिव्हाइस कॉंफिगरेशन सेवा ही कोणता डेटा गोळा करते याबद्दल जाणून घ्या

तुमच्या Google खाते शी लिंक केलेल्या Android डिव्हाइस कॉंफिगरेशन सेवे च्या डेटाची कॉपी तुम्ही डाउनलोड करू शकता. तुमचा डेटा डाउनलोड करणे याबद्दल अधिक जाणून घ्या.

  1. तुमचा डेटा डाउनलोड करणे या पेजला भेट द्या.
  2. Android डिव्हाइस कॉंफिगरेशन सेवा हे निवडा आणि तुमच्या खात्याशी संबंधित असलेल्या डिव्हाइसच्या डेटाचा समावेश केला जाईल.
  3. पुढील वर क्लिक करा.
  4. संग्रहणाशी संबंधित प्राधान्ये निवडा.
  5. संग्रहण तयार करा वर क्लिक करा.

गोळा केलेल्या डेटाच्या वर्गवाऱ्या

Android डिव्हाइस कॉंफिगरेशन सेवेद्वारे गोळा केला जाणाऱ्या डेटाची आणि आम्ही तो कशासाठी वापरतो याची ही काही उदाहरणे आहेत:

वर्गवारी

डेटाची उदाहरणे

Google डेटा कसा वापरते

डिव्हाइस आणि खाते आयडेंटिफायर
  • IMEI, MEID आणि ESN नंबर
  • डिव्हाइसचा सिरीअल नंबर
  • Google सेवा फ्रेमवर्क Android आयडी (किंवा "Android आयडी") टीप: हा सेटिंग्ज सिक्युअर Android आयडी पेक्षा वेगळा आहे.
  • Google खाते (ते अ‍ॅक्टिव्हेट केलेले असते तेव्हा)*
  • MAC अ‍ॅड्रेस
तुमच्या खात्याचे संरक्षण करण्यासाठी, साइन-इनशी संबंधित संशयास्पद वर्तन शोधण्यात आम्हाला मदत करण्यासाठी आम्ही डिव्हाइस आयडेंटिफायर वापरतो.
डिव्हाइसच्या विशेषता
  • हार्डवेअरचा प्रकार
  • उत्पादन
  • मॉडेल
  • निर्माता
  • सपोर्ट असलेले स्थानिक प्लॅटफॉर्म / CPU चे प्रकार
  • कीबोर्ड, नेव्हिगेशन आणि स्क्रीन लेआउटचे प्रकार
  • स्क्रीनचा आकार (पिक्सेलनुसार उंची आणि रुंदी)
  • एकूण मेमरी
  • लोकॅल
  • टाइमझोन
तुम्हाला कंपॅटिबल सॉफ्टवेअरच्या आवृत्त्या दिल्या गेल्या आहेत याची खात्री करण्यासाठी Google Play हे स्क्रीन लेआउट यांसारख्या विशेषता वापरू शकते.
सिस्टीम आणि सुरक्षा सॉफ्टवेअरच्या आवृत्त्या
  • OS बिल्‍ड स्ट्रिंग (OS बिल्‍ड फिंगरप्रिंट या नावानेदेखील ओळखली जाते)
  • OS बिल्ड टाइमस्टॅंप
  • Android आवृत्ती
  • Google सेवा ची आवृत्ती
तुम्हाला अपडेटची आवश्यकता आहे का हे निर्धारित करण्यासाठी तुमच्या डिव्हाइसवरील सुरक्षा पॅचची पातळी वापरली जाते.
नेटवर्क कनेक्टिव्हिटी आणि परफॉर्मन्स
  • सिम आणि मोबाइल ऑपरेटर
  • आयपी अ‍ॅड्रेस
  • सिम सदस्यत्व डेटा (सिम ऑपरेटर MCC/MNC, वाहकाचे नाव, रोमिंगची स्थिती, सिमच्या डीफॉल्ट भूमिका, शेवटचे पाच अंक राउंड डाउन करून कमी केलेला IMSI, गट आयडी पातळी १)
  • Android डिव्हाइस कॉंफिगरेशन सेवेच्या मागील ५० कॉंफिगरेशनचे टाइमस्टॅंप आणि बिल्‍डमधील बदलांच्या समावेशासह मागील १० कनेक्शनची बिल्‍डशी संबंधित माहिती
  • अयशस्वी झालेल्या मागील १० कॉंफिगरेशन कनेक्शनचे टाइमस्टॅंप आणि HTTP प्रतिसाद कोड
कनेक्टिव्हिटी कायम ठेवणे आणि बॅटरी लाइफ टिकवून ठेवणे यांमधील ट्रेड ऑफ ऑप्टिमाइझ करण्यासाठी डिव्हाइस हे मोबाइल नेटवर्कशी कसे कनेक्ट होतात याच्याशी संबंधित अनामित डेटा आम्ही वापरतो.


*एका डिव्हाइसवर एकापेक्षा जास्त खात्यांमध्ये साइन इन केले असल्यास, Google खाते माहिती ही डेटा डाउनलोड मध्ये दिली जाऊ शकत नाही.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
17492623538194258004
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
false
false