तुमची Android आवृत्ती तपासणे आणि अपडेट करणे

महत्त्वाचे: तुमच्या Android डिव्हाइसची बॅटरी सॉफ्टवेअर अपडेटनंतर आणखी ड्रेन होणे सामान्य आहे, कारण ते अपडेट डाउनलोड करण्यासाठी, ऑप्टिमाइझ करण्यासाठी आणि इंस्टॉल करण्यासाठी कठोर परिश्रम करते.

तुमच्या Settings अ‍ॅपमध्ये तुम्हाला तुमच्या डिव्हाइसच्या Android आवृत्तीचा क्रमांक, सुरक्षा अपडेट पातळी आणि Google Play सिस्टीम पातळी सापडू शकते. तुमच्यासाठी अपडेट उपलब्ध झाल्यावर तुम्हाला सूचना मिळतील. तुम्ही अपडेटसाठी तपासूदेखील शकता.

तुमच्याकडे कोणती Android आवृत्ती आहे ते तपासा

  1. तुमच्या फोनचे Settings अ‍ॅप उघडा.
  2. तळाजवळ, फोनबद्दल आणि त्यानंतर Android आवृत्ती वर टॅप करा.
  3. तुमची "Android आवृत्ती," "Android सुरक्षा अपडेट" आणि "बिल्‍ड नंबर" शोधा.

तुमच्यासाठी उपलब्ध असलेली नवीनतम Android अपडेट मिळवा

तुम्हाला सूचना मिळाल्यावर, ती उघडा आणि अपडेट करण्याच्या कृतीवर टॅप करा.

तुम्ही तुमची सूचना साफ केली असल्यास किंवा तुमचे डिव्हाइस ऑफलाइन असल्यास:

  1. तुमच्या डिव्हाइसचे Settings अ‍ॅप उघडा.
  2. सिस्टीम आणि त्यानंतर सिस्टीम अपडेट वर टॅप करा.
  3. तुम्हाला तुमच्या अपडेटचे स्टेटस दिसेल. स्क्रीनवरील पायऱ्या फॉलो करा.

सुरक्षा अपडेट आणि Google Play सिस्टीम अपडेट मिळवा

बहुतांश सिस्टीम अपडेट आणि सुरक्षा पॅच आपोआप होतात. अपडेट उपलब्ध आहे का हे तपासण्यासाठी:

  1. तुमच्या डिव्हाइसचे Settings अ‍ॅप उघडा.
  2. सुरक्षा आणि गोपनीयता आणि त्यानंतर सिस्टीम आणि अपडेट.
    • सुरक्षा अपडेटसाठी, सुरक्षा अपडेट वर टॅप करा.
    • Google Play सिस्टीम अपडेटसाठी, Google Play सिस्टीम अपडेट वर टॅप करा.
  3. स्क्रीनवरील सर्व पायऱ्या फॉलो करा.

टीप: तुम्हाला उपलब्ध असलेले अपडेट न मिळाल्यास, तुम्ही तुमचा फोन रीस्टार्ट करून पाहू शकता.

तुम्हाला Android अपडेट कधी मिळतील

डिव्हाइस, निर्माता आणि मोबाइल वाहकानुसार अपडेटची शेड्युल बदलतात.

महत्त्वाचे: जुनी डिव्हाइस नेहमीच नवीन आवृत्त्या रन करू शकत नाहीत.

अपडेटसंबंधी समस्‍येचे निराकरण करा

पुरेशी जागा उपलब्ध नाही

तुम्हाला "पुरेशी जागा उपलब्ध नाही" ही सूचना मिळाल्यास, यावरील स्टोरेज कसे मोकळे करावे ते जाणून घ्या:

अपडेट डाउनलोड झाले नाही

अपडेटला आपोआप पुन्हा प्रयत्न करू द्या

अपडेट डाउनलोड होणे सुरू झाल्यास आणि ते पूर्ण न झाल्यास, तुमचे डिव्हाइस पुढील काही दिवसांत आपोआप पुन्हा प्रयत्न करेल.
त्याने पुन्हा प्रयत्न केल्यावर, तुम्हाला सूचना मिळेल. सूचना उघडा आणि अपडेट करण्याच्या कृतीवर टॅप करा.

सुरक्षा अपडेटसाठी Android आवृत्ती अपडेट करा

तुमच्या डिव्हाइससाठी उपलब्ध असलेली नवीनतम सुरक्षा अपडेट मिळवण्यासाठी, तुमच्याकडे तुमच्या डिव्हाइससाठी Android ची नवीनतम आवृत्ती असल्याची खात्री करा.
अपडेट कधी अ‍ॅक्टिव्ह होतात

Pixel फोन आणि Pixel Tablet

Pixel फोन आणि Pixel Tablet हे डाउनलोड केलेली Android अपडेट बॅकग्राउंडमध्ये इंस्टॉल करतात. इंस्टॉल केलेली अपडेट तुम्ही पुढील वेळी तुमचे डिव्हाइस रीस्टार्ट केल्यावर अ‍ॅक्टिव्ह होतात. 

इतर Android डिव्हाइस

डाउनलोड केलेली Android अपडेट इंस्टॉल करताना, अनेक Android फोन आणि टॅबलेट आपोआप रीस्टार्ट होतात. इंस्टॉलेशन पूर्ण झाल्यावर अपडेट अ‍ॅक्टिव्ह होतात.

संबंधित स्रोत

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
7484390530041115883
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
false
false