कोणती अ‍ॅप्स तुमच्या Android डिव्हाइसचे स्थान वापरतात हे निवडणे

तुम्ही अ‍ॅप्सना तुमच्यासाठी कृती करण्याकरिता किंवा तुम्हाला माहिती देण्याकरिता तुमच्या डिव्हाइसचे स्थान वापरण्याची परवानगी देऊ शकता. उदाहरणार्थ, प्रवासाच्या रहदारीची माहिती दाखवण्यासाठी किंवा जवळपासची रेस्टॉरंट शोधण्यासाठी अ‍ॅप्स तुमच्या डिव्हाइसचे स्थान वापरू शकतात.

महत्त्वाचे: यांपैकी काही पायर्‍या फक्त Android 11 आणि त्यावरील आवृत्त्यांवर काम करतात. तुमची Android आवृत्ती कशी तपासायची ते जाणून घ्या.

कोणती अ‍ॅप्स तुमच्या डिव्हाइसचे स्थान वापरतात हे जाणून घ्या

  1. स्क्रीनच्या सर्वात वरून खाली स्वाइप करा. 
  2. स्थान ला स्‍पर्श करा आणि धरून ठेवा. तुम्हाला स्थान न मिळाल्यास:
    1. संपादित करा संपादित करा किंवा सेटिंग्ज वर टॅप करा. त्यानंतर तुमच्या क्विक सेटिंग्ज मध्ये स्थान  ड्रॅग करा.
  3. अ‍ॅप च्या स्थान परवानग्या वर टॅप करा.
  4. “नेहमी अनुमती दिलेली”, “फक्त वापरात असताना अनुमती दिलेली” आणि “अनुमती नाही” अंतर्गत, तुमच्या फोनचे स्थान वापरू शकणारी अ‍ॅप्स शोधा.
  5. अ‍ॅपच्या परवानग्या बदलण्यासाठी त्यावर टॅप करा. त्यानंतर अ‍ॅपसाठी स्थान अ‍ॅक्सेस निवडा. अ‍ॅप परवानग्यांबद्दल जाणून घ्या.
टीप: या पायर्‍या तुमच्यासाठी उपयुक्त नसल्यास, तुमच्या डिव्हाइसच्या निर्मात्याकडून मदत मिळवणे हे करा.

तुमच्या डिव्हाइसचे स्थान वापरण्यापासून अ‍ॅपला थांबवा

कोणती अ‍ॅप्स केव्हा तुमच्या डिव्हाइसचे स्थान अ‍ॅक्सेस करू आणि वापरू शकतात ते तुम्ही नियंत्रित करू शकता. उदाहरणार्थ, तुम्हाला चालकांसाठी दिशानिर्देश देण्याकरिता तुम्ही Google Maps ला तुमच्या डिव्हाइसचे स्थान वापरू देऊ शकता, पण गेम किंवा सोशल मीडिया अ‍ॅपसह तुमचे स्थान शेअर न करणे निवडू शकता.

  1. तुमच्या डिव्हाइसच्या होम स्क्रीनवर, अ‍ॅप आयकन शोधा.
  2. अ‍ॅप आयकनला स्‍पर्श करून धरून ठेवा.
  3. ॲपची माहिती वर टॅप करा.
  4. परवानग्या आणि त्यानंतर स्थान वर टॅप करा.
  5. पर्याय निवडा:
    • नेहमी: अ‍ॅप तुमचे स्थान कधीही वापरू शकते.
    • फक्त अ‍ॅप वापरताना: तुम्ही अ‍ॅप वापरत असाल, तेव्हाच अ‍ॅप तुमचे स्थान वापरू शकते.
    • प्रत्येक वेळी विचारा: तुम्ही प्रत्येक वेळी अ‍ॅप उघडता, तेव्हा ते तुमचे स्थान वापरण्याची परवानगी मागेल. अ‍ॅपला तुम्ही बंद करेपर्यंत ते सेटिंग वापरू शकते.
    • नकार द्या: तुम्ही अ‍ॅप वापरत असतानाही अ‍ॅप तुमचे स्थान वापरू शकत नाही.
  6. तुम्ही स्थान अ‍ॅक्सेसची अनुमती दिली असल्यास, तुम्ही अचूक स्थान वापरा हे सुरू किंवा बंददेखील करू शकता.

टीप: तुमच्या डिव्हाइसचे स्थान वापरण्यापासून सर्व अ‍ॅप्सना थांबवण्यासाठी, learn how to turn off location settings.

एखादे अ‍ॅप तुमच्या डिव्हाइसचे स्थान कसे वापरते हे जाणून घ्या

महत्त्वाचे: एखाद्या अ‍ॅपला तुमच्या डिव्हाइसचे स्थान वापरण्याची परवानगी असल्यास, ते तुमच्या डिव्हाइसचे अंदाजे स्थान, अचूक स्थान किंवा दोन्ही वापरू शकते.

  1. तुमच्या डिव्हाइसच्या होम स्क्रीनवर, अ‍ॅप आयकन शोधा.
  2. अ‍ॅप आयकनला स्‍पर्श करून धरून ठेवा.
  3. ॲपची माहिती वर टॅप करा.
  4. परवानग्या आणि त्यानंतर आणखी More आणि त्यानंतर सर्व परवानग्या वर टॅप करा.
  5. "स्थान" अंतर्गत, तुम्ही अ‍ॅपने विनंती केलेला स्थानाचा प्रकार पाहू शकता. तुम्हाला "स्थान" सापडत नसल्यास, या अ‍ॅपने तुमच्या डिव्हाइसचे स्थान मागितले नाही.

ॲप्स विनंती करू शकणारे स्थानाचे प्रकार:

  • अंदाजे स्थान: तुमचे डिव्हाइस सुमारे ३ चौरस किलोमीटर भागात असल्याचे ॲप सांगू शकते.
  • अचूक स्थान: अ‍ॅप तुमच्या डिव्हाइसचे अचूक स्थान सांगू शकते.
  • फोरग्राउंडमध्ये: अ‍ॅप तुमच्या स्क्रीनवर उघडलेले असते किंवा तुम्ही अ‍ॅपला काहीतरी करण्यासाठी सांगता, तेव्हाच अ‍ॅप तुमचे स्थान वापरू शकते.
  • बॅकग्राउंडमध्ये: तुम्ही अ‍ॅप वापरत नसलात, तरीही ते कधीही स्थान माहिती वापरू शकते.

Why apps ask you to change location settings

  • "स्थान सेटिंग बदलायचे आहे का?": अ‍ॅपला योग्यरीत्या काम करता यावे यासाठी तुमच्या डिव्हाइसचे स्थान सुरू केलेले असणे आवश्यक आहे.
  • "स्थान अचूकतेमध्ये सुधारणा करायची आहे का?": एखाद्या अ‍ॅपसाठी स्थान आधीपासून सुरू केलेले असल्यास, तुमच्या डिव्हाइसचे स्थान आणखी चांगल्यारीतीने शोधता यावे यासाठी अ‍ॅप तुम्हाला आणखी सेटिंग्ज किंवा सेन्सर सुरू करण्यास सांगू शकते.
  • वाय-फाय कनेक्शन: अ‍ॅप तुम्हाला वाय-फाय सुरू करण्यास सांगू शकते किंवा तुमच्या डिव्हाइसला वाय-फाय नेटवर्क शोधू देऊ शकते. वाय-फायसाठी स्कॅन करणे हे तुमच्या डिव्हाइसचे स्थान अधिक अचूकपणे शोधण्यात मदत करते.
  • Google स्थान सेवा: अ‍ॅप्सना तुमच्या डिव्हाइसचे स्थान अधिक अचूकपणे शोधू द्या. Learn how Google Location Accuracy improves your location info. Google स्थान अचूकता चे दुसरे नाव Google स्थान सेवा आहे.

Change other location settings

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
13226614510730860129
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
false
false