महत्त्वाचे:
- यांपैकी काही पायर्या फक्त Android 12 आणि त्यावरील आवृत्त्यांवर काम करतात. तुमची Android ची आवृत्ती कशी तपासायची ते जाणून घ्या.
- यांपैकी काही पायऱ्यांमध्ये तुम्ही स्क्रीनला स्पर्श करणे आवश्यक आहे.
तुमच्या फोनवर उपलब्ध असलेली स्थान सेटिंग्ज समजून घ्या
महत्त्वाचे: तुम्ही तुमच्या फोनवर स्थान बंद केल्यास, अॅप्स आणि सेवा तुमच्या फोनचे स्थान मिळवू शकत नाही. तुम्हाला तुमच्या आयपी अॅड्रेसवर आधारित स्थानिक परिणाम आणि जाहिराती अजूनही मिळू शकतात.
Google कडे स्थान आधारित सेवा आहेत, ज्यात पुढील गोष्टींचा समावेश आहे:
- तुमच्या डिव्हाइससाठी स्थान अचूकता (म्हणजेच Google स्थान सेवा): तुमच्या डिव्हाइसचे आणखी अचूक स्थान मिळवण्याकरिता, स्थान अचूकता कशी व्यवस्थापित करावी हे जाणून घ्या.
- तुमच्या Android डिव्हाइससाठी आणीबाणी स्थान सेवा: Android आणीबाणी स्थान सेवा कशी व्यवस्थापित करावी हे जाणून घ्या.
- तुमच्या Android डिव्हाइससाठी भूकंपाचे इशारे: तुमच्या डिव्हाइसवर जवळपासच्या भूकंपांची अपडेट मिळवण्याकरिता, भूकंपाचे इशारे कसे व्यवस्थापित करावे हे जाणून घ्या.
- तुमच्या डिव्हाइसवरील टाइम झोनसाठी स्थान वापरणे: स्थानानुसार टाइम झोनचे अपडेट मिळवण्याकरिता, टाइम झोनसाठी स्थान कसे व्यवस्थापित करावे हे जाणून घ्या.
- तुमच्या Google खाते साठी टाइमलाइन: टाइमलाइन हे Google खाते सेटिंग आहे, जे तुम्ही भेट दिलेली ठिकाणे, तुम्ही वापरलेले मार्ग आणि तुम्ही केलेले प्रवास लक्षात ठेवण्यात मदत करणारा वैयक्तिक नकाशा तयार करते. टाइमलाइन कशी सुरू करावी हे जाणून घ्या.
- Google Maps साठी स्थान शेअरिंग: तुमचे डिव्हाइस कुठे आहे हे इतरांना कळवण्याकरिता, Google Maps द्वारे तुमचे रीअल-टाइम स्थान कसे शेअर करावे हे जाणून घ्या.
- Search मधील स्थान: तुम्ही Google वर शोधता तेव्हा आणखी उपयुक्त परिणाम मिळवण्यासाठी, वेबसाइट आणि अॅप्सच्या स्थान परवानग्या कशा व्यवस्थापित कराव्या ते जाणून घ्या.
- वाय-फाय स्कॅनिंग आणि ब्लूटूथ स्कॅनिंग: ॲप्सना आणखी उत्तम स्थान माहिती मिळवण्यात मदत करण्यासाठी, नेटवर्क किंवा ब्लूटूथ डिव्हाइससाठी कसे स्कॅन करावे हे जाणून घ्या.
- जवळपासच्या डिव्हाइसची परवानगी: कनेक्ट करण्यासाठी जवळपासची डिव्हाइस सुरू करण्याकरिता, जवळपासच्या डिव्हाइसची परवानगी सुरू कशी करावी हे जाणून घ्या.
- सॅटेलाइट SOS: तुम्ही मोबाइल नेटवर्क किंवा वाय-फाय नसलेल्या एखाद्या ठिकाणी असल्यास, Pixel हे मदत मिळवण्यासाठी उपग्रहाद्वारे आणीबाणी सेवा पुरवठादाराशी संपर्क साधू शकते. सॅटेलाइट SOS द्वारे आणीबाणी मदत कशी मिळवावी हे जाणून घ्या.
टीप: अॅप्सची स्वतःची सेटिंग्ज असतात. अॅपची स्थान सेटिंग्ज कशी व्यवस्थापित करायची ते जाणून घ्या.
तुमच्या फोनचे स्थान सुरू किंवा बंद करा
- स्क्रीनच्या वरच्या बाजूने खाली स्वाइप करा.
- स्थान ला स्पर्श करा आणि धरून ठेवा.
- तुम्हाला स्थान न आढळल्यास:
- संपादित करा किंवा सेटिंग्ज वर टॅप करा.
- तुमच्या क्विक सेटिंग्ज मध्ये स्थान ड्रॅग करा.
- तुम्हाला स्थान न आढळल्यास:
- तुम्ही ज्या ॲप्सना स्थानाशी संबंधित परवानगी दिलेली आहे, ती ॲप्स तुम्हाला स्थानावर आधारित माहिती, सेवा किंवा जाहिराती देण्यासाठी तुमच्या फोनचे स्थान शोधू शकतात. अॅपची स्थान सेटिंग्ज कशी बदलायची ते जाणून घ्या.
- Google स्थान अचूकता (म्हणजेच Google स्थान सेवा) सुरू असल्यास, स्थानावर आधारित सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी Google स्थान अचूकता डेटा गोळा करू शकते. Google स्थान अचूकता याबद्दल जाणून घ्या.
- तुमच्या ॲप आणि ब्राउझर परवानग्यांनी अनुमती दिल्यास, तुम्हाला तुमच्या फोनच्या स्थानावर आधारित शोध परिणाम मिळू शकतात. तुम्ही Google वर शोधता तेव्हा तुमचे स्थान कसे व्यवस्थापित करायचे हे जाणून घ्या.
- तुमचा फोन हरवल्यास, तुम्ही तो कुठे आहे हे शोधू शकता. Find My Device याबद्दल जाणून घ्या.
- तुम्ही तुमच्या फोनचे स्थान इतरांसोबत शेअर करू शकता. Google Maps सह स्थान शेअरिंग, आणीबाणीमध्ये तुमचे स्थान पाठवणे आणि भूकंपाचे इशारे मिळवणे हे कसे करायचे ते जाणून घ्या.
- तुम्ही टाइमझोनसाठी स्थान सुरू केले असल्यास, तुमचा फोन टाइमझोन निर्धारित करण्यासाठी तुमचे स्थान वापरू शकतो. टाइम झोनसाठी स्थान याबद्दल जाणून घ्या.
- तुम्ही स्थान इतिहास सुरू केले असल्यास, Google अॅप्स न वापरताही, तुमच्या डिव्हाइसचे अचूक स्थान नियमितपणे तुमच्या डिव्हाइसवर आणि Google च्या सर्व्हरवर सेव्ह केले जाते. तुम्ही तुमच्या स्थान इतिहासाचे पुनरावलोकन करू शकता किंवा किती काळासाठी तो ठेवावा यात बदल करण्याकरिता अॅक्टिव्हिटी.google.com किंवा तुमच्या टाइमलाइन वर भेट देऊ शकता. स्थान इतिहास याबद्दल जाणून घ्या.
- तुमच्या फोनचे स्थान कोणत्याही अॅप्ससोबत शेअर केले जात नाही. स्थान वापरणारी वैशिष्ट्ये कदाचित योग्य प्रकारे काम करणार नाहीत.
- स्थानावर आधारित सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी Google स्थान अचूकता डेटा गोळा करणार नाही.
- तुमचा आयपी अॅड्रेस यासारख्या माहितीवर आधारित तुम्हाला शोध परिणाम आणि जाहिराती मिळू शकतात. तुम्ही Google वर शोधता तेव्हा तुमचे स्थान कसे व्यवस्थापित करायचे हे जाणून घ्या.
- तुमचा फोन हरवल्यास, तो कुठे आहे हे तुम्ही पाहू शकत नाही. Find My Device याबद्दल जाणून घ्या.
- तुम्ही Google Maps वापरून तुमच्या फोनचे स्थान कोणासोबतही शेअर करू शकत नाही. तुमचे डिव्हाइस आणीबाणीमध्ये प्रथम प्रतिसाद देणाऱ्यांना अजूनही स्थान पाठवू शकते. Google Maps सह स्थान शेअरिंग आणि आणीबाणींमध्ये स्थान पाठवणे यांबद्दल जाणून घ्या.
- तुम्ही आणीबाणी नंबरला कॉल केल्यास किंवा एसएमएस पाठवल्यास, आणीबाणी स्थान सेवा अथवा तुमचा मोबाइल वाहक अजूनही तुमच्या फोनचे स्थान आणीबाणीदरम्यान प्रतिसाद देणाऱ्यांना आपोआप पाठवू शकतो. आणीबाणी स्थान सेवा याबद्दल जाणून घ्या.
- तुम्हाला जवळपासच्या भूकंपांबद्दल भूकंपाचे इशारे मिळू शकत नाहीत. भूकंपाचे इशारे याबद्दल जाणून घ्या.
- तुमचा फोन तुमचा टाइमझोन निर्धारित करण्यासाठी स्थान वापरू शकणार नाही. टाइमझोनसाठी स्थान याबद्दल जाणून घ्या.
- तुम्ही स्थान इतिहास सुरू केला असला तरीही, तुम्ही तुमच्या फोनसह जेथे जाता ती ठिकाणे सेव्ह केली जाणार नाहीत. स्थान इतिहास याबद्दल जाणून घ्या.
तुमच्या फोनला अधिक अचूक स्थान मिळवण्यात मदत करा (Google स्थान सेवा म्हणजेच Google स्थान अचूकता)
तुमच्या फोनची स्थान अचूकता सुरू किंवा बंद करा
Android 12 आणि त्यावरील आवृत्ती
- स्क्रीनच्या वरच्या बाजूने खाली स्वाइप करा.
- स्थान ला स्पर्श करा आणि धरून ठेवा.
- तुम्हाला स्थान न आढळल्यास:
- संपादित करा किंवा सेटिंग्ज वर टॅप करा.
- तुमच्या क्विक सेटिंग्ज मध्ये स्थान ड्रॅग करा.
- तुम्हाला स्थान न आढळल्यास:
- स्थान सेवा Google स्थान अचूकता वर टॅप करा.
- स्थान अचूकता यामध्ये सुधारणा करा सुरू किंवा बंद करा.
Android 11 आणि त्यापेक्षा खालील आवृत्ती
- स्क्रीनच्या वरच्या बाजूने खाली स्वाइप करा.
- स्थान ला स्पर्श करा आणि धरून ठेवा.
- तुम्हाला स्थान न आढळल्यास:
- संपादित करा किंवा सेटिंग्ज वर टॅप करा.
- तुमच्या क्विक सेटिंग्ज मध्ये स्थान ड्रॅग करा.
- तुम्हाला स्थान न आढळल्यास:
- प्रगत Google स्थान अचूकता वर टॅप करा.
- स्थान अचूकता यामध्ये सुधारणा करा सुरू किंवा बंद करा.
तुम्ही Google स्थान अचूकता सुरू केले असल्यास, सर्वात अचूक स्थान मिळवण्यासाठी तुमचा फोन पुढील स्रोत वापरतो:
- GPS
- वाय-फाय
- मोबाइल नेटवर्क
- सेन्सर (उदा. अॅक्सेलेरोमीटर)
Google वेळोवेळी स्थान डेटा गोळा करू शकते आणि स्थान अचूकता व स्थानावर आधारित सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी हा डेटा निनावी पद्धतीने वापरू शकते.
तुम्ही Google स्थान अचूकता बंद करता तेव्हा, स्थान निर्धारित करण्यासाठी तुमचा फोन GPS आणि अॅक्सेलेरोमीटर यांसारखे सेन्सर वापरतो. GPS हे इतर स्रोतांपेक्षा धीमे असू शकते आणि त्याची अचूकता कमी असू शकते.
Google स्थान अचूकता बंद असते तेव्हा, GPS, वाय-फाय, नेटवर्क आणि सेन्सर डेटा Google स्थान अचूकता याद्वारे वापरले किंवा गोळा केले जात नाही.
Android 12 आणि त्यावरील आवृत्त्यांसाठी, तुम्ही अचूक स्थान अॅक्सेस करण्याकरिता प्रत्येक ॲपची परवानगी व्यवस्थापित करू शकता. हे Google स्थान अचूकता यापेक्षा वेगळे आहे, Google स्थान अचूकता हे सेटिंग तुमच्या डिव्हाइससाठी आहे जे अधिक अचूक स्थान मिळवण्याकरिता तुमच्या फोनला आणखी स्रोत वापरण्याची अनुमती देते. Google स्थान अचूकता सुरू असले तरीदेखील, तुम्हाला एखाद्या ॲपला तुमच्या डिव्हाइसचे अचूक स्थान अॅक्सेस करण्याची अनुमती द्यायची नसल्यास, तुम्ही त्या ॲपला फक्त अंदाजे स्थानाची परवानगी देऊ शकता. तुम्ही Google स्थान अचूकता बंद केल्यास, ॲप्सना कदाचित तुमच्या डिव्हाइसचे अचूक स्थान मिळणार नाही. अॅपच्या स्थान परवानग्या कशा व्यवस्थापित करायच्या ते जाणून घ्या.वाय-फाय आणि ब्लूटूथ स्कॅनिंग सेट करा
स्थानासंबंधी आणखी चांगली माहिती मिळवण्यात अॅप्सना मदत करण्यासाठी, तुम्ही तुमच्या फोनला जवळपासचे अॅक्सेस पॉइंट किंवा ब्लूटूथ यांसाठी स्कॅन करू देऊ शकता.
Android 12 आणि त्यावरील आवृत्ती
- स्क्रीनच्या वरच्या बाजूने खाली स्वाइप करा.
- स्थान ला स्पर्श करा आणि धरून ठेवा.
- तुम्हाला स्थान न आढळल्यास:
- संपादित करा किंवा सेटिंग्ज वर टॅप करा.
- तुमच्या क्विक सेटिंग्ज मध्ये स्थान ड्रॅग करा.
- तुम्हाला स्थान न आढळल्यास:
- स्थान सेवा वर टॅप करा.
- वाय-फाय स्कॅनिंग आणि ब्लूटूथ स्कॅनिंग सुरू किंवा बंद करा.
Android 11 आणि त्यापेक्षा खालील आवृत्ती
- स्क्रीनच्या वरच्या बाजूने खाली स्वाइप करा.
- स्थान ला स्पर्श करा आणि धरून ठेवा.
- तुम्हाला स्थान न आढळल्यास:
- संपादित करा किंवा सेटिंग्ज वर टॅप करा.
- तुमच्या क्विक सेटिंग्ज मध्ये स्थान ड्रॅग करा.
- तुम्हाला स्थान न आढळल्यास:
- वाय-फाय स्कॅनिंग आणि ब्लूटूथ स्कॅनिंग वर टॅप करा.
- वाय-फाय स्कॅनिंग आणि ब्लूटूथ स्कॅनिंग सुरू किंवा बंद करा.
आणीबाणीमध्ये तुमचे स्थान पाठवा
तुम्हाला झटपट शोधण्यात प्रतिसादकर्त्यांना मदत व्हावी, यासाठी, तुम्ही आणीबाणी नंबर डायल करता किंवा त्याला एसएमएस पाठवता, तेव्हा तुमच्या फोनचे स्थान पाठवता येऊ शकते, जसे की तुम्ही अमेरिकेमध्ये ९११ किंवा युरोपमध्ये ११२ डायल करता तेव्हा.
तुमच्या देशामध्ये किंवा प्रांतामध्ये आणि तुमच्या मोबाइल नेटवर्कवर Android आणीबाणी स्थान सेवा (ELS) काम करत असल्यास व तुम्ही ELS बंद केले नसल्यास, तुमचा फोन ELS मार्फत प्रथम प्रतिसाद देणाऱ्यांना त्याचे स्थान आपोआप पाठवेल. ELS बंद असल्यास, आणीबाणी कॉल किंवा एसएमएस यांदरम्यान तुमचा मोबाइल वाहक तरीही डिव्हाइसचे स्थान पाठवू शकतो.
Android आणीबाणी स्थान सेवा सुरू किंवा बंद करा
तुम्ही आणीबाणी स्थान सेवा कधीही सुरू किंवा बंद करू शकता. आणीबाणी स्थान सेवा ही Google Play सेवा सपोर्टसह बहुतेक डिव्हाइसवर उपलब्ध आहे.
Android 12 आणि त्यावरील आवृत्ती
- तुमच्या डिव्हाइसचे Settings ॲप उघडण्यासाठी, स्क्रीनच्या सर्वात वरच्या बाजूने खाली दोनदा स्वाइप करा.
- सेटिंग्ज सुरक्षितता आणि आणीबाणी वर टॅप करा.
- आणीबाणी स्थान सेवा सुरू किंवा बंद करा.
Android 11 आणि त्यापेक्षा खालील आवृत्ती
- स्क्रीनच्या वरच्या बाजूने खाली स्वाइप करा.
- स्थान ला स्पर्श करा आणि धरून ठेवा.
- तुम्हाला स्थान न आढळल्यास:
- संपादित करा किंवा सेटिंग्ज वर टॅप करा.
- तुमच्या क्विक सेटिंग्ज मध्ये स्थान ड्रॅग करा.
- तुम्हाला स्थान न आढळल्यास:
- प्रगत आणीबाणी स्थान सेवा वर टॅप करा.
- आणीबाणी स्थान सेवा सुरू किंवा बंद करा.
आणीबाणी स्थान सेवा कसे काम करते
तुम्ही स्थानिक आणीबाणी नंबरला कॉल केला तरच ELS अॅक्टिव्हेट होते.
तुमच्या आणीबाणी कॉलदरम्यान, डिव्हाइससाठी सर्वात अचूक संभाव्य स्थान मिळवण्याकरिता, ELS हे Google स्थान अचूकता आणि इतर माहिती वापरू शकते. तुमच्या डिव्हाइसचे वायफाय सेटिंग बंद असल्यास, ELS ते सुरू करू शकते.
आणीबाणी सेवांना तुमचे स्थान निर्धारित करण्यात मदत करण्याच्या उद्देशाने, तुमचा फोन तुमचे स्थान आणीबाणीमधील अधिकृत भागीदारांना पाठवतो. तुमचे स्थान तुमच्या फोनवरून थेट आणीबाणीमधील भागीदारांना पाठवले जाते.
ELS अॅक्टिव्ह असताना आणीबाणी कॉल किंवा एसएमएस पूर्ण केल्यानंतर, ELS किती चांगल्या पद्धतीने काम करत आहे याचे विश्लेषण करण्याच्या उद्देशाने, तुमचा फोन ओळख न दाखवणारा वापर आणि विश्लेषण डेटा Google ला पाठवतो. या माहितीमध्ये अधिकृत आणीबाणी भागीदारांना पाठवलेले स्थान आणि तुमची ओळख यांचा समावेश नसतो.
तुम्ही Android ची जुनी आवृत्ती वापरत असल्यास
स्थान सेटिंग्ज निवडा (Android 9.0)
स्थान सेटिंग्ज बदलण्यासाठी:
- तुमच्या डिव्हाइसचे Settings अॅप उघडा.
- सुरक्षा आणि स्थान स्थान वर टॅप करा.
- तुमच्याकडे कार्य प्रोफाइल असल्यास, प्रगत वर टॅप करा.
त्यानंतर, पर्याय निवडा:
- स्थान सुरू किंवा बंद करा: स्थान वर टॅप करा.
- जवळपासच्या नेटवर्कसाठी स्कॅन करा: प्रगत स्कॅनिंग वर टॅप करा. वाय-फाय स्कॅनिंग अथवा ब्लूटूथ स्कॅनिंग सुरू किंवा बंद करा.
- आणीबाणी स्थान सेवा सुरू किंवा बंद करा: प्रगत Google आणीबाणी स्थान सेवा वर टॅप करा. आणीबाणी स्थान सेवा सुरू किंवा बंद करा.
- तुमच्या फोनचे Settings अॅप उघडा.
- सुरक्षा आणि स्थान स्थान वर टॅप करा.
- तुम्हाला "सुरक्षा आणि स्थान" न आढळल्यास, स्थान वर टॅप करा.
- मोड वर टॅप करा.
- मोड निवडा:
- उच्च अचूकता: सर्वात अचूक स्थान मिळवण्यासाठी GPS, वाय-फाय, मोबाइल नेटवर्क आणि सेन्सर वापरा. तुमच्या फोनच्या स्थानाचा अंदाज आणखी जलद आणि आणखी अचूकपणे लावण्यात मदत करण्यासाठी Google स्थान सेवा वापरा.
- बॅटरी बचत: वाय-फाय आणि मोबाइल नेटवर्क यांसारखे कमी बॅटरी वापरणारे स्रोत वापरा. तुमच्या फोनच्या स्थानाचा अंदाज आणखी जलद आणि आणखी अचूकपणे लावण्यात मदत करण्यासाठी Google स्थान सेवा वापरा.
- केवळ डिव्हाइस: GPS आणि सेन्सर वापरा. स्थान अचूकतेमध्ये सुधारणा करण्यासाठी Google स्थान सेवा वापरू नका. ते तुमच्या स्थानाचा अंदाज आणखी धीम्या गतीने करू शकते आणि जास्त बॅटरी वापरू शकते.
तुमच्या फोनने कोणती स्थान माहिती वापरावी हे तुम्ही नियंत्रित करू शकता.
- तुमच्या फोनचे Settings अॅप उघडा.
- "वैयक्तिक" या अंतर्गत, स्थान अॅक्सेस वर टॅप करा.
- स्क्रीनच्या सर्वात वरती, माझ्या स्थानाचा अॅक्सेस सुरू किंवा बंद करा.
- स्थान अॅक्सेस सुरू असते तेव्हा, पुढील गोष्टींपैकी एक किंवा दोन्ही निवडा:
- GPS उपग्रह: तुमच्या कारमधील GPS डिव्हाइस यांसारख्या उपग्रह सिग्नलवरून तुमच्या फोनला त्याच्या स्थानाचा अंदाज करू देते.
- वाय-फाय आणि मोबाइल नेटवर्क स्थान: GPS सह किंवा त्याशिवाय, तुमच्या फोनला त्याच्या स्थानाचा अंदाज आणखी जलद करण्यात मदत करण्यासाठी Google स्थान सेवा वापरू देते.
- स्थान अॅक्सेस बंद असतो तेव्हा:
तुमचा फोन त्याचे नेमके स्थान शोधू शकत नाही किंवा ते कोणत्याही अॅप्ससोबत शेअर करू शकत नाही.
- स्थान अॅक्सेस सुरू असते तेव्हा, पुढील गोष्टींपैकी एक किंवा दोन्ही निवडा:
टीप: तुमच्याकडे एकाहून अधिक व्यक्ती वापरत असलेले टॅबलेट असल्यास, प्रत्येक व्यक्तीकडे वेगवेगळी स्थान अॅक्सेस सेटिंग्ज असू शकतात.