संपर्क म्हणून कोणाला सेव्ह केले आणि सुचवले आहे ते बदलणे

तुम्ही Gmail मध्ये नवीन ईमेलवर एखाद्याचे नाव टाइप करण्यास सुरुवात करता, तेव्हा तुम्हाला काही Google सेवांमध्ये सुचवलेले संपर्क दिसतील. संपर्क म्हणून कोणाला सेव्ह केले जावे आणि सुचवले जावे हे तुम्ही नियंत्रित करू शकता.

सूचना म्हणून कोणाचे नाव दिसते

सूचना या तुमचे संपर्क आणि संवाद याच्याशी संबंधित विविध सिग्नलवर आधारित असतात, जसे की एखाद्या संपर्काला तारांकित केले जात असल्यास किंवा तुम्ही एखाद्या संपर्काला अलीकडे ईमेल केला असल्यास. सुचवलेल्या संपर्कांमध्ये तुम्ही तुमच्या संपर्कांमध्ये जोडलेल्या लोकांचा समावेश आहे. तुम्ही Google सेवांमध्ये संवाद साधलेल्या लोकांना आपोआप "इतर संपर्क" यांमध्ये जोडले जाते.

Gmail किंवा Photos सारख्या काही ॲप्समध्ये, तुम्ही काहीही टाइप करण्यापूर्वी किंवा शोधण्यापूर्वी सुचवलेले संपर्क पाहू शकता.

टिपा:

संपर्क म्हणून कोणाला सेव्ह केले आहे ते नियंत्रित करणे

स्वतः संपर्क जोडणे
  1. Google Contacts मध्ये साइन इन करा. तुम्हाला तुम्ही जोडलेल्या संपर्कांची सूची दिसेल.
  2. सर्वात वरती डावीकडे, प्रश्न जोडासंपर्क तयार करा निवडा.
  3. व्यक्तीची संपर्क माहिती एंटर करा.
  4. सेव्ह करा निवडा.
तुम्ही लोकांशी संवाद साधता तेव्हा संपर्क माहिती सेव्ह करणे

तुम्ही Google उत्पादनांवर लोकांशी संवाद साधता, तेव्हा तुम्ही त्यांची संपर्क माहिती आपोआप सेव्ह करू शकता, ज्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:

  • नावे
  • ईमेल अ‍ॅड्रेस
  • फोन नंबर

हे सेटिंग सुरू केलेले असते, तेव्हा तुम्ही पुढील लोकांशी संबंधित संपर्क माहिती कायम ठेवाल:

  • तुम्ही Gmail मध्ये ईमेल केलेले लोक.
  • तुम्ही Drive मधील दस्तऐवजासारखी एखादी गोष्ट ज्यांच्यासोबत शेअर केली आहे ते लोक.
  • Google Photos मधील शेअर केलेले अल्बम यासारखा आशय तुमच्यासोबत शेअर करणारे लोक.
  • तुम्ही ज्याचा भाग आहात त्या इव्हेंट किंवा गटांमध्ये समाविष्ट असलेले लोक.
  • ओळखीचे अशी तुम्ही खूण केलेले लोक.
  • तुम्ही ज्यांची कॅलेंडर आमंत्रणे स्वीकारता ते लोक.

आपोआप सेव्ह करणे हे सुरू किंवा बंद करणे

  1. तुमच्या Google खाते वर जा.
  2. डावीकडील नेव्हिगेशन पॅनलवर, लोक आणि शेअरिंग वर क्लिक करा.
  3. "संपर्क" पॅनलवर, संवादांमधून सेव्ह केलेली संपर्क माहिती वर क्लिक करा.
  4. तुम्ही लोकांशी संवाद साधता तेव्हा संपर्क माहिती सेव्ह करा हे सुरू किंवा बंद करा.
  5. तुम्ही Gmail वापरत असल्यास, तुम्ही ईमेल करत असलेल्या लोकांची संपर्क माहिती Gmail ने सेव्ह करावी का ते निवडा:
    1. काँप्युटरवर, तुमच्या Gmail सेटिंग्ज वर जा.
    2. "आपोआप पूर्ण करण्यासाठी संपर्क तयार करा" या अंतर्गत, एखादा पर्याय निवडा.
    3. पेजच्या तळाशी, बदल सेव्ह करा वर क्लिक करा.

सूचनांमधून सेव्ह केलेले संपर्क लपवा

तुमचे सुचवलेले संपर्क लपवणे

काही Google ॲप्समध्ये, जसे की Gmail आणि Photos, तुम्ही सुचवलेला संपर्क कायमचा न हटवता लपवू शकता. तुम्ही खालील पायऱ्या फॉलो करू शकता:

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Gmail किंवा Photos उघडा.
    • Gmail: तळाशी उजवीकडे, तयार करा वर टॅप करा.
    • Photos: फोटो निवडाआणि त्यानंतर शेअर करा Share वर टॅप करा.
  2. तुम्हाला लपवायच्या असलेल्या संपर्काला स्‍पर्श करून धरून ठेवा आणि नंतर सूचना लपवा वर टॅप करा.

टिपा:

  • तुम्ही संपर्काचे नाव टाइप करणे सुरू करता, तेव्हा सूचना लपवण्यासाठी तुम्ही त्या फील्डमध्ये भरलेल्या सूचनांना स्पर्श करून धरून ठेवू शकता.
  • लपलेला सुचवलेला संपर्क शोधण्यासाठी, त्यांचे नाव एंटर करा आणि नंतरलपवलेल्या सूचना दाखवा वर टॅप करा.

संपर्क बदला किंवा काढून टाका

तुम्ही जोडलेले संपर्क तसेच आपोआप सेव्ह केलेले संपर्क तुम्ही बदलू किंवा काढून टाकू शकता.

तुम्ही जोडलेले संपर्क
  1. Google Contacts मध्ये साइन इन करा.
  2. संपर्क निवडा.
    • माहिती बदला:
      1. तळाशी उजवीकडे, संपादित करा संपादित करा वर टॅप करा.
      2. तुम्हाला हवे असलेले बदल करा.
      3. सर्वात वरती उजवीकडे, सेव्ह करा वर टॅप करा.
    • संपर्क काढून टाका: सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर हटवा वर टॅप करा.
आपोआप सेव्ह केलेले संपर्क
  1. Google Contacts मध्ये साइन इन करा.
  2. डावीकडे, इतर संपर्क निवडा.
  3. संपर्क निवडा.
    • माहिती बदला:
      1. सर्वात वरती उजवीकडे, संपर्कांमध्ये जोडा Add people वर टॅप करा.
      2. तुम्हाला हवे असलेले बदल करा.
      3. तळाशी, सेव्ह करा वर टॅप करा.
    • संपर्क काढून टाका:
      1. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर हटवा वर टॅप करा.
      2. ते पुन्हा जोडले जाण्यापासून थांबवण्यासाठी, आपोआप सेव्ह करणे थांबवण्याकरिता पायऱ्या हे फॉलो करा.
true
Google खाते मध्ये स्वागत आहे!

तुमच्याकडे नवीन Google खाते आहे असे आम्हाला आढळले आहे! तुमची Google खाते चेकलिस्ट वापरून तुमच्या अनुभवामध्ये सुधारणा कशी करावी हे जाणून घ्या.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
9349925185608264975
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
70975
false
false