संपर्क म्हणून कोणाला सेव्ह केले आणि सुचवले आहे ते बदलणे

तुम्ही Gmail मध्ये नवीन ईमेलवर एखाद्याचे नाव टाइप करण्यास सुरुवात करता, तेव्हा तुम्हाला काही Google सेवांमध्ये सुचवलेले संपर्क दिसतील. संपर्क म्हणून कोणाला सेव्ह केले जावे आणि सुचवले जावे हे तुम्ही नियंत्रित करू शकता.

सूचना म्हणून कोणाचे नाव दिसते

सूचना या तुमचे संपर्क आणि संवाद याच्याशी संबंधित विविध सिग्नलवर आधारित असतात, जसे की एखाद्या संपर्काला तारांकित केले जात असल्यास किंवा तुम्ही एखाद्या संपर्काला अलीकडे ईमेल केला असल्यास. सुचवलेल्या संपर्कांमध्ये तुम्ही तुमच्या संपर्कांमध्ये जोडलेल्या लोकांचा समावेश आहे. तुम्ही Google सेवांमध्ये संवाद साधलेल्या लोकांना आपोआप "इतर संपर्क" यांमध्ये जोडले जाते.

Gmail किंवा Photos सारख्या काही ॲप्समध्ये, तुम्ही काहीही टाइप करण्यापूर्वी किंवा शोधण्यापूर्वी सुचवलेले संपर्क पाहू शकता.

टिपा:

संपर्क म्हणून कोणाला सेव्ह केले आहे ते नियंत्रित करणे

स्वतः संपर्क जोडणे
  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, तुमचे Contacts उघडा.
  2. तळाशी उजवीकडे, जोडा प्रश्न जोडा वर टॅप करा.
  3. व्यक्तीची संपर्क माहिती एंटर करा.
  4. सेव्ह करा वर टॅप करा.
तुम्ही लोकांशी संवाद साधता तेव्हा संपर्क माहिती सेव्ह करणे

तुम्ही संवाद साधत असलेल्या लोकांची संपर्क माहिती ठरावीक Google सेवांमध्ये आपोआप सेव्ह केली जावी का हे तुम्ही ठरवू शकता, उदाहरणार्थ:

  • तुम्ही Gmail मध्ये ईमेल केलेले लोक.
  • तुम्ही Drive मधील दस्तऐवजासारखी एखादी गोष्ट ज्यांच्यासोबत शेअर केली आहे ते लोक.
  • तुमच्यासोबत इव्‍हेंट, गट किंवा Google Photos मध्ये शेअर केलेला अल्बम यासारख्या आशयामध्ये सहभागी असलेले लोक.
  • ओळखीचे अशी तुम्ही खूण केलेले लोक.

आपोआप सेव्ह करणे हे सुरू करणे किंवा थांबवणे

  1. तुमच्या डिव्हाइसचे Settings ॲप उघडा आणि Google आणि त्यानंतर तुमचे Google खाते व्यवस्थापित करा वर टॅप करा.
  2. सर्वात वरती, लोक आणि शेअरिंग वर टॅप करा.
  3. "Contacts" या अंतर्गत, संवादांमधून सेव्ह केलेली संपर्क माहिती वर टॅप करा.
  4. तुम्ही लोकांशी संवाद साधता, तेव्हा संपर्क माहिती सेव्ह करा हे सुरू किंवा बंद करा.
  5. तुम्ही Gmail वापरत असल्यास, तुम्ही ईमेल करत असलेल्या लोकांची संपर्क माहिती Gmail ने सेव्ह करावी का ते निवडा:
    1. काँप्युटरवर, तुमच्या Gmail सेटिंग्ज वर जा.
    2. "आपोआप पूर्ण करण्यासाठी संपर्क तयार करा" या अंतर्गत, एखादा पर्याय निवडा.
    3. पेजच्या तळाशी, बदल सेव्ह करा वर क्लिक करा.

संपर्क बदलणे किंवा काढून टाकणे

संपर्क संपादित करण्यासाठी किंवा काढून टाकण्यासाठी, या पायऱ्या फॉलो करा.

तुम्ही जोडलेले संपर्क
  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Contacts अ‍ॅप उघडा.
  2. एखाद्या संपर्कावर टॅप करा.
    • माहिती बदला:
      1. सर्वात वरती उजवीकडे, संपादित करा संपादित करा वर टॅप करा.
      2. तुम्हाला हवे असलेले बदल करा.
      3. सर्वात वरती उजवीकडे, सेव्ह करा वर टॅप करा.
    • संपर्क काढून टाका: सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर हटवा वर टॅप करा.
आपोआप सेव्ह केलेले संपर्क
  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Contacts अ‍ॅप उघडा.
  2. सर्वात वरती, शोध बारवर टॅप करा.
    • तुम्हाला बदलायचा असलेला संपर्क शोधा.
  3. शोध परिणामांच्या इतर संपर्क विभागामध्ये, तुम्हाला तपासायच्या असलेल्या संपर्कावर टॅप करा.
  4. सर्वात वरती उजवीकडे, संपर्कांमध्ये जोडा आणि त्यानंतर संपादित करा वर टॅप करा.
    • तुम्हाला हवे असलेले बदल करा.
  5. सर्वात वरती उजवीकडे, सेव्ह करा वर टॅप करा.

टिपा: 

true
Google खाते मध्ये स्वागत आहे!

तुमच्याकडे नवीन Google खाते आहे असे आम्हाला आढळले आहे! तुमची Google खाते चेकलिस्ट वापरून तुमच्या अनुभवामध्ये सुधारणा कशी करावी हे जाणून घ्या.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
3365888774456007784
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
70975
false
false