तुमचा Google खाते पिन तयार करणे किंवा बदलणे

तुम्हाला डिव्हाइस सेट करणे किंवा खरेदी करणे यांसारख्या ठरावीक कृती करता येण्यापूर्वी काही उत्पादने Google खाते पिन मागतात.

पिन कधी वापरायचा

काही वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये तुम्हाला Google खाते पिन वापरण्यास सांगितले जाईल, जसे की:

  • तुम्ही Google Play मधील खरेदीला मंजुरी देता तेव्हा (पर्यायी).
  • तुम्ही Google Pay मध्ये एखाद्या व्यक्तीला पैसे पाठवता तेव्हा.
  • तुम्ही Roku बॉक्स सेट करता तेव्हा. तुम्ही Google Play Movies & TV जोडण्यासाठी पिन वापराल.
  • तुम्ही Daydream मध्ये Google Play वरून काहीतरी खरेदी करता तेव्हा.

तुमच्याकडे Google Voice आणि Google Ads यांसारख्या इतर Google उत्पादनांसाठी असणार्‍या पिनपेक्षा तुमचा Google खाते पिन वेगळा असतो.

पिन तयार करणे

तुम्हाला पिन तयार करायचा असल्यास, तुम्हाला सूचना दिसतील. ही पायरी अनेकदा सेटअप किंवा खरेदी प्रक्रियेचा भाग असते.

तुम्ही या प्रकारेदेखील पिन तयार करू शकता:

  1. तुमच्या Google खाते चा पिन विभाग उघडा. तुम्हाला साइन इन करावे लागू शकते.
  2. पिन तयार करा निवडा.
  3. क्लिष्ट पिन निवडा आणि स्क्रीनवरील पायर्‍या फॉलो करा.
    • तुमची जन्मतारीख किंवा अंदाज लावण्यास सोपे असलेले इतर अंक वापरू नका.
    • तुम्ही इतर कुठेही वापरत असलेला पिन वापरू नका.
    • अंक क्रमाने वापरू नका, जसे की, १२३४ किंवा ९८७६.
  4. सेव्ह करा निवडा.

तुमचा पिन बदलणे

  1. तुमचे Google खाते उघडा. तुम्हाला साइन इन करावे लागू शकते.
  2. "सुरक्षा" अंतर्गत, तुम्ही Google मध्ये कसे साइन इन करता निवडा.
  3. Google खाते पिन निवडा. तुम्हाला पुन्हा साइन इन करावे लागू शकते.
  4. पिन बदला निवडा.
  5. क्लिष्ट पिन निवडा आणि स्क्रीनवरील पायर्‍या फॉलो करा.
  6. सेव्ह करा निवडा.
true
Google खाते मध्ये स्वागत आहे!

तुमच्याकडे नवीन Google खाते आहे असे आम्हाला आढळले आहे! तुमची Google खाते चेकलिस्ट वापरून तुमच्या अनुभवामध्ये सुधारणा कशी करावी हे जाणून घ्या.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
582666054772383193
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
70975
false
false